मराठी बातम्या  /  बिझनेस  /  WhatsApp च्या 'या' फीचरनं उडवली धम्माल! काही दिवसांतच ओलांडला ५० कोटी युजर्सचा टप्पा

WhatsApp च्या 'या' फीचरनं उडवली धम्माल! काही दिवसांतच ओलांडला ५० कोटी युजर्सचा टप्पा

Nov 16, 2023, 11:06 AM IST

  • WhatsApp new feature: व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन फीचरची यूझरमध्ये मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. तब्बल ५० कोटींहून अधिक लोकांनी या फीचरचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.

Whatsapp (PTI)

WhatsApp new feature: व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन फीचरची यूझरमध्ये मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. तब्बल ५० कोटींहून अधिक लोकांनी या फीचरचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.

  • WhatsApp new feature: व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन फीचरची यूझरमध्ये मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. तब्बल ५० कोटींहून अधिक लोकांनी या फीचरचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.

WhatsApp new feature : व्हॉट्सअ‍ॅप आपल्या यूझरसाठी नवनवे फीचर आणत असून या फीचरची मोठी क्रेझ वापरकर्त्यांमद्धे दिसून येत आहेत. अलीकडेच व्हॉट्सअ‍ॅपने चॅनल्स नावाचे एक नवे फीचर लॉंच केले आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मेटा सीईओ मार्क झुकेरबर्ग म्हणाले की, चॅनेलने ५० कोटी वापरकर्त्यांचा टप्पा ओलांडला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Whale Fish Died : गणपतीपुळेच्या समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या बेबी व्हेलचा अखेर मृत्यू; ४० तासांची बचाव मोहीम ठरली अपयशी

अ‍ॅपमध्ये वन-वे ब्रॉडकास्टिंगचा पर्याय देण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल्स फीचर तयार करण्यात आले आहे. याद्वारे अनेक फॉलोअर्स या माध्यमातून जोडले जाऊ शकतात. फॉलोअर्सना अपडेट्स देण्यासाठी किंवा तुमचे आवडते निर्माते आणि सेलिब्रिटींकडून अपडेट मिळवण्याचा हा एक सोपा पर्याय बनला आहे. या फीचरद्वारे करोडो यूजर्स त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटी, टीम आणि संस्थांशी जोडले गेले आहेत.

मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी माहिती दिली

व्हॉट्सअ‍ॅपची मूळ कंपनी मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलशी संबंधित आकडेवारी शेअर केली आहे. त्यांनी सांगितले की, चॅनल फीचर लॉन्च झाल्यानंतर पहिल्या सात आठवड्यात व्हॉट्सअ‍ॅप चॅनल्स फीचरने ५० कोटी वापरकर्त्यांचा आकडा ओलांडला आहे. हे फीचर स्टेटस टॅबचा एक भाग बनवण्यात आले आहे. जेणेकरून सुरू असलेल्या चॅटिंग आणि मेसेजिंगवर कोणताही परिणाम होणार नाही.

Pune Zika case : पुणेकरांनो सावधान! शहरात आढळला झिकाचा रुग्ण; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर

व्हॉट्सअॅप चॅनेलला मिळाला स्टिकर्सचा आधार

५० कोटी वापरकर्त्यांच्या आकड्या सोबतच व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलला स्टिकर्स वापरण्याचे देखील नवे फीचर देण्यात आले आहे. खाजगी चॅट्ससारख्या चॅनेलमध्ये स्टिकर्स पाठविण्याचा पर्याय देखील दिला जाणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप मेसेजिंग अ‍ॅपला आशा आहे की या बदलामुळे चॅनेल फॉलोअर्सशी अधिक चांगल्या प्रकारे कनेक्ट होऊ शकतील. भारतात, कतरिना कैफ, अल्लू अर्जुन, शेफ रणवीर ब्रार, भारतीय क्रिकेट संघ आणि मुंबई इंडियन्स यांसारख्या चॅनेलनेही स्टिकर्स वापरण्यास सुरुवात केली आहे.

प्रायव्हसी चेकअप टूल अ‍ॅपचा भाग

व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या अधिकृत खात्यावरून या बाबत वापरकर्त्यांना प्रायव्हसी चेकअप टूलबद्दल माहिती दिली आहे. वापरकर्त्यांना या फीचरसह सर्व गोपनीयता सेटिंग्ज दाखवल्या जातील, जेणेकरुन ते ठरवू शकतील की कोणत्या वापरकर्त्यांनी त्यांची माहिती पाहावी आणि कुणी पाहू नये. हे टॅब विद्यमान गोपनीयता सेटिंग्ज समजून घेण्यास मदत करते.

विभाग

पुढील बातम्या