मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathi News 10 September 2022 Live: राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी शरद पवारांची बिनविरोध निवड
Nationalist Congress Party (NCP) chief Sharad Pawar (HT_PRINT)

Marathi News 10 September 2022 Live: राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी शरद पवारांची बिनविरोध निवड

Sep 10, 2022, 08:50 PMIST

Marathi News Live Updates : माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार शरद पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

Sep 10, 2022, 08:50 PMIST

Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी शरद पवारांची पुन्हा बिनविरोध निवड

Sharad Pawar NCP : माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार शरद पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या कार्य समितीत सर्व नेत्यांनी एकमतानं ठराव केल्यानंतर ही निवड करण्यात आली आहे.

Sep 10, 2022, 06:50 PMIST

Pune Ganesh Festival : पुण्यातील विसर्जन मिरवणूक तब्बल २९ तासांनी संपली

Ganesh Festival In Pune : मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीला उशिर झाल्यानं पुण्यात तब्बल २९ तासांनंतर मिरवणुक संपली आहे. टिळक रस्ता, लक्ष्मी रोड आणि पेठांच्या भागांमध्ये गणेश विसर्जनाआधी मिरवणुकीसाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळं शहरातील अनेक भागांमध्ये वाहतूक कोंडी झाल्याचंही पाहायला मिळालं.

Sep 10, 2022, 04:10 PMIST

Nana Patole:  नाना पटोले यांच्याकडून नितीन गडकरी यांना काँग्रेस प्रवेशाची ऑफर

नितीन गडकरी यांची भाजपमध्ये घुसमट होत असेल तर त्यांनी काँग्रेस पक्षात यायला हवं. आम्ही त्यांना साथ द्यायला तयार आहोत, असं आमंत्रण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलं आहे.

Sep 10, 2022, 03:34 PMIST

Uddhav Thackeray: आळंदीतील वारकऱ्यांनी घेतली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट

आळंदीतील वारकऱ्यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे भेट घेतली आणि चर्चा केली. आळंदी येथे वारकऱ्यांसाठी रुग्णालय आणि वारकरी भवन उभारण्याबाबत शिवसेना पाठपुरावा करेल, असे आश्वासन यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिले.

<p>Uddhav Thackeray</p>
Uddhav Thackeray

Sep 10, 2022, 03:18 PMIST

Agriculture News : राज्यात आता 'मुख्यमंत्री किसान योजना' होणार लागू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Shinde-Fadnavis government : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी 'मुख्यमंत्री किसान योजना' सुरू करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारनं घेतला आहे. या योजनेमार्फत राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा रुपयांची मदत केली जाणार आहे.

Sep 10, 2022, 03:28 PMIST

Landslide In Ambernath : अंबरनाथमध्ये भूस्खलन, दोन घरं खचली; कोणतीही जीवितहानी नाही!

Landslide In Ambernath : गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरांच्या भागांमध्ये पावसानं जोर धरला आहे. त्यातच आता अंबरनाथमध्ये भूस्खलन झाल्याची माहिती समोर येत आहे. यात आंबेडकरनगरमधील दोन घरं खचली असून कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

Sep 10, 2022, 02:51 PMIST

Financial aid to farmers: अतिवृष्टीग्रस्तांंसाठी साडेतीन हजार कोटींचा वाढीव निधी मंजूर

जून, जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतीचे व शेतजमिनीचे नुकसान झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भामध्ये अतिवृष्टीग्रस्तांना वाढीव मदत केली जाईल सांगितले होतं. तसा निर्णयही घेण्यात आला होता.  त्यानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि राज्य शासनाच्या निधीतून मिळून साडेतीन हजार कोटींचा निधी जिल्ह्यांना देण्यास मंजुरी देण्यात आली असून मदत व पुनर्वसन विभागानं तसा शासन निर्णय जारी केला आहे. वाढीव मदतीप्रमाणे जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी १३,६०० प्रति हेक्टर, बागायत पिकांसाठी २७ हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांसाठी ३६ हजार रुपये प्रति हेक्टर अशी तीन हेक्टर मर्यादेपर्यंत मदत देण्यात येईल.

Sep 10, 2022, 12:46 PMIST

Amravati Love Jihad: अमरावतीतील कथित लव्ह जिहाद प्रकरणावरून काँग्रेसचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल

पोलिसांनी मोबाईलवर फोन रेकॉर्डिंग अॅप ठेवायचा नाही असा पोलिस मॅन्युअलमध्ये नियम आहे का? यावर प्रकाश टाकावा अन्यथा पोलिसांच्या सन्मानाचे रक्षण करावे. लव जिहाद नावाने खोटी बोंब ठोकून समाजात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न अपराध नाही का? मग कारवाई का नाही?,' असा सवाल महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. तसंच, खासदार नवनीत राणा यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

Sep 10, 2022, 12:11 PMIST

Shiv Sena: शिवसेनेनं शेअर केला रौफ मेमन आणि देवेंद्र फडणवीसांचा फोटो

याकूब मेमनच्या कबरीच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर आरोप करणाऱ्या भाजपवर शिवसेनेनं पलटवार केला आहे. मेमन कुटुंबीयांपैकी एक असलेल्या रौफ मेमन यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा फोटोच शिवसेनेनं सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Sep 10, 2022, 11:42 AMIST

Dagadushet Ganpati Mandal : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा विसर्जन सोहळा पार पडला आहे. पांचाळेश्वर विसर्जन घाटावर विसर्जन झाले असून दरवर्षीपेक्षा यावर्षी विसर्जनाला जास्त वेळ लागला आहे.

<p>श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन&nbsp;</p>
श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन&nbsp;

Sep 10, 2022, 10:54 AMIST

Gujarat Congress: महागाई, बेरोजगारीच्या विरोधात गुजरातमध्ये काँग्रेसचा लाक्षणिक बंद

वाढती महागाई व बेरोजगारीचा निषेध म्हणून गुजरात काँग्रेसनं राज्यात लाक्षणिक बंद पुकारला आहे. या निमित्तानं काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरून निदर्शनं करत आहेत. भरूच इथं काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

Sep 10, 2022, 10:36 AMIST

King Charles-III: ब्रिटनचे नवीन राजे म्हणून प्रिन्स चार्ल्स आज पदग्रहण करणार

राणी एलिथाबेथ यांच्या निधनानंतर प्रिन्स चार्ल्स हे ब्रिटनचे राजे म्हणून आज पदग्रहण करणार आहेत. प्रिन्स चार्ल्स हे राजे चार्ल्स तिसरे राजे म्हणून ओळखले जाणार आहेत. सेंट जेम्स पॅलेसमधील बैठकीत आज दुपारी २ च्या सुमारास चार्ल्स यांना अधिकृतपणे ब्रिटनचे राजे म्हणून घोषित केले जाईल.

Sep 10, 2022, 09:24 AMIST

राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जन मिरवणुकींवर पुष्पवृष्टी

 मुंबई : येथील गिरगाव चौपाटीवर अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी आलेले भाविक आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकींवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुष्पवृष्टी करत अभिवादन केले. "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर..." या घोषणांनी हा परिसर दुमदुमून गेला. कोरोनाच्या सावटानंतर यावर्षी गणेशोत्सव निर्बंधमुक्त वातावरणात साजरा झाला. गणरायाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर जमलेल्या भाविकांच्या जनसागराला अभिवादन करण्यासाठी रात्री पावणे आठच्या सुमारास राज्यपालांसह, मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाले. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा आदी मान्यवर उपस्थित होते.

<p>राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जन मिरवणुकींवर पुष्पवृष्टी</p>
राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जन मिरवणुकींवर पुष्पवृष्टी

Sep 10, 2022, 09:16 AMIST

Lagbaug Cha raja visarjan: लाल बागच्या राजाला भक्तांचा भावपूर्ण निरोप; जुहू चौपाटीवर विसर्जन

मुंबईतील प्रसिद्ध असेलल्या लालबागचा राजाला आज सकाळी भावपूर्ण निरोप देण्यात आला. मुंबईतील जुहू चौपाटीवर आज सकाळी विसर्जन करण्यात आले. तब्बल दोन वर्षांनंतर वैभवी विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती.

Sep 10, 2022, 08:35 AMIST

जायकवाडी धरणाचा विसर्ग वाढवून ७६ हजार क्यूसेक; गोदावरीला पूर

जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. तब्बल ७६ हजार ५५६ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. धरणाचे एकूण १८ दरवाजे उघडण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणातील पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे पाण्याचा निसर्गही वाढवण्यात आला आहे. यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Sep 10, 2022, 08:31 AMIST

Pitru Paksha 2022 : आजपासून पितृपक्ष पंधरवडा

हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे. पितृ पक्षात पूर्वजांचे पूर्ण भक्तीभावाने स्मरण केले जाते आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो.  

Sep 10, 2022, 08:30 AMIST

पंतप्रधान 'केंद्र-राज्य विज्ञान परिषदे' चे करणार उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी १०.३० वाजता  केंद्र-राज्य विज्ञान परिषदेचे उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करणार आहेत. यावेळी ते उपस्थितांना संबोधितही करणार आहेत. 

Sep 10, 2022, 08:04 AMIST

Pune Ganesh Festival : पुण्यातील गणेश मिरवणुका रेंगाळणार; पोलिसांचे नियोजन फसले

पुण्यातील गणपती विसर्जनाच्या मिरवणुका यंदा लांबणीवर पडणार आहेत. मानाच्या ५ गणपतीच्या विसर्जनसाठी तब्बल रात्रीचे ९ वाजले. यामुळे त्या नंतर येणारे मंडळे धीम्या गतीने रात्रभर पुढे जात होती. अल्का चौकत पोलिसांचे कुठलेही नियोजन दिसले नाही. त्यामुळे मिरवणुका या निवांत पुढे जात होत्या.

Sep 10, 2022, 08:00 AMIST

Nagpur accident : नागपूरला भीषण अपघात; चौघेजण तब्बल ७० ते ८० फुट उंच पूलावरून कोसळले

नागपूरच्या सक्करदरा परिसरात भीषण अपघात घडला आहे. या दुर्घटनेत दुचाकीवरील चौघे जण सुमारे ७० ते ८० फूट उंचीवरून खाली फेकले गेले आणि त्यांचा मृत्यू झाला. माहितीनुसार, मृतांमध्ये २ लहान मुलांचाही समावेश आहे.

Sep 10, 2022, 07:46 AMIST

पनवेलमध्ये मोठी दुर्घटना; विसर्जन घाटावर ११ जणांना विजेचा झटका

Marathi News Live Updates : पालिका क्षेत्रात कोळीवाडा विसर्जन घाटावर सायंकाळी साडेसात वाजता जनरेटरसाठी जोडणी घेतलेली विजेची तार गणेशभावीकांच्या अंगावर पडल्याने तब्बल ११ गणेशभक्तांना विजेचा शाॅक (झटका) लागल्याने एकच खळबळ माजली.

    शेअर करा