मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Financial rule changes : ऑक्टोबरच्या पहिल्या तारखेपासून बदलले ५ नियम, तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?

Financial rule changes : ऑक्टोबरच्या पहिल्या तारखेपासून बदलले ५ नियम, तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?

Oct 02, 2023, 05:02 PM IST

  • Financial Rule changes : ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या तारखेपासून आर्थिक बाबींशी संबंधित अनेक नियम बदलले आहेत. कोणते आहेत हे नियम आणि काय होईल त्याचा परिणाम जाणून घेऊया…

Financial Rule changes

Financial Rule changes : ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या तारखेपासून आर्थिक बाबींशी संबंधित अनेक नियम बदलले आहेत. कोणते आहेत हे नियम आणि काय होईल त्याचा परिणाम जाणून घेऊया…

  • Financial Rule changes : ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या तारखेपासून आर्थिक बाबींशी संबंधित अनेक नियम बदलले आहेत. कोणते आहेत हे नियम आणि काय होईल त्याचा परिणाम जाणून घेऊया…

Financial rule changes : दर महिन्याच्या पहिल्या तारखेला काही नियम बदलत असतात. सर्वसामान्यांच्या खिशावर त्याचा थेट परिणाम होत असतो. रविवार, १ ऑक्टोबरपासून देखील काही नियम बदलले आहे. जन्माच्या दाखल्यापासून म्युच्युअल फंड एसआयपीशी संबंधित हे नियम आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

परदेशात फिरायला जाणाऱ्यांसाठी

परदेशात फिरायला जाणं १ ऑक्टोबरपासून महागलं आहे. परदेशात फिरण्यासाठी आपण ७ लाखांपेक्षा जास्त किंमतीचे टूर पॅकेज घेतल्यास त्यावर २० टक्के टीसीएस द्यावा लागणार आहे. वैद्यकीय आणि शैक्षिणक टूर यास अपवाद असेल.

अल्पबचत योजना बंद होणार?

पीपीएफ, सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटसारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. या योजनांच्या खात्याला आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी ३० सप्टेंबर ही शेवटची तारीख होती. हे काम झालं नसल्यास तुमचा खातं बंद केलं जाऊ शकतं.

जन्मदाखला अनिवार्य

जन्म-मृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक २०२३ हे १ ऑक्टोबरपासून लागू झालं आहे. त्यामुळं आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, विवाह नोंदणी, सरकारी नोकरीत नियुक्ती, मतदार ओळखपत्र आणि शालेय प्रवेशासाठी जन्मदाखला हा एकमेव पुरावा ठरणार आहे.

एसआयपी नियमात बदल

म्युच्युअल फंडामध्ये एसआयपी यापुढं जास्तीत जास्त ३० वर्षांसाठी करता येणार आहे. त्यामुळं तुमची एसआयपी कधीपर्यंत असेल हे तुम्हाला जाहीर करावं लागणार आहे. यापूर्वी एसआयपी किती वर्षांसाठी करायची यावर कुठलीही मर्यादा नव्हती. आता मात्र ती असेल. जुन्या एसआयपींना हा नियम लागू होणार नाही.

डेबिट-क्रेडिट कार्डांच्या नियमात बदल

डेबिट वा क्रेडिट कार्ड इश्यू करणाऱ्या बँकांना आता ग्राहकांना त्यांची पसंती विचारावी लागणार आहे. त्यासाठी एकापेक्षा जास्त पर्याय द्यावे लागणार आहेत. आतापर्यंत नवीन कार्ड घेताना किंवा रिन्यू करताना कुठलाही पर्याय न देता थेट रूपे, व्हिसा कार्ड किंवा मास्टर कार्ड असं कोणतंही कार्ड दिलं जायचं. आता तसं करता येणार नाही.

पुढील बातम्या