मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Live Blog: नुपूर शर्मांच्या वक्तव्याविरोधात दिल्ली, उत्तर प्रदेशात आंदोलन
भाजपने नुपूर शर्मा यांना वादग्रस्त वक्तव्यानंतर केलं निलंबित (फोटो - पीटीआय)

Live Blog: नुपूर शर्मांच्या वक्तव्याविरोधात दिल्ली, उत्तर प्रदेशात आंदोलन

Jun 10, 2022, 08:05 PMIST

Daily News Update

Jun 10, 2022, 08:04 PMIST

राज्यात २२१ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी प्रारूप मतदार याद्यांची २१ जूनला प्रसिद्धी

विविध जिल्ह्यांमधील २२१ नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २१ जून २०२२ रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर २७ जून २०२२ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने आज येथे केली. मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेल्या २२१ नगरपरिषदा/ पंचायतींमध्ये २०८ नगरपरिषदा आणि १३ नगरपंचायतींचा समावेश आहे. 

Jun 10, 2022, 05:11 PMIST

नवी मुंबईतील मोरबे धरणातील पाण्याची पातळी खालावली

नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणातील पाण्याची पातळी खालावली आहे. धरणातील पाण्याची पातळी ७१.४५ मीटर उरली आहे. गेल्या वर्षी जून महिन्याच्या तुलनेत ही पातळी १.०३ मीटरने कमी झाली आहे. उपलब्ध पाणी साठ्याद्वारे नवी मुंबई महापालिका शहराला पुढील ७० दिवस म्हणजे १८ ऑगस्ट २०२२ पर्यंत पाणी पुरवठा करू शकते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पाण्याची अडचण मिटावी यासाठी चांगल्या मान्सूनची अपेक्षा करण्यात येत आहे.

<p>Morbe Dam (file picture)</p>
Morbe Dam (file picture)

Jun 10, 2022, 05:02 PMIST

नुपूर शर्मांच्या वक्तव्याविरोधात दिल्ली, उत्तर प्रदेशात आंदोलन

भाजपच्या माजी नेत्या नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदल यांनी पैगंबरांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर सुरू झालेला वाद अद्याप थांबलेला नाही. दिल्ली आणि उत्तर प्रदेशात याविरोधात मोठे आंदोलन सुरू आहे. शुक्रवारी नमाज पठणानंतर हे आंदोलन करण्यात आले. दिल्लीती जामा मशिदीबाहेर मोठ्या संख्येने आंदोलकांनी एकत्र येत घोषणाबाजी केली.

<p>Members of Muslim community protesting in Prayagraj in UP after the Friday prayers.</p>
Members of Muslim community protesting in Prayagraj in UP after the Friday prayers.

Jun 10, 2022, 11:23 AMIST

NEET PG 2021 : नीट पीजीच्या १४५६ जागा स्ट्रे राउंड काउन्सिलिंगने भरण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. यासंदर्भात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे.

Jun 10, 2022, 10:11 AMIST

देशात सलग दुसऱ्या दिवशी ७ हजारांहून जास्त कोरोनाबाधित

देशात सलग दुसऱ्या दिवशी ७ हजारांंहून जास्त कोरोना बाधितांची नोंद झाली. गेल्या २४ तासात देशात ७ हजार ५८४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ३ हजार ७९१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर २४ जणांचा मृत्यू झाला आहे.

Jun 10, 2022, 09:51 AMIST

Rajya Sabha Poll: कर्नाटक, राजस्थान, हरयाणामध्येही होतं राज्यसभेसाठी मतदान

महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, राजस्थान व हरयाणातही राज्यसभेसाठी मतदान होत आहे. या राज्यांतून एकूण १० उमेदवार राज्यसभेवर जाणार आहेत.

Jun 10, 2022, 09:32 AMIST

Rajya Sabha Poll: काँग्रेस नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून विजयाचा दावा

महाविकास आघाडीचे चारही उमेदवार पहिल्या पसंतीच्या मतांनीच विजयी होतील, असा विश्वास काँग्रेसचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.

Jun 10, 2022, 09:32 AMIST

Rajya Sabha Poll: राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात

राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानाला विधान भवनात सुरुवात झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता भरणे यांनी पहिलं मतदान केलं आहे.

Jun 10, 2022, 09:32 AMIST

Rajya Sabha Poll: महाविकास आघाडीतला संजय जाणार, भाजप नेत्याचं विधान

महाभारतात जसा अश्वत्थामा गेला होता, तसा महाविकास आघाडीतला कोणता तरी संजय जाणार आहे, ते साडेपाच वाजल्यानंतर माहिती पडेल असं विधान भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी केलं आहे.

Jun 10, 2022, 09:32 AMIST

Rajya Sabha Poll: सहाव्या जागेसाठी चुरस अशी हवा विरोधकांनी तयार केलीय - संजय राऊत

निवडणुकीला सहाव्या जागेसाठी चुरस असल्याची हवा विरोधकांनी तयार केलीय. पण महाविकास आघाडीचे चारही उमेदवार हे पहिल्या फेरीत निवडून येतील असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

Jun 10, 2022, 09:32 AMIST

Rajya Sabha Poll: राज्यसभेसाठी इतर तीन राज्यातही मतदान, एकूण १६ जागांसाठी निवडणूक

महाराष्ट्रासह राजस्थान, कर्नाटक आणि हरयाणात आज राज्यसभेसाठी मतदान होत आहे. यामध्ये १६ जागांसाठी मतदान होणार आहे. याआधी १५ राज्यातील ४१ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.

Jun 10, 2022, 09:32 AMIST

Rajya Sabha Poll: भाजप आमदार अॅम्ब्युलन्सने पुण्यातून मुंबईत मतदानासाठी पोहोचणार

पिंपरी चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप हे अॅम्ब्युलन्समधून मतदानासाठी जाणार आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून ते कोमात होते, २ जूनला त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. राज्यसभेच्या मतदानासाठी ते अॅम्ब्युलन्सने निघाले आहेत.

Jun 10, 2022, 09:32 AMIST

Rajya Sabha Poll: मतदानासाठी आमदार विधानभवनात दाखल

राज्यसभेसाठी मतदान करायला आमदार विधानभवनात आले आहेत. शिवसेना, भाजप, काँग्रेसचे आमदार विधानभवनात पोहोचले आहेत.

Jun 10, 2022, 09:33 AMIST

Rajya Sabha Poll: राज्यसभेत AIMIM चा महाविकास आघाडीला पाठिंबा

महाराष्ट्रात एमआय़एमचे नेते इम्तियाज जलील यांनी मोठी घोषणा करताना राज्यसभेसाठी महाविकास आघाडीला पाठिंबा देणार असल्याचं सांगितलं. भाजपला हरवण्यासाठी आमच्या पक्षाने महाराष्ट्रात राज्यसभेसाठी महाविकास आघाडीला मत देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात आमचे दोन आमदार काँग्रेस उमेदवार इम्रान प्रतापगडी यांना मत देणार आहेत असं त्यांनी इम्तियाज जलील यांनी म्हटलं.

Jun 10, 2022, 09:33 AMIST

Rajya Sabha Poll:महाविकास आघाडीला धक्का, मलिक आणि देशमुखांना मतदानाचा अधिकार नाकारला

ईडीच्या अटकेत असलेले नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना राज्यसभेसाठी मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला आहे. यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. दोघांनीही मतदानासाठी न्यायालयात अर्ज केला होता. 

Jun 10, 2022, 09:44 AMIST

Rajya Sabha Poll: राज्यसभेसाठी आज मतदान होणार

राज्यसभेसाठी आज मतदान होणार आहे. सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत मतदानासाठी वेळ असून ४ वाजल्यानतंर मतमोजणी होईल.

    शेअर करा