मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Live Blog: राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित झाल्यानंतर NCP चा तिरकस टोला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

Live Blog: राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित झाल्यानंतर NCP चा तिरकस टोला

May 20, 2022, 02:06 PMIST

Daily News Update

May 20, 2022, 01:26 PMIST

'नवीन भोंगा…' राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला स्थगितीवरून राष्ट्रवादीची टीका

राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विटरवरून मनसेला खोचक टोला लगावला आहे. “तूर्तास अयोध्या दौऱ्याचा भोंगा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटविण्यासाठी नवीन भोंगा कोणता लावावा यावर विचारविनिमय सुरू आहे. सविस्तर बोलूच...” असं ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसने केलं आहे.

May 20, 2022, 12:22 PMIST

सिद्धूंनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत शरणागतीसाठी मागितला वेळ

काँग्रेसचे नेत नवज्योत सिंग सिद्धू यांना प्रकृतीचं कारण देत ३४ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात शरणागती पत्करण्यासाठी आणखी वेळ देण्याची मागणी केली आहे. यावर न्यायाधीश ए एम खानविलकर यांनी हे प्रकरण सरन्यायाधीशांसमोर सादर करण्यास सांगितलं.

May 20, 2022, 12:08 PMIST

आमचं थोबाड बंद रहावं म्हणून सरकारचा खटाटोप - संदीप देशपांडे

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना संदीप देशपांडे यांनी म्हटलं की, आमच्यावर जो गुन्हा दाखल केला तो खोटा होता, त्या खोट्या गुन्ह्यासाठी महाराष्ट्र पोलिस आम्हाला शोधत होते. कोणताही गुन्हा घडला नव्हता आणि आमचा धक्का लागला नव्हता. आम्ही सरकारविरोधात बोलू नये, थोबाड बंद रहावं म्हणून हा त्यांचा खटाटोप होता. आम्हाला न्यायालयाने न्याय दिला. केंद्र सरकार सुडाचं राजकारण करतं असा तुम्ही आरोप करताय, पण मग तुम्ही काय करताय असा प्रश्नही संदीप देशपांडे यांनी विचारला.

May 20, 2022, 10:36 AMIST

काश्मीर : जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर बोगद्याचा भाग कोसळला, १० जण अडकले

काश्मीरमध्ये जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर रामबन इथे खूनी नाला बोगद्याचा काही कोसळला आहे. यामध्ये दहा कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

May 20, 2022, 10:27 AMIST

गुरुवारच्या पडझडीनंतर शेअर बाजार सावरला. सेन्सेक्स हजार अंकांनी उसळला, निफ्टीही जोरात

May 20, 2022, 09:29 AMIST

कर्नाटकमध्ये मुसळधार पाऊस, धारवाडमध्ये आज शाळा, कॉलेज बंद

कर्नाटकात मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर धारवाड जिल्ह्यात शाळा आणि काॅलेजेस बंद राहणार आहेत.

May 20, 2022, 08:53 AMIST

राज ठाकरे यांचा अय़ोध्या दौरा तूर्तास स्थगित

राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्यात आल्याची माहिती समजते. अयोध्या दौऱ्याची नवी तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, दौरा रद्द करण्याचे कारण अद्याप समोर आलेलं नाही.

May 20, 2022, 08:07 AMIST

लालूंच्या घरासह १५ ठिकाणांवर CBI चे छापे, मुलीसह त्यांच्यावर नवा गुन्हा दाखल

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि त्यांची मुलगी मीसा भारती यांच्या घरासह १५ ठिकाणी सीबीआयने छापा टाकला आहे. त्याच्या कार्यकाळात भरतीमध्ये अनियमितता प्रकरणी नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

May 20, 2022, 07:53 AMIST

राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस, पीकांचे नुकसान

राज्यात वादळी वारे, वीजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नांदेड, जालना, यवतमाळ, वर्धा, नागपूरमध्ये जोरदार पाऊस पडला आहे. काल सायंकाळी सुरु झालेला पाऊस काही ठिकाणी अद्याप सुरु आहे. यामुळे पीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. येत्या दोन दिवसांत राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून, विदर्भातही मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

    शेअर करा