मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Mutual Fund : दुप्पट, तिप्पट नव्हे, या' म्युच्युअल फंडांनी दिले ३० पट रिटर्न्स, काय आहे ही जादू?

Mutual Fund : दुप्पट, तिप्पट नव्हे, या' म्युच्युअल फंडांनी दिले ३० पट रिटर्न्स, काय आहे ही जादू?

Oct 16, 2023, 04:34 PM IST

  • Flexi Cap Mutual Fund Returns News : जोखीम पत्करण्याची तयारी आणि म्युच्युअल फंडाची योग्य निवड केल्यास किती फायदा होऊ शकतो, याचं उदाहण काही फ्लेक्सी कॅप फंडांनी घालून दिलं आहे.

Mutual Fund Investment Tips

Flexi Cap Mutual Fund Returns News : जोखीम पत्करण्याची तयारी आणि म्युच्युअल फंडाची योग्य निवड केल्यास किती फायदा होऊ शकतो, याचं उदाहण काही फ्लेक्सी कॅप फंडांनी घालून दिलं आहे.

  • Flexi Cap Mutual Fund Returns News : जोखीम पत्करण्याची तयारी आणि म्युच्युअल फंडाची योग्य निवड केल्यास किती फायदा होऊ शकतो, याचं उदाहण काही फ्लेक्सी कॅप फंडांनी घालून दिलं आहे.

Mutual Fund Investment News : पारंपरिक गुंतवणूक पर्यायांपेक्षा वेगळ्या पर्यायाच्या शोधात असलेल्या, पण फारशी जोखीम घेऊ न शकणाऱ्या लोकांसाठी म्युच्युअल फंड हा उत्तम पर्याय ठरतो. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असली तरी थेट शेअर मार्केटमधील गुंतवणुकीपेक्षा ती कमी असते. यात आपल्याला अनेक प्रकारच्या फंडांची निवड करता येते. त्यातून आतापर्यंत लाखो लोकांनी उत्तम पैसे कमावले आहेत. काही म्युच्युअल फंडांनी मागच्या २० वर्षांत मूळ गुंतवणुकीच्या ३० ते ३५ पट परतावा मिळवून दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

फ्लेक्सी कॅप फंड हा त्यापैकीच एक आहे. म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करताना ती अनेकदा कंपनीच्या भांडवलाच्या आधारे केली जाते. लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, मल्टी कॅप हे भांडवलावर आधारित फंड असतात. फ्लेक्सी कॅप हा यातीलच एक प्रकार आहे. फ्लेक्सी-कॅप फंडाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना कोणत्याही कंपनीमध्ये विना अडथळा गुंतवणूक करता येते. फंड मॅनेजरला यात एक प्रकारची मुभा असते. बाजारातील परिस्थितीनुसार तो लहान किंवा जास्त महत्त्वाच्या कंपन्यांमध्ये आपले पैसे गुंतवू शकतो. फ्लेक्सी कॅप फंडातील ६५ टक्के रक्कम इक्विटीमध्ये गुंतवता येते.

Funds India च्या ताज्या अहवालानुसार मागील २० वर्षांत काही फ्लेक्सी-कॅप फंडांनी गुंतवणूकदारांना ३० ते ३४ पट परतावा दिला आहे. यात आदित्य बिर्ला सन लाइफ फ्लेक्सी कॅप फंड, फ्रँकलिन इंडिया फ्लेक्सी कॅप फंड आणि HDFC फ्लेक्सी कॅप फंडाचा समावेश आहे. या फंडांनी २० वर्षांच्या काळात (३० सप्टेंबर २०२३ पर्यंत) अनुक्रमे ३१.४ पट, ३२ पट आणि ३४.३ पट नफा मिळवून दिला आहे.

लार्ज कॅपलाही सोडलं मागे

फ्लेक्सी कॅप फंडांनी रिटर्न्सच्या बाबतीत फ्रँकलिन इंडिया ब्लू-चिप आणि एचडीएफसी टॉप १०० सारख्या लार्ज कॅप श्रेणीतील फंडांना मागे टाकलं आहे. लार्ज कॅपमधील या फंडांनी मागच्या २० वर्षांत अनुक्रमे २१ पट आणि २९ पट परतावा दिला आहे.

बाजाराचा कल ओळखण्याच्या फंड मॅनेजरच्या क्षमतेवर फ्लेक्सी-कॅप फंडांचं यश प्रामुख्यानं अवलंबून असतं. पाच वर्षांच्या कालावधीत, फ्लेक्सी कॅप फंडांनी सरासरी १४ ते १७ टक्के परतावा दिला आहे. महागाईच्या दराला मागे सोडणारा हा दर आहे.

फ्लेक्सी-कॅप फंडांमध्ये गुंतवणूक करावी का?

जोखीम पत्करण्याची क्षमता, प्रसंगी नुकसान सहन करण्याची क्षमता असेल तर फ्लेक्सी कॅप फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेता येतो. अधिकाधिक जोखीम घेण्याची तयारी असलेल्या गुंतवणूकदारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. यातून तुम्हाला भरघोस रिटर्न्स मिळू शकतात.

 

(डिस्क्लेमर : हे वृत्त म्युच्युअल फंडाच्या कामगिरीची माहिती आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं कोणताही निर्णय घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग

पुढील बातम्या