मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Vaibhav Taneja : टेस्लाच्या तिजोरीच्या चाव्या भारतीय तरुणाकडे; एलॉन मस्क यांचा विश्वास जिंकणारे वैभव तनेजा आहेत कोण?

Vaibhav Taneja : टेस्लाच्या तिजोरीच्या चाव्या भारतीय तरुणाकडे; एलॉन मस्क यांचा विश्वास जिंकणारे वैभव तनेजा आहेत कोण?

Aug 08, 2023, 02:19 PM IST

  • Vaibhav Taneja new CFO of Tesla: भारतीय वंशांचे अनेक अधिकारी जगातील विविध मोठ्या कंपन्यांमधये मोठ्या नेतृत्त्वपदावर काम करत आहेत. आता त्या यादीत वैभव तनेजा यांचेही नाव समाविष्ट झाले आहे. एलाॅन मस्कचा विश्वास जिंकणारे वैभव तनेजा नेमके आहेत तरी कोण, पाहुया.

Vaibhav Taneja, CFO, Tesla HT

Vaibhav Taneja new CFO of Tesla: भारतीय वंशांचे अनेक अधिकारी जगातील विविध मोठ्या कंपन्यांमधये मोठ्या नेतृत्त्वपदावर काम करत आहेत. आता त्या यादीत वैभव तनेजा यांचेही नाव समाविष्ट झाले आहे. एलाॅन मस्कचा विश्वास जिंकणारे वैभव तनेजा नेमके आहेत तरी कोण, पाहुया.

  • Vaibhav Taneja new CFO of Tesla: भारतीय वंशांचे अनेक अधिकारी जगातील विविध मोठ्या कंपन्यांमधये मोठ्या नेतृत्त्वपदावर काम करत आहेत. आता त्या यादीत वैभव तनेजा यांचेही नाव समाविष्ट झाले आहे. एलाॅन मस्कचा विश्वास जिंकणारे वैभव तनेजा नेमके आहेत तरी कोण, पाहुया.

Vaibhav Taneja CFO Tesla: भारतीय वंशांच्या अनेक अधिकाऱ्यांनी जगाच्या पटलावर आपले अस्तिस्व सिदध केले आहे. त्यांच्या प्रतिभेची खात्री त्यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिली आहे. मायक्रोसॉफ्टपासून गुगलपर्यंत अनेक मोठ्या कंपन्यांची जबाबदारी भारतीय वंशाचे अधिकारी सध्या सांभाळत आहेत. आता सत्य नाडेला आणि सुंदर पिचाई यांच्या यादीत आता आणखी एका भारतीय वंशांच्या वैभव तनेजा यांचे नाव समाविष्ट झाले आहे. टेस्ला कंपनीच्या चीफ फायनान्शिअल आॅफिसर्स ( सीफओ) पदाची जबाबदारी एलाॅन मस्कने वैभव तनेजा यांच्या खांद्यावर टाकली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Zachary Kirkhorn यांच्या पदावर नियुक्ती

एलाॅन मस्कचा विश्वास जिंकणं ही साधी गोष्ट नाही. पण वैभव तनेजा यांनी आपली जबाबदारी ओळखून स्वत ला सिद्ध केलंय. म्हणूनच मस्कने त्यांच्यावर सीएफओची जबाबदारी नुकतीच दिली आहे. त्यांच्या आधी Zachary Kirkhorn हे कंपनीचे सीएफओ होते. तर वैभव तनेजा अकाऊंटिंग विभागाचे अध्यक्ष होते.

Zachary Kirkhorn हे सीएफओ पदावर गेल्या १३ वर्षांपासून कार्यरत होते. त्यांच्याकडे कंपनीच्या फायनान्स विभागाची संपूर्ण जबाबदारी होती. पण त्यांच्या निवृत्तीनंतर आता वैभव तनेजा हे काम पाहाणार आहेत. सध्यातरी Zachary Kirkhorn हे वर्षाच्या अखेरीपर्यंत कंपनीत कार्यररत राहणार आहेत. जेणेकरून व्यवहारात कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये. दरम्यान Zachary Kirkhorn यांच्या अचानक निवृत्तीबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही. त्यांनीही आपल्या लिंक्डिन पोस्टवर अपडेट टाकले आहेत. ते म्हणतात की, टेस्ला सोबत काम करणं हा माझ्या जीवनातील सर्वात सुंदर अनुभव होता.

वैभव तनेजा यांची टेस्लातील कारकीर्द

वैभव तनेजा टेस्लासोबत २०१६ पासून काम करत आहेत. मस्कने या वर्षी सोलरसिटीचे अधिग्रहण केले होते. वैभव यांना जानेवारी २०२१ मध्ये Tesla India Motors and Energy Private Limited चे संचालक बनवण्यात आले होते. त्यांच्याकडे अकाऊंटिंग क्षेत्रातील दोन दशकांपेक्षा अधिक अनुभव गाठीशी आहे.

विभाग

पुढील बातम्या