मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Dhanteras Investment: सोन्याचे नाणे, सुवर्ण रोखे की Gold ETF? धनत्रयोदशीला गुंतवणुकीचे पर्याय कोणते?

Dhanteras Investment: सोन्याचे नाणे, सुवर्ण रोखे की Gold ETF? धनत्रयोदशीला गुंतवणुकीचे पर्याय कोणते?

Nov 09, 2023, 07:43 PM IST

  • Investment Options for Dhanteras: दिवाळीमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी अनेक जण सोने खरेदी करतात. परंतु गुंतवणुकदारांना सोन्याचे नाणे, सुवर्ण रोखे आणि Gold ETF या पर्यायांची माहिती नसते.

Best investment choice for this Dhanteras

Investment Options for Dhanteras: दिवाळीमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी अनेक जण सोने खरेदी करतात. परंतु गुंतवणुकदारांना सोन्याचे नाणे, सुवर्ण रोखे आणि Gold ETF या पर्यायांची माहिती नसते.

  • Investment Options for Dhanteras: दिवाळीमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी अनेक जण सोने खरेदी करतात. परंतु गुंतवणुकदारांना सोन्याचे नाणे, सुवर्ण रोखे आणि Gold ETF या पर्यायांची माहिती नसते.

विभोर मित्तल

भारतातील संस्कृतीमध्ये धनत्रयोदशीला मोठे धार्मिक महत्त्व आहे. धनत्रयोदशी हा हिंदु सणांमध्ये एक महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी सोने खरेदी केल्यामुळे घरात समृद्धी येते आणि नकारात्मकता दूर होते, असं मानलं जातं. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी धनत्रयोदशीचा दिवस हा शुभ मानला जातो. दिवाळीमध्ये धनत्रयोदशीचा दिवस जसजसा जवळ येतो, तसतसे गुंतवणूकदारांना एक प्रश्न पडत असतात. तो म्हणजे यंदा धनत्रयोदशीच्या दिवशी गुंतवणुकीचे पर्याय कोणते? सोन्याचे नाणे, सुवर्ण रोखे की Gold ETF? या लेखातून आपण उपरोल्लिखीत प्रत्येक गुंतवणूक पर्यायाचे फायदे आणि तोटे बघणार आहोत.

तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा
ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

धनत्रयोदशीः संपत्ती आणि समृद्धीचा उत्सव

धनतेरस किंवा धनत्रयोदशी ही हिंदू कॅलेंडरप्रमाणे आश्विन महिन्याच्या १३व्या दिवशी साजरी केली जाते. या दिवशी वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला असल्याचे मानले जाते. म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते. शिवाय या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते.

धनत्रयोदशीच्या दिवसासंदर्भात एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. एका तरुण वधूने तिच्या पतीला सर्पदंशाने झालेल्या मृत्यूपासून कसे वाचवले होते, याची कथा सांगितली जाते. या वधूने घरातील सर्व सोनं आणि दागिने दारासमोर आणून ठेवले होते. नागाच्या रूपात आलेला यम सोन्याच्या खजिन्याचे तेज आणि वधूच्या मधुर आवाजातील गाण्याने विचलित होतो. मृत्यूची वेळ निघून गेल्यावर साप निघून जातो आणि राजपुत्राचा जीव वाचतो. अशाप्रकारे वधूने कथा आणि गाण्यांनी पतीला जागे केल्याची ही कथा आहे.

धनत्रयोदशीच्या दिवशी गुंतवणुकीचे मार्ग: सोन्याचे धातू , सुवर्ण रोखे की Gold ETF?

आजच्या जगात गुंतवणुकीसाठी खूप पर्याय उपलब्ध असतात. त्यामुळे आर्थिक गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करताना भरपूर पर्याय उपलब्ध असतात. यामध्ये प्रत्यक्ष सोन्याचा धातू/दागिने खरेदी करणे, गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करणे किंवा अनेकदा दुर्लक्षित असलेली सार्वभौम गोल्ड बाँड योजनांमध्ये गुंतवणूक करण्याच्या पर्यायांचा समावेश आहे.

सोन्याचा धातू/दागिने खरेदी करण्याचे फायदे आणि तोटे

सोन्याचे दागिने/नाणे/बार खरेदी केले तर ते घरात जपून ठेवण्याचे आव्हान असते. पहिलं आव्हान हे सोने साठवून ठेवण्याचे असते. शिवाय धातूच्या शुद्धतेची चिंता असते. अनेकदा कॉपर अथवा चांदीच्या मिश्रण असलेलं सोनं बाजारात विकलं जाते. सोन्याची नाणी आणि बारवर १५ टक्के सीमा शुल्क, ३ टक्के जीएसटी आणि ५ टक्के घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे भौतिक सोनं खरेदी करणे जास्त महाग ठरते.

Gold ETF मधली गुंतवणूक

गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड किंवा गोल्ड ईटीएफ ही सोन्याच्या बाजारातील चढ-उतार होणाऱ्या किमतीवर आधारित एकप्रकारची खुली म्युच्युअल फंड योजना आहे. १ गोल्ड ईटीएफ युनिट ही १ ग्रॅम सोन्याइतके असते. गोल्ड ईटीएफमधली गुंतवणूक ही तशी सोयीस्कर असते. गोल्ड ईटीएफ हे अभौतिक स्वरूपात सोनच असतं. आणि स्टॉक गुंतवणुकीप्रमाणेच त्यात लवचिकता असते. तथापि, दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी त्याला व्यवस्थापन शुल्क आणि कर द्यावे लागते.

सुवर्ण रोखे योजना - Sovereign Gold Bond Scheme (SGB)

धनत्रयोदशीच्या दिवशी गुंतवणूकदारांसाठी सार्वभौम सुवर्ण बाँड योजना हा एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकतो. SGB हे सरकारी सिक्युरिटीज असून सार्वभौम हमीद्वारे समर्थित सोन्याच्या ग्रॅममध्ये मूल्यांकित केले जाते. या गुंतवणुकीचे फायदे अधिक असतात. यात भांडवल वाढीची क्षमता असते. शिवाय यावर तुम्हाला आकर्षक असे २.५ % वार्षिक व्याज मिळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यावर जीएसटी लागत नाही. शिवाय आठ वर्षाच्या कालावधीनंतर सुवर्ण रोखे रिडिम करताना करमुक्त असतात. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण रोखे हे एक उत्तम पर्याय ठरतात.

सोन्यामध्ये गुंतवणुकीच्या पर्यायांचा विचार करताना प्रत्येक पर्यायाचा साधक-बाधक विचार करणे महत्त्वाचे असते.

लेखक हे अॅस्पेरो कंपनीमध्ये चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत.

(नोटः गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी आर्थिक तज्ञांशी सल्लामसलत करावी)

पुढील बातम्या