मराठी बातम्या  /  बिझनेस  /  UPI france : यूपीआयची फ्रान्सवारी, भारतीय रुपयात स्कॅन करुन पेमेंट करु शकणार

UPI france : यूपीआयची फ्रान्सवारी, भारतीय रुपयात स्कॅन करुन पेमेंट करु शकणार

Jul 16, 2023, 09:44 AM IST

    • UPI france : यूनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) वरुन भारत आणि फ्रान्स यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. त्यानुसार नवीन तरतुदी काय आहेत ते जाणून घ्या.
UPI HT

UPI france : यूनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) वरुन भारत आणि फ्रान्स यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. त्यानुसार नवीन तरतुदी काय आहेत ते जाणून घ्या.

    • UPI france : यूनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) वरुन भारत आणि फ्रान्स यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. त्यानुसार नवीन तरतुदी काय आहेत ते जाणून घ्या.

UPI france : भारत आणि फ्रान्स यांच्यात युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) बाबत करार झाला आहे. आता फ्रान्समधील भारतीय लोकही यूपीआयद्वारे पेमेंट करू शकणार आहेत. पीएम मोदी दोन दिवसांच्या पॅरिस दौऱ्यावर आहेत आणि याच दरम्यान ही घोषणा करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ला सीन म्युझिकलमध्ये भारतीय जनतेला संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.

भारतीयांनी फ्रान्समध्ये प्रवास केल्यास त्यांना जास्त रोख किंवा फॉरेक्स कार्ड बाळगण्याची गरज नाही. ते यूपीआयमध्ये म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये पेमेंट करू शकतील. तथापि, यूपीआय पेमेंट सेवा अद्याप संपूर्ण फ्रान्समध्ये कार्यन्वित झालेली नाही.

या दोन दिवसीय दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न आणि सिनेटचे अध्यक्ष गेरार्ड लार्चर यांच्याशी चर्चा केली. दोन्ही देशांमधील बहुआयामी सहकार्य आणि दीर्घकालीन धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर भर देण्यात आला. देशातील UPI प्रणाली एका मोबाईल अॅपमध्ये अनेक बँक खाती एकत्रित करते. हे यूजर्सना विविध बँकिंग सुविधांमध्ये प्रवेश करण्यास, व्यापाऱ्यांना पेमेंट करण्यास आणि सहजतेने निधी हस्तांतरित करण्यास मदत करते.

एप्रिल २०१६ मध्ये एनपीसीआयने यूपीआय लाँच केले होते. ज्यामध्ये २१ बँकांचा समावेश होता. तेव्हापासून देशात यूपीआय चा वापर सातत्याने वाढला आहे.

वास्तविक, २०२२ मध्ये भारत आणि फ्रान्समध्ये UPI संदर्भात चर्चा सुरू झाली. त्यानंतर NPCI ने LYRA सोबत सामंजस्य करार केला. LYRA ही फ्रान्समधील एक जलद आणि सुरक्षित ऑनलाइन पेमेंट सेवा आहे.

 

विभाग

पुढील बातम्या