मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathi News 8 January 2023 Live: मुंबईत १९९३ सारखा बॉम्बस्फोट घडवू; अज्ञात व्यक्तीची पोलिसांना धमकी
Marathi News Live Updates (HT)

Marathi News 8 January 2023 Live: मुंबईत १९९३ सारखा बॉम्बस्फोट घडवू; अज्ञात व्यक्तीची पोलिसांना धमकी

Jan 08, 2023, 06:13 PMIST

Marathi News Live Updates : पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका व्यक्तीला अटक केली असून त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

Jan 08, 2023, 06:13 PMIST

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेस पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट

पुणे : श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भेट दिली. यावेळी क्रीडा आयुक्त डॉ. सुहास दिवसे, महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर, प्रदीप गंधे, तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष अनिल झोडगे, सचिव संदीप ओंबासे उपस्थित होते.

Jan 08, 2023, 02:12 PMIST

मुंबईत १९९३ सारखा बॉम्बस्फोट घडवू; अज्ञात व्यक्तीची पोलिसांना धमकी

ज्या प्रमाणे १९९३ साली मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले होते, त्याच प्रमाणे माहीम, भेंडी बाजार आणि नागपाड्यात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा फोन मुंबई पोलिसांना आला आहे. त्यामुळं मुंबईत खळबळ उडाली असून पोलिसांनी अनेक भागांमध्ये सुरक्षा वाढवली आहे. याशिवाय पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका व्यक्तीला अटक केली असून त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

Jan 08, 2023, 09:21 AMIST

महाराष्ट्रात थंडीची लाट, मुंबई पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये हुडहुडी

Maharashtra Winter : गेल्या महिनाभरापासून राज्यातील अनेक भागांमध्ये थंडीचं सातत्यानं वाढत आहे. मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रसह मुंबई पुण्यातीलही तापमान खालावलं आहे. त्यामुळं थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेकांनी उबदार कपडे घालायला सुरुवात केली असून अनेक ठिकाणी लोकांनी शेकोट्या पेटवायला सुरुवात केली आहे.

Jan 08, 2023, 06:29 AMIST

शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस आज एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्याच्या भारती विद्यापीठातील सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलचे उद्घाटन करण्यासाठी आज एकत्र येणार आहेत. यावेळी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सक्खु हे देखील उपस्थित असतील. त्यामुळं आता कॉंग्रेसच्या मुख्यमंत्र्यासह पवार आणि फडणवीस एकत्र येणार असल्यानं जोरदार राजकीय टोलेबाजी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Jan 08, 2023, 06:29 AMIST

विरोधी पक्षनेते अजित पवार आज कोल्हापुरच्या दौऱ्यावर

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आज कोल्हापुरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते कोल्हापुरात ट्रॉमा केअर सेंटर आणि उपजिल्हा रुग्णालयाचा भूमिपूजन करणार आहेत. त्यानंतर चंदगड तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्काराच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावतील.

Jan 08, 2023, 06:27 AMIST

पडळकरांविरोधात स्थानिक आक्रमक, मिरजमध्ये आज बंदची हाक

सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये शेकडो तरुणांना सोबत घेऊन मध्यरात्री चार हॉटेल्स जेसीबीच्या सहाय्यानं पाडण्याचा आरोप करत मिरजमधील सामान्य नागरिक भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा भाऊ ब्रम्हानंद पडळकर याच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. पाडकाम केल्याच्या निषेधार्थ आज मिरजमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येणार असून व्यापाऱ्यांनाही दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना नागरिकांनी केल्या आहेत. हॉटेल्स पाडल्याप्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांचा भाऊ ब्रह्मानंद पडळकर याच्यासह १०० तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    शेअर करा