मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Live News Updates 22 February 2023 : सत्ता संघर्षाच्या सुनावणीचा दुसरा दिवस, ठाकरे गटाच्या याचिकेवर आज होणार सुनावणी
Supreme Court Hearing On Maharashtra Political Update Live (HT)

Live News Updates 22 February 2023 : सत्ता संघर्षाच्या सुनावणीचा दुसरा दिवस, ठाकरे गटाच्या याचिकेवर आज होणार सुनावणी

Feb 22, 2023, 09:39 AMIST

Maharashtra Politics : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुप्रिम कोर्टातल्या सुनावणीचा आज दुसरा दिवस आहे. काल पहिल्या दिवशी उद्धव ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला. तसेच आज निवडणूक आयोगाच्या निकालावर देखील ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

Feb 22, 2023, 09:39 AMIST

Sensex Nifty opening :  सेन्सेक्स निफ्टीची सुरुवात घसरणीने, अदानी स्टाॅकमध्ये २.५ टक्के घट

कमकूवत जागतिक संकेतांमुळे बुधवारी शेअर बाजाराची सुरुवात नकारात्मक झाली. सेन्सेक्स ६०४०० आणि निफ्टी १७७०० च्या पातळीवर व्यवहार करत आहेत. बँकिंग आणि आयटी शेअर्स बाजारात विक्रीमध्ये आघाडीवर आहेत. निफ्टी मधील टॉप लूझर स्टॉकममध्ये अदानी एंटरप्रायझेस असून त्यात २.५% घसरण झाली आहे. यापूर्वी अमेरिकन बाजारात डाऊ, नॅसडॅक २% ने घसरले होते. जगभरातील बाजारातील घसरणीसाठी जबाबदार यूएस फेड मिनिटे आहे. काल सेन्सेक्स १८ अंकांच्या किंचित घसरणीसह ६०,६७२ च्या पातळीवर बंद झाला. आज बाजार विदेशी गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीच्या प्रवाहासह देशांतर्गत घडामोडींवर लक्ष ठेवेल.

Feb 22, 2023, 07:01 AMIST

Mumbai Fire : मुंबईतील कमला नगर येथील झोपडपट्टीत भीषण आग; अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी

Mumbai Fire : मुंबईतील कमला नगर येथील झोपडपट्टीत मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. सुदैवाने या घटनेत कुणी जखमी झाले नाही.

मुंबईतील कमला नगर येथील झोपडपट्टीत भीषण आग; अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी
मुंबईतील कमला नगर येथील झोपडपट्टीत भीषण आग; अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी

Feb 22, 2023, 06:27 AMIST

Pune MPSC Student Protest " एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलनाचा तिसरा दिवस

एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट देऊन काल विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेऊन या प्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावून मार्ग काढू असे आश्वासन दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी उपोषण मागे घेतले आहे. परंतु, आंदोलनावर विद्यार्थी ठाम आहेत.

Feb 22, 2023, 06:26 AMIST

Pune Bypoll : कसबा चिंचवड प्रचाराचा धडाका; उरले फक्त तीन दिवस, शरद पवार यांच्या कसब्यात तीन सभा

कसब्यातील कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा प्रचार दौरा आहे. ते दुपारी ४ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत तीन सभा घेणार आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संध्याकाळी ५ वाजता रोड शो करणार. त्यानंतर संध्याकाळी ७ वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे. याबरोबरच छगन बुजबळ आणि धनंजय मुंडे यांची जाहीर सभा होणार आहे.

Feb 22, 2023, 06:24 AMIST

Maharashtra Politics : राज्य मंत्रिमंडळाची आज १२ वाजता बैठक

राज्य मंत्रिमंडळाची बैठक दुपारी १२ वाजता सह्याद्री अतिथीगृह होणार आहे. शिंदे गटाला शिवसेना नाव आणि चिन्हं मिळाल्यानंतर पहिली मंत्रीमंडळ बैठक आहे.

Feb 22, 2023, 06:23 AMIST

Sharad Pawar : चिंचवडमध्ये शरद पवार यांची आज पत्रकार परिषद

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज सकाळी १०.३०  वाजत पत्रकार परिषद होणार आहे.

Feb 22, 2023, 06:21 AMIST

Maharashtra Politics : सत्ता संघर्षाच्या सुनावणीचा दुसरा दिवस, ठाकरे गटाच्या याचिकेवर होणार सुनावणी

 महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुप्रिम कोर्टातल्या सुनावणीचा आज दुसरा दिवस आहे. काल पहिल्या दिवशी उद्धव ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला. तसेच आज निवडणूक आयोगाच्या निकालावर देखील ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

    शेअर करा