मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Odisha Viral Video : वर तळपता सूर्य अन अनवाणी पायाने पेन्शनसाठी ७० वर्षीय महिलेने केली पायपीट, अर्थमंत्री म्हणतात….

Odisha Viral Video : वर तळपता सूर्य अन अनवाणी पायाने पेन्शनसाठी ७० वर्षीय महिलेने केली पायपीट, अर्थमंत्री म्हणतात….

Apr 21, 2023, 03:44 PM IST

    • Odisha Viral Video : ओडीशामध्ये राहणाऱ्या ७० वर्षीय ज्येष्ठ महिला सूर्या हरिजन यांना पेन्शनचे पैसे मिळवण्यासाठी कित्येक किलोमीटरची पायपीट करावी लागली. त्यासाठी त्यांच्याकडे आधार होता तो तुटलेल्या खुर्चीचा... पाहा हा ह्रदयद्रावक व्हिडिओ -
senior citizen Surya Harijan HT

Odisha Viral Video : ओडीशामध्ये राहणाऱ्या ७० वर्षीय ज्येष्ठ महिला सूर्या हरिजन यांना पेन्शनचे पैसे मिळवण्यासाठी कित्येक किलोमीटरची पायपीट करावी लागली. त्यासाठी त्यांच्याकडे आधार होता तो तुटलेल्या खुर्चीचा... पाहा हा ह्रदयद्रावक व्हिडिओ -

    • Odisha Viral Video : ओडीशामध्ये राहणाऱ्या ७० वर्षीय ज्येष्ठ महिला सूर्या हरिजन यांना पेन्शनचे पैसे मिळवण्यासाठी कित्येक किलोमीटरची पायपीट करावी लागली. त्यासाठी त्यांच्याकडे आधार होता तो तुटलेल्या खुर्चीचा... पाहा हा ह्रदयद्रावक व्हिडिओ -

Odisha Viral Video : डिजीटल इंडियाच्या जमान्यात काही सेकंदातच पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर होतात. पण ओडीशामध्ये राहणाऱ्या ७० वर्षीय ज्येष्ठ महिला सूर्या हरिजन यांना पेन्शनचे पैसे मिळवण्यासाठी कित्येक किलोमीटरची पायपीट करावी लागली. रणरणत्या उन्हात त्यांना केवळ एका तूटलेल्या लाकडी खुर्चीचाच आधार होता.

ट्रेंडिंग न्यूज

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

सोशल मिडियावर समोर आलेला हा व्हिडिओ फार कमी कालावधीत लाखो लोकांनी शेअऱ केला आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ ओडिशाच्या नबरंगपूर जिल्ह्याच्या झरीगन ब्लाॅकच्या बनुआगुडा गावातील आहे.

सूर्या हरिजन या ७० वर्षांची वृद्ध महिला त्यांची पेन्शन मिळवण्यासाठी कडक उन्हात तुटलेल्या खुर्चीच्या सहाय्याने अनवाणी पायाने बँकेत अनेक किलोमीटर चालत जाताना दिसत आहे. सूर्या हरिजन यांना चालण्यास त्रास होत असल्याने त्यांना बँकेत जाण्यासाठी खुर्चीचा आधार घेऊन चालावे लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, वृद्ध महिला सूर्या हरिजन यांना दोन मुलगे आहेत. एक मुलगा दुसऱ्या राज्यात परप्रांतीय मजूर म्हणून काम करतो. तर तिथेच धाकटा मुलगा कुटुंबासह राहत आहे. या महिलेच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा छापा खात्याशी संलग्न न झाल्याने त्यांना ४ महिन्यांपासून पेन्शन मिळालेली नाही.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोक बँक कर्मचाऱ्यांवर प्रश्न उपस्थित करत आहेत. त्याचवेळी हा व्हिडिओ समोर आल्यानंतर बँक मॅनेजरचे वक्तव्यही समोर आले आहे. एसबीआय झारीगाव शाखेच्या व्यवस्थापकाने सांगितले की, त्यांची बोटे तुटली आहेत, त्यामुळे पैसे काढण्यास त्रास होत आहे.त्यासाठी त्यांना बँकेत यावे लागले असून आम्ही यावर लवकर तोडगा काढू.

निर्मला सितारमण यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

या महिलेचा व्हिडिओ सीतारामन यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. ते म्हणाले- यावर बँक व्यवस्थापक उत्तरे देत असल्याचे आपण पाहत आहोत. मात्र वित्त विभाग आणि एसबीआयने माणुसकी दाखवत याप्रकरणी पावले उचलली. बँक मित्र नाहीत? या प्रश्नावर एसबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्वरित उत्तरं शोधून काढावीत असे आदेशही त्यानी दिले आहेत.

विभाग

पुढील बातम्या