मराठी बातम्या  /  बिझनेस  /  whatsapp update : आता पासवर्ड अन् ओटीपीची गरज नाही; व्हॉट्सअ‍ॅपनं आणलं भन्नाट फीचर

whatsapp update : आता पासवर्ड अन् ओटीपीची गरज नाही; व्हॉट्सअ‍ॅपनं आणलं भन्नाट फीचर

Oct 17, 2023, 04:05 PM IST

  • Passkey feature in whatsapp : लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपनं आपल्या युजर्ससाठी एक खास फीचर आणलं आहे.

Pass Key

Passkey feature in whatsapp : लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपनं आपल्या युजर्ससाठी एक खास फीचर आणलं आहे.

  • Passkey feature in whatsapp : लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपनं आपल्या युजर्ससाठी एक खास फीचर आणलं आहे.

Whatsapp New Feature : संवादाचे सध्याचे सर्वात लोकप्रिय आणि वेगवान माध्यम असलेलं व्हॉट्सअ‍ॅप सतत अद्ययावत होत असतं. ठराविक अंतरानं नवनवे फीचर्स आणणं हे आता व्हॉट्सअ‍ॅपचं वैशिष्ट्यच झालं आहे. हेच वैशिष्ट्य जपत आता व्हॉट्सअ‍ॅपनं आता आणखी एक फीचर आणलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

पास की (Pass Key) असं या नव्या फीचरचं नाव आहे. या फीचरमुळं युजर्स आता कोणताही पासवर्ड किंवा ओटीपी न टाकता खात्यात लॉग इन करू शकणार आहेत. केवळ फिंगरप्रिंट, फेस-आयडी किंवा पिनच्या मदतीनं व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅक्सेस करता येणार आहे.

मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचं ट्विटर) वर नवीन फीचरच्या रोलआउटबद्दल माहिती देण्यात आली आहे. ट्विटसोबत एक छोटा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हॉट्सअ‍ॅपचा वापर आता अधिक सोपा झाला आहे, असं त्यात म्हटलं आहे.

फीचरची टेस्टिंग पूर्ण

व्हॉट्सअ‍ॅपनं सप्टेंबर महिन्यातच नव्या फीचरच्या बीटा चाचणीला सुरुवात केली होती. ती चाचणी पूर्ण झाली असून त्यानंतरच हे फीचर अँड्रॉइड अ‍ॅपचा भाग बनण्यास सज्ज झालं आहे. लवकरच युजर्सना iOS आणि इतर प्लॅटफॉर्मवर देखील या नवीन फीचरचा लाभ घेता येणार आहे.

गुगलनंही दिलाय असा पर्याय

गुगलनं अलीकडंच आपल्या युजर्सना डिव्हाइसेसमध्ये लॉग इन करण्यासाठी पासवर्डऐवजी पास-की या फीचरची सुविधा दिली आहे. या फीचरमुळं सिंगल ऑथेंटिकेशनसह अनेक सेवांचा लाभ घेता येणं शक्य झालं आहे. 'पास की' फीचरमुळं भविष्यात पासवर्ड कालबाह्य होणार आहे.

व्हाट्सअ‍ॅप किंवा इतर प्लॅटफॉर्मवर पास-कीच्या माध्यमातून युजर्स लॉगिनसाठी त्यांचे बायोमेट्रिक तपशील वापरू शकतात. तसंच, डिव्हाइस अनलॉक करतात. बहुतेक स्मार्टफोन आणि इतर उपकरणांमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस आयडी स्कॅनर आढळल्यामुळं त्याचा वापर करणं सोपं झालं आहे.

विभाग

पुढील बातम्या