मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Milk Man: लाखमोलाच्या हर्ले डेव्हिडसनवर बसून 'तो' करतोय दूधविक्री... व्हिडिओ वायरल

Milk Man: लाखमोलाच्या हर्ले डेव्हिडसनवर बसून 'तो' करतोय दूधविक्री... व्हिडिओ वायरल

Jan 06, 2023, 07:28 PM IST

    • Viral Video : हार्ले डेव्हिडसन सारखी लाखो किंमतींचा वापर एका माणसाने चक्क दूध विक्रीसाठी केला आहे. हा व्हिडियो सध्या सोशल मिडियावर चांगलाच वायरल होत आहे. या माणसाने हर्लेच्या दोन्ही बाजूला दूधाचे दोन कंन्टेनर्स आहे आणि तो दूधविक्री करत आहे.  
viral video_HT

Viral Video : हार्ले डेव्हिडसन सारखी लाखो किंमतींचा वापर एका माणसाने चक्क दूध विक्रीसाठी केला आहे. हा व्हिडियो सध्या सोशल मिडियावर चांगलाच वायरल होत आहे. या माणसाने हर्लेच्या दोन्ही बाजूला दूधाचे दोन कंन्टेनर्स आहे आणि तो दूधविक्री करत आहे.

    • Viral Video : हार्ले डेव्हिडसन सारखी लाखो किंमतींचा वापर एका माणसाने चक्क दूध विक्रीसाठी केला आहे. हा व्हिडियो सध्या सोशल मिडियावर चांगलाच वायरल होत आहे. या माणसाने हर्लेच्या दोन्ही बाजूला दूधाचे दोन कंन्टेनर्स आहे आणि तो दूधविक्री करत आहे.  

Viral Video : सक्काळी सक्काळी दूध विकण्यासाठी येणारा दूधवाला म्हटलं की सायकलवर बसलेला माणूस आणि सायकलच्या दोन्ही बाजूला दूधाचे मोठ्ठे मोठ्ठे कॅन्स असं सर्वसाधारण चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं.

ट्रेंडिंग न्यूज

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

Business Ideas : ‘असतील शिते तर जमतील भुते...’ पैशाची किमया अन् मित्रांचे कोंडाळे!

पण आता डिजीटल युगात, सायकलची जागी हर्ले डेव्हिडसन या किंमती गाडीने घेतली आहे. असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक दूध विक्रेता लाखो किंमतीच्या हर्ले-डेव्हिडसनवर दुधाचा मोठा कंटेनर घेऊन जात असल्याचे दिसत आहे. हर्ले-डेव्हिडसन मोटारसायकलवर निळ्या रंगाचा हुडी घातलेला एक माणूस दुचाकीच्या दोन्ही बाजूला दुधाचे दोन मोठे कंटेनर घेऊन जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या क्लिपने नेटिझन्सना आश्चर्यचकित केले आहे. कारण व्हिडिओमध्ये एक माणूस लाखो रुपये किमतीच्या हर्ले डेव्हिडसन बाइकवर दूध वितरीत करताना दिसत आहे. व्हायरल रील व्हिडिओमध्ये एक निळ्या रंगाचा हूडी घातलेला माणूस हर्ले-डेव्हिडसन मोटारसायकलवर बिनधास्तपणे वावरताना दिसत आहे. बाईकच्या दोन्ही बाजूला दुधाचे दोन मोठे कंटेनर घेऊन तो जात आहे. हा व्हिडिओ अमित_भडाणा_३००० या अकाऊंटवरुन इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.

मात्र, हा व्हिडीओ कुठचा आहे किंवा हा दूधवाला कुठचा आहे, याबद्दल माहिती नाही. कारण त्याच्या दुचाकीच्या नंबर प्लेटवर 'गुजर' असे लिहिलेले आहे. रील पाहून अनेक यूजर्स आश्चर्यचकित झाले, तर अनेकांनी प्रश्न विचारला की तो नंबर प्लेट नसलेल्या बाईकवर कसा फिरतोय? काही यूजर्सचे म्हणणे आहे की, आजकाल महागड्या वाहनांनी दुधाचा व्यापार करणे आश्चर्यकारक नाही.

विभाग

पुढील बातम्या