मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Trident Techlabs IPO GMP : ट्रायडंट टेकलॅब्सच्या आयपीओला तुफान प्रतिसाद, किती होऊ शकतो फायदा?

Trident Techlabs IPO GMP : ट्रायडंट टेकलॅब्सच्या आयपीओला तुफान प्रतिसाद, किती होऊ शकतो फायदा?

Dec 26, 2023, 04:37 PM IST

  • Trident Techlabs IPO GMP : ट्रायडंट टेकलॅब्सच्या आयपीओनं ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ घातला आहे. त्यामुळं या शेअरच्या लिस्टिंगबाबत प्रचंड उत्सुकता आहे.

IPO News

Trident Techlabs IPO GMP : ट्रायडंट टेकलॅब्सच्या आयपीओनं ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ घातला आहे. त्यामुळं या शेअरच्या लिस्टिंगबाबत प्रचंड उत्सुकता आहे.

  • Trident Techlabs IPO GMP : ट्रायडंट टेकलॅब्सच्या आयपीओनं ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ घातला आहे. त्यामुळं या शेअरच्या लिस्टिंगबाबत प्रचंड उत्सुकता आहे.

Trident Techlabs IPO News : मागील आठवड्यात गुंतवणुकीसाठी खुला झालेला ट्रायडंट टेकलॅब्सचा आयपीओ सबस्क्राइब करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. या आयपीओला गुंतवणूकदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. एकूण ३०,१६,००० शेअरच्या या आयपीओसाठी ६१,८०,५२,००० अर्ज आले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

Business Ideas : ‘असतील शिते तर जमतील भुते...’ पैशाची किमया अन् मित्रांचे कोंडाळे!

ट्रायडंट टेकलॅब्सचा आयपीओ गुरुवार, २१ डिसेंबर रोजी खुला झाला होता. बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या श्रेणीत १४०.४२ पट सबस्क्रिप्शन मिळालं, तर किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांच्या श्रेणीत (RIIs) हा आयपीओ ३३७.४१ पट सबस्क्राइब झाला. पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या (QIBs) श्रेणीत आयपीओला ३.११ पट मागणी आली आहे. उद्या, २७ डिसेंबर रोजी आयपीओचं वाटप होणार असून २९ डिसेंबर रोजी हा शेअर राष्ट्रीय शेअर बाजारात सूचीबद्ध होईल.

IPO Listing : मुथुटच्या शेअरनं पहिल्याच दिवशी दिला झटका; गुंतवणूकदारांची पळापळ

ग्रे मार्केटमध्ये किती पसंती?

बाजार निरीक्षकांच्या मते, ट्रायडेंट टेकलॅब्स लिमिटेडचे अनलिस्टेड शेअर्स सध्या ग्रे मार्केटमध्ये त्याच्या मूळ किमतीच्या तुलनेत ५० रुपये अधिक किंमतीवर व्यवहार करत आहेत. याचाच अर्थ आयपीओ लिस्टिंगच्या दिवशी शेअरमध्ये १४२.८६ टक्के वाढ अपेक्षित आहे. अर्थात, जीएमपी बाजारातील भावनांवर आधारित असून त्यात बदल होत राहतात. त्याचं प्रतिबिंब प्रत्यक्ष लिस्टिंगमध्ये किती पडले याची शाश्वती नसते, हे ध्यानात घेणं आवश्यका आहे.

आयपीओचं स्वरूप

ट्रायडेंट टेकलॅब्सचा आयपीओ हा पूर्णपणे ४५.८ लाख शेअर्सचा फ्रेश इश्यू आहे. त्यासाठी प्रति शेअर ३३ ते ३५ रुपये असा दरपट्टा निश्चित करण्यात आला आहे. किमान ४ हजार शेअर्ससाठी अर्ज करता येईल. किरकोळ गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी किमान १,४०,००० रुपये मोजावे लागतील. 

IPO Listing : ५५ रुपयांचा शेअर १०० रुपयांवर लिस्ट झाला! पहिल्याच दिवशी दणदणीत नफा

GYR कॅपिटल अ‍ॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी ट्रायडेंट टेकलॅब्सच्या आयपीओची व्यवस्थापक आहे. तर माशितला सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड या इश्यूसाठी रजिस्ट्रार आहेत. गिरिराज स्टॉक ब्रोकिंग ही मार्केट मेकर आहे.

काय करते ही कंपनी?

ट्रायडेंट टेकलॅब्स ही कंपनी २००० साली स्थापन झाली. ही कंपनी एअरोस्पेस, संरक्षण, ऑटोमोटिव्ह, दूरसंचार, सेमीकंडक्टर आणि उर्जा वितरण उद्योगांना तंत्रज्ञान पुरवते. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ट्रायडंट टेकलॅब्सचा करोत्तर नफा ५.५४ कोटी रुपये होता आणि त्याचा महसूल ६८.२४ कोटी रुपये होता.

विभाग

पुढील बातम्या