मराठी बातम्या  /  बिझनेस  /  First Ethanol Innova Launch : संपूर्णपणे इथेनाॅलवर चालणारी इनोव्हा दाखल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन

First Ethanol Innova Launch : संपूर्णपणे इथेनाॅलवर चालणारी इनोव्हा दाखल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन

Aug 29, 2023, 03:00 PM IST

    • First Ethanol Innova Launch : टोयोटा मोटर १०० टक्के इथेनाॅल बेस्ड दाखल करणारी जगातील पहिली उत्पादक कंपनी बनली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या गाडीचे उद्घाटन आज झाले.
First Ethanol Innova Launch HT

First Ethanol Innova Launch : टोयोटा मोटर १०० टक्के इथेनाॅल बेस्ड दाखल करणारी जगातील पहिली उत्पादक कंपनी बनली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या गाडीचे उद्घाटन आज झाले.

    • First Ethanol Innova Launch : टोयोटा मोटर १०० टक्के इथेनाॅल बेस्ड दाखल करणारी जगातील पहिली उत्पादक कंपनी बनली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या गाडीचे उद्घाटन आज झाले.

First Ethanol Innova Launch : १०० टक्के इथेनाॅलवर आधारित असलेली एमपीव्ही सेगमेंटमध्ये इनोव्हा हायक्राॅस दाखल करणारी पहिली कंपनी बनली आहे. आज कंपनीने बेस्ड माॅडेल दाखल केले आहे. इनोव्हा इलेक्ट्रिक फ्लेक्स - फ्यूएल सर्टिफिकेट्ससह भारत स्टेज ६ वाहनांसह येणारे हे पहिले बेस्ड माॅडेल ठरले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच एका शिखर संम्मेलनात अपकमिंग लाँन्चची घोषणा केली आहे. इनोव्हा माॅडेलचे लाँन्च हे एक चांगले उदाहरण आहे. ज्या कंपन्या बायो फ्यूएल, हायड्रोजनसह इथेनाॅल मिश्रीत फ्लेक्स फ्यूएलसारख्या पर्यायासह गाड्यांचे उत्पादन करतात. या प्रयत्नांचा उद्देश हा महाग इंधन आयात रोखून कार्बन फूटप्रिंट कमी करणे आहे.

इलेक्ट्रिक फ्लेक्स फ्यूएल इनोव्हा हायक्राॅसमध्ये आॅप्शनल फ्यूएलचा पर्याय आहेच पण त्याबरोबर ती इलेक्ट्रिक पावर जनरेट करण्यासही सक्षम ठरेल. याचा अर्थ ही ईव्ही मोडवरही चालू शकेल. इलेक्ट्रिफाईड इनोव्हा हायक्राॅस फ्लेक्स फ्यूएल एक प्रोटोटाईप माॅडेल आहे. जी नव्या एमिशन नाॅर्म्स भारत स्टेज ६ च्या नियमांनुसार अपडेटेड आहे.

फुल्ली इथेनाॅलवर चालणार हायक्राॅस

संपूर्णपणे टोयोटाच्या प्रकल्पात सुरू झालेली इनोव्हा हायक्राॅस फ्लेक्स फ्यूएल एमपीव्हीवर चालू शकेल. इथेनाॅलला ई १०० ग्रेड दिला आहे. याचा अर्थ ही गाडी संपूर्णपणे आॅप्शनल फ्यूएलवर चालू शकेल. एमपीव्हीमध्ये लिथियम बॅटरी पॅक असणर आहे. यामुळे गाडीला ईव्ही मोडवर चालण्यास मदत होईल. दरम्यान हे नवे व्हेरियंट भारतीय रस्त्यावर कधी दिसेल याबाबत अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही.

इनोव्हा हायक्राॅस २.० लीटर ४ सिलेंडर पेट्रोल इंजिनसहित येते. यामुळे १८१ बीएचपी पावर जनरेट केले जाते. ही गाडी प्रति लीटर २३.३४ किमीचं मायलेज देण्यास सक्षम आहे. इंजिनला e CVT ट्रान्समिशनशी कनेक्ट केले आहे.

विभाग

पुढील बातम्या