मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Live Blog: विधान परिषद निवडणूक, सदाभाऊ खोत यांची माघार
देवेंद्र फडणवीस आणि सदाभाऊ खोत

Live Blog: विधान परिषद निवडणूक, सदाभाऊ खोत यांची माघार

Jun 13, 2022, 02:46 PMIST

Daily News Update

Jun 13, 2022, 03:04 PMIST

सदाभाऊ खोत यांनी अर्ज घेतला मागे

विधान परिषदेच्या निवडणुकीत सदाभाऊ खोत यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर सदाभाऊंनी अर्ज मागे घेतला आहे.

Jun 13, 2022, 02:46 PMIST

राहुल गांधींची ३ तासांपासून ED कार्यालयात, प्रियांका पोहोचल्या पोलिस ठाण्यात

गेल्या तीन तासांपासून ईडीकडून राहुल गांधींची चौकशी सुरु आहे. दरम्यान, ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांसह नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांची भेट घेण्यासाठी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी तुघलक रोड पोलिस ठाण्यात पोहोचल्या आहेत.

Jun 13, 2022, 12:56 PMIST

ईडीने पहिल्या टप्प्यात राहुल गांधींच्या बँक खात्यांची केली चौकशी

ईडीने राहुल गांधी यांची पहिल्या टप्प्यातील चौकशी पूर्ण केल्याचे समजते. यामध्ये राहुल गांधींच्या देश,विदेशातील बँक खाती आणि मालमत्तेबाबत प्रश्न विचारल्याचं सांगितलं जात आहे.

Jun 13, 2022, 11:19 AMIST

राहुल गांधी ईडी कार्यालयात पोहोचले, थोड्यात वेळाच चौकशी सुरू

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीची नोटीस आल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी ईडी कार्यालयात पोहोचले आहेत. थोड्याच वेळात त्यांची चौकशी सुरू होईल.

Jun 13, 2022, 09:22 AMIST

राहुल गांधी आमचे राम, ईडीच्या समन्सविरोधात काँग्रेसचे आंदोलन

सध्याचं सरकार हे रावण असल्यासारखं वागत आहे. आम्ही त्यांना सांगू इच्छितो की, राहुल गांधी आमचे राम आहेत. आम्ही त्यांची पूजा करतो. जोपर्यंत राहुल गांधी ईडी कार्यालयातून बाहेर येत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहू अशी प्रतिक्रिया काँग्रेस कार्यकर्त्याने दिली.

Jun 13, 2022, 08:38 AMIST

राहुल गांधींना समन्सविरोधात काँग्रेसचा ईडीच्या कार्यालयावर मोर्चा

राहुल गांधींना ईडीकडून पाठवण्यात आलेल्या समन्सच्या निषेधार्थ काँग्रेसकडून देशव्यापी आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात काँग्रेस नेते ईडीच्या कार्यालयावर निषेध मोर्चा काढणार आहेत.

Jun 13, 2022, 08:16 AMIST

दिल्ली पोलिसांनी काँग्रेस नेत्यांना घेतलं ताब्यात

राहुल गांधींच्या समर्थनार्थ दिल्लीत त्यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेस नेत्यांनीगर्दी केली होती. दिल्ली पोलिसांनी या घोषणाबाजी करणाऱ्या नेत्यांना ताब्यात घेतले.

Jun 13, 2022, 08:00 AMIST

राहुल गांधी ईडीसमोर लावणार हजेरी

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रसेचे माजी अध्यक्ष राहुल गांधी ईडीसमोर आज हजर राहणार आहेत. ईडीने राहुल गांधी यांच्यासह सोनिया गांधींनासुद्धा नोटीस पाठवली होती. सोनिया गांधींना कोरोनाची लागण झाल्याने त्या हजर राहणार नसल्याचं सांगण्यात येत आहे.

Jun 13, 2022, 07:27 AMIST

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपी संतोष जाधवला अटक

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपींपैकी एक असलेल्या संतोष जाधवला त्याच्या सहकाऱ्यासह पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. त्याला गुजराच्या कच्छमधून ताब्यात घेण्यात आले. संतोष जाधवसह त्याच्या सहकाऱ्याला पोलिसांनी अटक केली असून रात्री बारा वाजता न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले. दोघांनाही २० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

    शेअर करा