मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathi News 17 September 2022 Live: राज्य सरकारला स्वातंत्र्यसैनिकांचा विसर - सचिन सावंत
Fadnavis - Shinde

Marathi News 17 September 2022 Live: राज्य सरकारला स्वातंत्र्यसैनिकांचा विसर - सचिन सावंत

Sep 17, 2022, 06:04 PMIST

Daily News Live Updates in Marathi: पंतप्रधानांच्या वाढदिवशी राज्य सरकार संपूर्ण महाराष्ट्रात सेवा पंधरवड्याची पूर्ण पान जाहिरात देते. पण मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षाची शासकीय जाहिरात कुठेही दिसून येत नाही. अगदी मराठवाड्यातही नाही, असं म्हणत, काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी राज्य सरकारचा निषेध केला आहे.

Sep 17, 2022, 06:01 PMIST

Sachin Sawant: भाजप व  राज्य सरकारला स्वातंत्र्यसैनिकांचा विसर; काँग्रेसची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य सरकार संपूर्ण महाराष्ट्रात सेवा पंधरवड्याची पूर्ण पान जाहिरात देते. पण मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षाची शासकीय जाहिरात कुठेही दिसून येत नाही. अगदी मराठवाड्यातही नाही, असं म्हणत, काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी राज्य सरकारचा निषेध केला आहे.

Sep 17, 2022, 04:15 PMIST

Manikrao Gavit Death: माणिकराव गावित यांच्या निधनाने अनुभवी व लोकाभिमुख नेतृत्व हरपले: नाना पटोले

ज्येष्ठ, अनुभवी नेते व माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांच्या निधनाबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. संसदेत तब्बल ९ वेळा निवडून गेलेले लोकप्रतिनिधी असा त्यांचा लौकिक होता. गावित यांच्या निधनानं राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील प्रदिर्घ अनुभव असलेलं लोकाभिमुख नेतृत्व हरपलं आहे, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

Sep 17, 2022, 03:42 PMIST

माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांचे निधन

माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांचे आज निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. माणिकराव गावित नंदूरबारमधून सलग नऊ वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या मंत्रिमंडळात माणिकराव गावित यांनी गृह राज्यमंत्री म्हणून काम केले होते.

<p>Former minister of state for home Manikrao Gavit</p>
Former minister of state for home Manikrao Gavit

Sep 17, 2022, 11:19 AMIST

Vedenta-Foxconn : शिवसेनेनं वेदातांकडे किती पैसे मागितले होते?, याची चौकशी करा; शेलारांची मागणी

Ashish Shelar : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प दीड लाख कोटींचा होता, मग इथे किती टक्के मागितले होते? १० टक्के नुसारच हिशेब मागितला जात होता की महापालिकेतील रेटने मागणी होत होती?, असा सवाल करत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दावोसमध्ये वेदांताचे सीईओ अनिल अग्रवालांची भेट घेतली होती. त्यानंतर आता शेलारांनी थेट ठाकरेंवर खळबळजनक आरोप केले आहेत.

Sep 17, 2022, 11:09 AMIST

Project Cheetah: 'प्रोजेक्ट चीता' वरून महाराष्ट्र काँग्रेसचा भाजपला टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून नामिबियातून आठ दुर्मिळ चित्ते भारतात आणले गेले आहेत. या संपूर्ण प्रकल्पाबाबत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी एक खुलासा केला आहे. 'प्रोजेक्ट चीता'चा प्रस्ताव २००८-०९ मध्ये तयार झाला. मनमोहन सिंह सरकारने त्याला मान्यता दिली. एप्रिल २०१० मध्ये तत्कालीन वन आणि पर्यावरण मंत्री जयराम रमेश आफ्रिकेतील चीता आउटरीच सेंटरमध्ये गेले. २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयानं प्रकल्पाला स्थगिती दिली. २०२० मध्ये कोर्टाने स्थगिती उठवली. आता चित्ते आणले जात आहेत, अशी माहिती लोंढे यांनी दिली आहे.

Sep 17, 2022, 10:21 AMIST

माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांचे निधन

माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांचे निधन झाले आहे. ९ वेळा खासदार म्हणून ते निवडून आले होते. केंद्रात त्यांनी गृहराज्यमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री म्हणूनही काम पाहिलं होतं.

Sep 17, 2022, 09:38 AMIST

PM Modi Birthday: नरेंद्र मोदी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं अभिष्टचिंतन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस असून त्या निमित्तानं त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ट्वीटच्या माध्यमातून मोदींचं अभिष्टचिंतन केलं आहे. आपल्या हातून सुरू असलेलं राष्ट्र उभारणीचं कार्य असंच पुढं सुरू राहो, अशा सदिच्छा मुर्मू यांनी व्यक्त केल्या आहेत.

Sep 17, 2022, 08:28 AMIST

Johnson and Johnson : जॉन्सन एन्ड जॉन्सन बेबी पावडरचा परवाना रद्द

Johnson and Johnson Baby Powder : अनेक ठिकाणी जाँन्सन अँण्ड जाँन्सन कंपनीच्या पावडरची विक्री होत असल्याचं लक्षात येताच आता एफडीएनं मोठी कारवाई केली आहे. एफडीएनं जाँन्सन अँण्ड जाँन्सन कंपनीचा महाराष्ट्रातील उत्पादन परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामळं आधीच संकटात सापडलेल्या कंपनीला मोठा धक्का बसला आहे.

Sep 17, 2022, 08:23 AMIST

ACB Raid : भ्रष्टाचार प्रकरणात आपच्या आमदाराला अटक, एसीबीची मोठी कारवाई

AAP MLA Amanatullah Khan : आम आदमी पार्टीचे आमदार अमानतुल्लाह खान यांच्याविरोधात अँटी करप्शन ब्युरोनं कारवाई करत त्यांना अटक केली आहे. दिल्ली वक्फ बोर्ड भरतीतील कथित अनियमिततेच्या प्रकरणात एसीबीनं त्याच्या घरावर धाड मारली होती. यात त्यांच्या घरातून १२ लाख रुपये आणि एक विनापरवाना पिस्तुलही जप्त करण्यात आलं आहे.

Sep 17, 2022, 07:56 AMIST

PM Narendra Modi: कुनो पार्कमध्ये पंतप्रधान मोदी करणार चित्त्यांचे स्वागत

शांघायमधील एससीओ परिषदेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री उशिरा दिल्लीत दाखल झाले आहेत. आज सकाळी मध्य प्रदेशातील कुनो पार्कमध्ये चित्त्यांना आणण्यात येणार आहे तिथे कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदी उपस्थित राहतील. याशिवाय दिवसभर इतरही अनेक ठिकाणी नियोजित कार्यक्रम आहेत.

Sep 17, 2022, 07:51 AMIST

पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या आगाऊ शुभेच्छा देण्यास पुतीन यांचा नकार

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची चर्चा झाली. यावेळी पुतीन यांनी मोदींना शुभेच्छा देण्यास नकार दिला. ते म्हणाले की, "उद्या तुमचा वाढदिवस, पण मी तुम्हाला शुभेच्छा देऊ शकत नाही, रशियन परंपरा परवानगी देत नाही. पण मी भारताला मैत्रीपूर्ण शुभेच्छा देतो."

    शेअर करा