मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Yes Bank : येस बँकेची रुपे क्रेडिट कार्ड युपीआय पेमेंट सुविधा सुरू, अशी आहे प्रोसेस

Yes Bank : येस बँकेची रुपे क्रेडिट कार्ड युपीआय पेमेंट सुविधा सुरू, अशी आहे प्रोसेस

Jul 30, 2023, 12:36 AM IST

    • Yes bank : बँकेने आज रूपे क्रेडिट कार्डाद्वारे युपीआय पेमेंट करण्याची सुविधा लाँच केली. ग्राहकांना आता त्यांचे येस बँक रूपे क्रेडिट कार्ड भिम, फोनपे, पेटीएम, गुगल पे, स्लाइस, मोबिक्विक, पेझॅप या व अशा युपीआय अनेबल्ड अप्सशी जोडता येणार आहे.
yes bank HT

Yes bank : बँकेने आज रूपे क्रेडिट कार्डाद्वारे युपीआय पेमेंट करण्याची सुविधा लाँच केली. ग्राहकांना आता त्यांचे येस बँक रूपे क्रेडिट कार्ड भिम, फोनपे, पेटीएम, गुगल पे, स्लाइस, मोबिक्विक, पेझॅप या व अशा युपीआय अनेबल्ड अप्सशी जोडता येणार आहे.

    • Yes bank : बँकेने आज रूपे क्रेडिट कार्डाद्वारे युपीआय पेमेंट करण्याची सुविधा लाँच केली. ग्राहकांना आता त्यांचे येस बँक रूपे क्रेडिट कार्ड भिम, फोनपे, पेटीएम, गुगल पे, स्लाइस, मोबिक्विक, पेझॅप या व अशा युपीआय अनेबल्ड अप्सशी जोडता येणार आहे.

yes bank : रूपे क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून युपीआय पेमेंट सुविधा लाँच करण्यामुळे ग्राहकांना युपीआय प्लॅटफॉर्मवर ‘क्रेडिट मुक्त’ काळाचा आनंद घेता येणार आहे, जो पूर्वी केवळ पीओएस/ईकॉमवर आधारित व्यवहारांपुरता मर्यादित होता. येस बँक क्रेडिट कार्ड असलेल्या आणि रूपे क्रेडिट कार्ड नसलेल्या कोणत्याही ग्राहकाला व्हर्च्युअल येस बँक रूपे क्रेडिट कार्ड घेऊन ते सद्य युपीआय अ‍ॅपशी जोडता येईल.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

रूपे क्रेडिट कार्डावर युपीआय अनेबल करण्याची ही सुविधा पेमेंट्स क्षेत्रात क्रांती आणेल, कारण त्यामुळे ग्राहकांना विविध लाभ मिळतील तसेच युपीआय प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या लाखो व्यापाऱ्यांची पेमेंट स्वीकारार्हता वाढेल. दरम्यान क्रेडिट कार्डाचे फायदेही मिळतील.

या लाँचविषयी येस बँकेचे कार्यकारी संचालक राजन पेंटल म्हणाले, ‘आज देशातील एकूण युपीआय मर्चंट व्यवहारांमध्ये येस बँकेचा सुमारे ४० टक्के वाटा आहे. बँकेने गेल्या काही वर्षांत तयार केलेली डिजिटल सक्षमता तयार केली असून त्याच्या मदतीने व्यापक प्रमाणावर डिजिटल व्यवहार सुरळीत करण्याची क्षमता बँकेकडे आहे. यामुळे लाखो ग्राहकांना तत्पर सेवा मिळण्यास मदत होते. रूपे क्रेडिट कार्डावर लाँच करण्यात आलेली युपीआय पेमेट सेवा हे ग्राहकांना लाभदायक आणि सोयीस्कर बँकिंग सेवा देण्याच्या आमच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. या सहकार्याच्या माध्यमातून आम्ही डिजिटल पातळीवर सक्षम अर्थव्यवस्था उभारण्याच्या दिशेने भारत करत असलेल्या प्रवासाला चालना देण्याचे ठरवले आहे. हे करताना ग्राहकांना सुरक्षित आणि सोपी पेमेंट सुविधा देण्यावर आमचा कटाक्ष आहे.’

येस बँक रूपे क्रेडिट कार्डामुळे ग्राहकांना पुढील फायदे मिळतील -

सुरक्षा : येस बँक रूपे क्रेडिट कार्डात सुरक्षेच्या उपाययोजनांचा समावेश करण्यात आला असून त्यामुळे ग्राहकांची आर्थिक माहिती सुरक्षित राहाते.

रिवॉर्ड पॉइंट्स – ग्राहकांना युपीआय व्यवहारांवर आकर्षक रिवॉर्ड पॉइंट्स मिळवता येतील.

क्रेडिट- मुक्त कालावधीत कार्यक्षम – क्रेडिट कार्डाच्या क्रेडिट मुक्त कालावधीचा वापर करत ग्राहकांना युपीआय वापरताना त्यांचे पैसे जास्त प्रभावीपणे वापरता येतील.

·एकत्रित बिलिंग – येस बँकेने महिन्यातून एकदा युपीआय पेमेंट्सचे एकत्रित बिल क्रेडिट कार्ड स्टेटमेंटद्वारे पुरवण्याची सोय केली असल्यामुळे ग्राहकांसाठी आर्थिक व्यवस्थापन जास्त सोपे होते.

येस बँक रूपे क्रेडिट कार्ड युपीआयवर लिंक करण्याच्या स्टेप्स

· प्रोफाइल आयकॉन/ बँक अकाउंट आयकॉनवर क्लिक करा.

· बँकेच्या नावापुढे खाली ‘येस बँक’ निवडा

· येस बँक रूपे क्रेडिट कार्ड शोधा आणि पडताळणी करा.

 

विभाग

पुढील बातम्या