मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Live News Updates 20 March 2023 : पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची भेट
उषा मंगेशकर यांनी घेतली राज्यपाल बैस यांची भेट

Live News Updates 20 March 2023 : पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची भेट

Mar 21, 2023, 11:29 AMIST

ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांनी राज्यपाल रमेश बैस यांची मुंबईत राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी उषा मंगेशकर यांनी राज्यपालांना आपण काढलेल्या चित्रांचे तसेच मंगेशकर परिवारातील इतर सदस्यांनी काढलेल्या कलाकृतींचा समावेश असलेले 'स्ट्रोक्स ऑफ हार्मनी' हे कॉफी टेबल पुस्तक भेट दिले. यावेळी आदिनाथ मंगेशकर व कृष्णा मंगेशकर देखील उपस्थित होते.

Mar 21, 2023, 11:27 AMIST

Chandrakant Patil : पानशेत पूरग्रस्त पुनर्वसित सहकारी सोसायटींच्या भाडेपट्टा जमिनीसंदर्भात राज्य शासन सकारात्मक : चंद्रकांत पाटील

मुंबई : पुणे जिल्ह्यातील सन १९६१ च्या पानशेत पुरानंतर विस्थापित झालेल्या लोकांच्या पुनर्वसित सहकारी सोसायट्यांना भाडेपट्याने देण्यात आलेल्या जमिनीसंदर्भात शासन सकारात्मक आहे. याबाबत मालक आणि भाडेकरू यांचे हक्क अबाधित ठेवून लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील

Mar 20, 2023, 05:33 PMIST

Closing bell :  निर्देशांकात अंदाजे ८०० अंशांची घसरगुंडी, दिवसअखेर ३६१ अंश घट

देशांतर्गत शेअर बाजार सोमवारी घसरणीसह बंद झाले. बीएसई सेन्सेक्स ३६१ अंकांनी म्हणजेच ०.६२ टक्क्यांनी घसरला आणि ५७,६२८.९५ अंकांच्या पातळीवर बंद झाला. त्याचप्रमाणे एनएसई निफ्टी १११.६५ अंकांच्या घसरणीसह म्हणजेच ०.६५ टक्क्यांच्या घसरणीसह १६,९८८.४० अंकांच्या पातळीवर बंद झाला. एफएमसीजी क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल चिन्हाने बंद झाले. रिअल इस्टेट, आयटी, मेटल आणि पीएसयू बँक १-२ टक्क्यांनी घसरून बंद झाले.

Mar 20, 2023, 09:16 AMIST

Opening Bell : सेन्सेक्स निफ्टीची सुरुवात निराशाजनक 

आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या कमकूवत संकेतांच्या पार्श्वभूमीवर आज आठवड्याच्या पहिल्याच सत्रात निर्देशांकांची सुरुवात खराब झाली आहे. सेन्सेक्समध्ये आज सुरुवातीलाच २१६. ३५ अंश (०.३७ टक्के) घसगुंडी नोंदवत तो अंदाजे ५७७७३.५५ अंश पातळीवर खुला झाला आहे. निफ्टीतही आज ३३.४५ अंशांची (०.२० टक्के) घट नोंदवत तो १७,०६६.६० अंश पातळीवर खुला झाला.

Mar 20, 2023, 07:14 AMIST

maharashtra assembly winter session : विधिमंडळ अधिवेशनाचा शेवटचा आठवडा

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु होतोय. अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यावरती चर्चा आणि उत्तर होईल. मुंबईच्या चर्चेवरती सत्ताधारी आमदारांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. यावरती नगरविकास विभागाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री उत्तर देतील.

Mar 20, 2023, 07:13 AMIST

Akola News : अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचा आज मोर्चा

महापालिकेने केलेली कर दरवाढ, स्वच्छतेचा प्रश्न, महापालिकेच्या प्रशासनाचा उडालेला बोजवारा या सर्व मुद्द्यांविरोधात वंचित बहुजन आघाडीचा आज मोर्चा काढणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने या मोर्चाद्वारे शक्तिप्रदर्शन करण्याचा वंचितचा प्रयत्न आहे.

Mar 20, 2023, 07:09 AMIST

G20 Summit :जी २० परिषदेच्या सिव्हिल ट्वेंटी या उपसमितीची आजपासून दोन दिवसीय बैठक

जी २० परिषदेच्या सिव्हिल ट्वेंटी या उपसमितीची दोन दिवसीय बैठक आजपासून नागपुरात सुरू होतीये. सकाळी ९ वाजता बैठकीला सुरुवात होणार असून सकाळच्या सत्रात विकास आणि पर्यावरणीय समतोल या विषयावरील चर्चासत्र होणार आहे. दुपारी ३ वाजता सिव्हिल ट्वेंटी (c20) बैठकीचा औपचारिक उद्घाटन होणार असून त्यामध्ये आध्यात्मिक नेत्या माता अमृतानंदमयी या अध्यक्ष असणार आहे. उद्घाटन सोहळ्यात नोबल शांतता पारितोषिक विजेता कैलास सत्यार्थी यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही उपस्थित राहणार आहे.

    शेअर करा