मराठी बातम्या  /  बिझनेस  /  FD Interest : 'या' ७ बँका एफडीवर देतायत ९ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज, तुम्हीही घेऊ शकता लाभ

FD Interest : 'या' ७ बँका एफडीवर देतायत ९ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज, तुम्हीही घेऊ शकता लाभ

Aug 21, 2023, 02:25 PM IST

  • FD Interest rates in small finance bank : तब्बल ७ बँका ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मुदत ठेवींवर ९ टक्क्यांपेक्षा अधिक व्याज देत आहेत. कोणत्या आहेत या बँका?

FD Interest

FD Interest rates in small finance bank : तब्बल ७ बँका ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मुदत ठेवींवर ९ टक्क्यांपेक्षा अधिक व्याज देत आहेत. कोणत्या आहेत या बँका?

  • FD Interest rates in small finance bank : तब्बल ७ बँका ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मुदत ठेवींवर ९ टक्क्यांपेक्षा अधिक व्याज देत आहेत. कोणत्या आहेत या बँका?

Bank FD Interest : झटपट श्रीमंत होण्याची स्वप्नं अनेक जण बघत असतात. त्यासाठी जोखीम घेऊन विविध ठिकाणी गुंतवणूकही करतात. पण प्रत्येकालाच ते शक्य होत नाही. काही जण सुरक्षित आणि निश्चित गुंतवणुकीला प्राधान्य देतात. अशा वेळी मुदत ठेव हा उत्तम पर्याय ठरतो. अशा गुंतवणुकीला प्राधान्य देणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे.

ट्रेंडिंग न्यूज

TCS CEO Salary : भारतातील सर्वात मोठी IT कंपनी TCS च्या सीईओचा दर महिन्याचा पगार माहितीय का? वाचून व्हाल थक्क!

Akshaya Tritiya Investment : फक्त सोनेच नाही, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही गुंतवणूकही ठरते शुभ

Bank News : 'या' बँकेत तुमचं खातं असेल, पण बँक बॅलन्स नसेल तर एक महिन्यानंतर खातं थेट बंद होणार

Govt Savings schemes : दररोज फक्त २५० रुपये गुंतवा आणि २४ लाख मिळवा! ‘ही’ सरकारी योजना तुम्हाला बनवेल लखपती

मुदत ठेवींवरील व्याज दर सध्या चांगलेच वाढले आहेत. स्टेट बँक (SBI), आयसीआयसीआय (ICICI) आणि एचडीएफसी (HDFC) सह देशातील आघाडीच्या मोठ्या बँका ज्येष्ठ नागरिक असलेल्या ग्राहकांना सध्या अतिरिक्त व्याज देत आहेत. देशातील स्मॉल फायनान्स बँकाही (SFBs) देखील यात मागे नाहीत. आज २१ ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ९ टक्क्यांहून अधिक व्याज देणाऱ्या बँकांबद्दल जाणून घेणं औचित्याचं ठरेल.

JIO financial listing : सुरुवातीच्या मुसंडीनंतर जिओ फायनान्शिअलचा शेअर आपटला, लागले लोअर सर्किट

इक्विटास स्मॉल फायनान्स बँक (Equitas Small Finance Bank)

इक्विटास स्मॉल फायनान्स ही बँक आपल्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ४४४ दिवसांच्या मुदत ठेवींवर ९ टक्के व्याज देत आहे. हे व्याजदर आजपासूनच लागू होणार आहेत.

फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक (Fincare Small Finance Bank)

फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक आपल्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ५०० दिवसांच्या मुदत ठेवीवर ९ टक्के, ७५० दिवसांच्या मुदत ठेवीवर ९.४३ टक्के आणि १००० दिवसांच्या मुदत ठेवीवर ९.२१ टक्के व्याज देत आहे. हे व्याजदर २६ जुलैपासून लागू झाले आहेत.

जन स्मॉल फायनान्स बँक (Jana Small Finance Bank)

जन स्मॉल फायनान्स बँक आपल्या ज्येष्ठ नागरिक खातेदारांना १०९५ दिवसांच्या मुदत ठेवीवर ९ टक्के व्याज देत आहे. हे व्याजदर १५ ऑगस्टपासून लागू झाले आहेत.

नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक (North East Small Finance Bank)

नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक आपल्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ५५५ दिवसांच्या मुदत ठेवीवर ९.२५ टक्के आणि ११११ दिवसांच्या मुदत ठेवीवर ९.२५ टक्के व्याज देत आहे. हा व्याजदर ९ जूनपासून देण्यात येत आहे.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक (Suryoday Small Finance Bank)

सूर्योदय स्मॉल फायनान्स ही बँक ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना १५ महिने ते २ वर्षांच्या मुदत ठेवीवर ९ टक्के व्याज आणि २ ते ३ वर्षांच्या मुदत ठेवींवर ९.१० टक्के व्याज देत आहे. हे व्याजदर ७ ऑगस्टपासून लागू आहेत.

ESAF स्मॉल फायनान्स बँक

ESAF स्मॉल फायनान्स बँक आपल्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना २ ते ३ वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या मुदत ठेवीवर ९ टक्के व्याज देत आहे. हे व्याजदर १४ एप्रिलपासून लागू आहेत.

युनिटी स्मॉल फायनान्स बँक (Unity Small Finance Bank)

युनिटी स्मॉल फायनान्स बँक आपल्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ९.२५ टक्के ते ९.५० टक्के व्याज देत आहे. हे व्याजदर ११ ऑगस्टपासून लागू आहेत.

पुढील बातम्या