मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  LSG vs MI Highlight: लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध सामन्यात मुंबई इंडियन्सचा चार विकेट्सने पराभव
आयपीएल २०२४: लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याचे लाईव्ह अपडेट्स

LSG vs MI Highlight: लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध सामन्यात मुंबई इंडियन्सचा चार विकेट्सने पराभव

Apr 30, 2024, 11:32 PMIST

Lucknow Super Giants vs Mumbai Indians: लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएल २०२४ मधील ४८ वा सामना खेळला जात आहे.

Apr 30, 2024, 11:03 PMIST

अर्धशतक झळकावून स्टॉइनिस पॅव्हेलियनमध्ये परतला.

मोहम्मद नबीने लखनौला चौथा धक्का दिला. त्याने मार्कस स्टॉइनिसला झेलबाद केले. या सामन्यात त्याने ३९ चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याने ६२ धावा करून बाद झाला. सध्या निकोलस पूरन आणि ॲश्टन टर्नर क्रीजवर आहेत.

Apr 30, 2024, 10:05 PMIST

LSG vs MI: मुंबईची सुरुवातीलाच पकड घट्ट

 मुंबईच्या गोलंदाजांनी सुरुवातीलाच चांगली गोलंदाजी केली आहे. लखनौने तीन षटकात ११ धावा केल्या आहेत. राहुल धावांसाठी झगडत आहे. त्याने १३ चेंडूत ५ धावा केल्या आहेत. स्टॉइनिस ४ चेंडूत ५ धावा करून क्रीजवर आहे.

Apr 30, 2024, 08:31 PMIST

मुंबई इंडियन्सने ५० धावांचा पल्ला गाठला

मुंबई इंडियन्सने डगमगत १० षटकात ५० धावांचा टप्पा पार केला. इशान २१ धावा आणि वढेरा ९ धावांवर खेळत आहे. दोघांमधील ३० धावांची भागीदारी पूर्ण झाली.

Apr 30, 2024, 07:39 PMIST

Mumbai Indians: मुंबई इंडियन्सच्या डावाला सुरुवात

मुंबईचा डाव सुरू झाला आहे. इशान किशन आणि रोहित शर्मा फलंदाजीसाठी मैदानात उतरले आहेत. अष्टपैलू मार्कस स्टोइसने लखनौसाठी पहिले षटक टाकले आणि दोन धावा दिल्या.

Apr 30, 2024, 07:16 PMIST

LSG vs MI Live Score: लखनौचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय

लखनौने मुंबईविरुद्ध नाणेफेक जिंकून लखनौचा कर्णधार केएल राहुलने लक्ष्याचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला. 

Apr 30, 2024, 06:45 PMIST

मुंबई इंडियन्ससाठी महत्त्वाचा सामना

मुंबई इंडियन्ससाठी आजचा सामना करो या मरोचा असेल. लखनौविरुद्ध सामन्यातील पराभव मुंबई आणि प्लेऑफमधील अंतर आणखी वाढवू शकतो.

Apr 30, 2024, 06:40 PMIST

LSG Squads: लखनौ सुपर जायंट्सचा संघ

क्विंटन डी कॉक, केएल राहुल (विकेटकिपर, कर्णधार), मार्कस स्टोइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसीन खान, यश ठाकूर, अमित मिश्रा, अर्शीन कुलकर्णी, कृष्णप्पा गौथम, मणिमरन सिद्धार्थ, युधवीर सिंग चरक, मयंक यादव, काइल मेयर्स, ॲश्टन टर्नर, प्रेरक मंकड, नवीन-उल-हक, देवदत्त पडिक्कल, अर्शद खान, शामर जोसेफ.

Apr 30, 2024, 06:40 PMIST

Mumbai Indians Squads: मुंबई इंडियन्सचा संघ

हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), रोमॅरियो शेफर्ड, शम्स मुलानी, गेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, क्वेना माफाका, मोहम्मद नबी, सूर्यकुमार यादव, श्रेयस गोपाल, नुवान ब्रेवाड, लुकाउड, लुकाऊ , विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, नेहल वढेरा, कुमार कार्तिकेय, शिवालिक शर्मा, अंशुल कंबोज, आकाश मधवाल, नमन धीर, टिळक वर्मा, टिम डेव्हिड.

    शेअर करा