मराठी बातम्या  /  बिझनेस  /  बजेटमध्ये महिलांसाठी बंपर घोषणा; दोन लाख गुंतवा आणि मिळवा…

बजेटमध्ये महिलांसाठी बंपर घोषणा; दोन लाख गुंतवा आणि मिळवा…

Feb 01, 2023, 01:33 PM IST

    • अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात महिलांसाठी एक खास बचत योजना जाहीर केली आहे. काय आहे ही बचत योजना, जाणून घ्या. (Know more about Mahila Sanman Savings Certificate scheme)
Government announced Mahila Sanman Savings Certificate scheme for womens

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात महिलांसाठी एक खास बचत योजना जाहीर केली आहे. काय आहे ही बचत योजना, जाणून घ्या. (Know more about Mahila Sanman Savings Certificate scheme)

    • अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात महिलांसाठी एक खास बचत योजना जाहीर केली आहे. काय आहे ही बचत योजना, जाणून घ्या. (Know more about Mahila Sanman Savings Certificate scheme)

केंद्रातील मोदी सरकारने आज संसदेत १० वा बजेट सादर केला. यात अनेक घोषणा करताना महिलांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. यंदा भारत देश आपल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. या वर्षाचे निमित्त साधून अर्थमंत्र्यांनी आज महिला वर्गासाठी एक खास योजना जाहीर केली आहे. ‘महिला सन्मान बचत पत्र’ असं या बचत योजनेचं नाव ठेवण्यात आलं आहे. या योजनेअंतर्गत कोणतीही महिला अथवा तरुणी दोन वर्षासाठी दोन लाख रुपयापर्यंतची रक्कम मुदत ठेव म्हणून गुंतवू शकते. या योजनेअंतर्गत त्या महिलेला किंवा तरुणीला गुंतवलेल्या रकमेवर ७.५ टक्के व्याज मिळणार आहे. ही योजना मार्च २०२५ सालापर्यंत चालू राहणार आहे. शिवाय या योजनेत गुंतवलेली अल्प रक्कम मुदतीआधी काढून घेण्याची सुविधा यात ठेवण्यात आली असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत बजेट सादर करताना केली.

ट्रेंडिंग न्यूज

आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

Business Ideas : ‘असतील शिते तर जमतील भुते...’ पैशाची किमया अन् मित्रांचे कोंडाळे!

ज्येष्ठ नागरिक आता बचत योजनांमध्ये ३० लाख रुपयांपर्यंत गुंतवू शकतील

या बजेटमध्ये महिलांसोबतच ज्येष्ठ नागरिकांना खास सवलती देण्यात आल्या आहेत. याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट भाषणात केली. आतापर्यंत देशातील ज्येष्ठ नागरिक हे जास्तीत जास्त १५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम विविध बचत योजनांमध्ये गुंतवू शकत होते. यापुढे ज्येष्ठ नागरिक ३० लाख रुपयांपर्यंतची रक्कम विविध बचत योजनांमध्ये गुंतवू शकणार आहेत.

पोस्टाच्या योजनेच्या किमान रकमेत वाढ

मासिक उत्पन्न योजनेत ९ लाखापर्यंत गुंतवा पोस्टाच्या पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत यापूर्वी किमान ४ लाखापर्यंत रक्कम गुंतवण्याची मुभा होती. आता ती वाढवून ९ लाख रुपये करण्यात आली आहे. शिवाय ज्वाइंट खातेधारकांसाठी किमान रकमेची अट ९ लाखावरून वाढवून १५ लाख रुपये करण्यात आली आहे.

 

पुढील बातम्या