मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra HSC result 2022 live update: अपयशानं खचू नका; पुन्हा तयारी करा - CM
Uddhav Thackeray

Maharashtra HSC result 2022 live update: अपयशानं खचू नका; पुन्हा तयारी करा - CM

Jun 08, 2022, 04:01 PMIST

Maharashtra HSC result 2022 live update: बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून दुपारी एक वाजल्यापासून तो https://mahresult.nic.in किंवा www.hscresult.mkcl.org या संकेतस्थळांवर पाहता येईल.

Jun 08, 2022, 03:57 PMIST

Maharashtra HSC result 2022: संधीचं सोनं करा, देशाचं भविष्य उज्वल करा… यशस्वी विद्यार्थ्यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अभिनंदन

बारावीच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केलं आहे. तसंच, त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी, उज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. आयुष्यात परीक्षेतील यशाला महत्व असतेच. परीक्षा भविष्यात येणाऱ्या आव्हानांची तयारी करून घेते. त्यामुळं बारावीच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्यांचं मनःपूर्वक अभिनंदन. यानंतर सुरू होणाऱ्या शैक्षणिक वाटचालीसाठी आणि आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये भविष्य घडवण्यासाठी हार्दिक शुभेच्छा. या वाटचालीतून तुम्हाला आपल्या कुटुंबियांसह, समाज आणि देशाचं भविष्य उज्वल करण्याची संधी मिळणार आहे, या संधीचं आपण सोनं कराल, हा विश्वास आहे. काहींना या टप्प्यावर यशानं थोडक्यात हुलकावणी दिली असेल, अशांनीही खचून न जाता पुन्हा एक संधी म्हणून नव्या जोमानं तयारी केल्यास, यश तुमचंच असेल, असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

Jun 08, 2022, 02:58 PMIST

Maharashtra HSC result 2022: बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं अभिनंदन

राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केलं असून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. बारावीची परीक्षा हा शैक्षणिक जीवनातील एक टप्पा असून अंतिम साध्य नाही, त्यामुळं अनुत्तीर्ण विद्यार्थी व पालकांनी निराश न होता, खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावेत. शिक्षणाच्या बरोबरीनं कला, क्रीडा, तांत्रिक कौशल्य विकसित करून जीवनात यशस्वी होण्याचा प्रयत्न करावा, असं आवाहनही अजित पवार यांनी केलं आहे.

Jun 08, 2022, 12:06 PMIST

Maharashtra HSC result 2022: फेब्रुवारी २०२०-२१ च्या तुलनेत निकालाचा टक्का वाढला

मागील वर्षीच्या तुलनेत बारावीच्या निकालाचा टक्का घसरला असला तरी त्याआधीच्या म्हणजेच, फेब्रुवारी २०२१ च्या तुलनेत निकालाच्या टक्केवारीत ३.५६ टक्क्यांची वाढ झाली आहे.

Jun 08, 2022, 12:03 PMIST

Maharashtra HSC result 2022: बारावीच्या निकालाची टक्केवारी घसरली

मागील वर्षी करोनाच्या काळात बारावीची परीक्षा झाली होती. या परीक्षेचा निकाल ९९.६३ टक्के असा विक्रमी लागला होता. त्या तुलनेत यंदाचा निकाल ५.४१ टक्क्यांनी घसरला आहे. 

Jun 08, 2022, 11:44 AMIST

 Maharashtra HSC result 2022: १७ नंबरचा फॉर्म भरून परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी २९ हजार १०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी ८७.५६ टक्के आहे.

Jun 08, 2022, 11:43 AMIST

Maharashtra HSC result 2022: बारावीच्या परीक्षेत यंदा कॉपी करण्याचे २४२ प्रकार आढळून आले.  ही टक्केवारी ०.०१६ टक्के आहे.

Jun 08, 2022, 11:44 AMIST

Maharashtra HSC result 2022: विभागनिहाय निकालाची टक्केवारी

मुंबई - ९०.९१

कोकण - ९७.२१

पुणे - ९३.६१

नागपूर - ९६.५२

औरंगाबाद - ९४.९७

कोल्हापूर - ९५.०७

अमरावती - ९६.३४

नाशिक - ९५.०३

लातूर - ९५.२५

 

Jun 08, 2022, 11:45 AMIST

 Maharashtra HSC result 2022: उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये यंदाही मुलींची टक्केवारी जास्त

बारावीच्या निकालात यंदाच्या वर्षीही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींच्या निकालाची टक्केवारी ९५.३५ टक्के असून मुलांची टक्केवारी ९३.२९ टक्के आहे. उत्तीर्ण मुलींची टक्केवारी २.०६ टक्क्यांनी जास्त आहे.

Jun 08, 2022, 11:45 AMIST

Maharashtra HSC result 2022: बारावीचा निकाल ९४ टक्के. कोकण विभाग सर्वात पुढे

बारावीच्या निकालात पुन्हा एकदा कोकण विभागानं बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९७.२१ टक्के लागला असून सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे. मुंबई विभागातील ९०.९१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

 

 

Jun 08, 2022, 11:45 AMIST

Maharashtra HSC result 2022: बारावी निकाल जाहीर; राज्य शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद सुरू

Jun 08, 2022, 11:45 AMIST

Maharashtra HSC result 2022: बारावीच्या परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना १७ जून रोजी त्यांच्या कॉलेजमध्ये दुपारी तीन वाजल्यापासून गुणपत्रिका मिळणार आहेत.

Jun 08, 2022, 11:45 AMIST

Maharashtra HSC result 2022: बारावीचा निकाल जाहीर होण्यासाठी उरले केवळ काही तास. विद्यार्थी, पालकांची धाकधूक वाढली

Jun 08, 2022, 11:46 AMIST

Maharashtra HSC result 2022: बारावीचा निकाल खालील संकेतस्थळांवर ऑनलाइन पाहता येईल.

बारावीचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे पुढीलप्रमाणे:

https://mahresult.nic.in

www.hscresult.mkcl.org

https://hscmahresult.org.in

Jun 08, 2022, 11:45 AMIST

Maharashtra HSC result 2022: बारावीच्या परीक्षेचा आज निकाल, दुपारी १ वाजता होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा आज निकाल लागणार आहे. बोर्डाच्या संकेतस्थळावर दुपारी एक वाजता निकाल जाहीर होईल.

    शेअर करा