मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Tata Steel : अरे ! टाटा समुहात चाललंय काय ? TCS नंतर आता टाटा स्टीलमध्ये कर्मचारी कपातीचा बडगा

Tata Steel : अरे ! टाटा समुहात चाललंय काय ? TCS नंतर आता टाटा स्टीलमध्ये कर्मचारी कपातीचा बडगा

Jul 06, 2023, 02:05 PM IST

    • Tata Steel : टाटा स्टीलला गेल्या वर्षी ८७५ तक्रारी मिळाल्या होत्या. यातील अंदाजे १५८ व्हिसलब्लोअरशी निगडित आहेत. तर ४८ तक्रारी सुरक्षेच्या कारणास्तव आणि ६६९ तक्रारी एचआरशी संबंधित आहेत.
Tata Steel HT

Tata Steel : टाटा स्टीलला गेल्या वर्षी ८७५ तक्रारी मिळाल्या होत्या. यातील अंदाजे १५८ व्हिसलब्लोअरशी निगडित आहेत. तर ४८ तक्रारी सुरक्षेच्या कारणास्तव आणि ६६९ तक्रारी एचआरशी संबंधित आहेत.

    • Tata Steel : टाटा स्टीलला गेल्या वर्षी ८७५ तक्रारी मिळाल्या होत्या. यातील अंदाजे १५८ व्हिसलब्लोअरशी निगडित आहेत. तर ४८ तक्रारी सुरक्षेच्या कारणास्तव आणि ६६९ तक्रारी एचआरशी संबंधित आहेत.

Tata Steel : टाटा समुहाची कंपनी टाटा स्टीलने ३८ कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकले आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये तीन जणांना लैंगिक शोषणाशी निगडित आहेत. तर ३५ जणांना नैतिक मुद्दयांशी निगडित अनुचित व्यवहार केल्यामुळे कामावरुन कमी केले. ही माहिती कंपनीचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी दिली आहे. ही माहिती अशावेळी जाहीर झाली आहे, जेंव्हा टीसीएसमध्ये कॅश फाॅर जाॅब अंतर्गत नुकतीच कारवाई करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

Business Ideas : ‘असतील शिते तर जमतील भुते...’ पैशाची किमया अन् मित्रांचे कोंडाळे!

८७५ तक्रारी - सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा स्टीलला मागच्या वर्षी ८७५ तक्रारी मिळाल्या होत्या. त्यात १५८ तक्रारी व्हिसलब्लोअरशी निगडित होत्या. तर ४८ तक्रारी सुरक्षेच्या मुद्द्यास्तव, ६६९ तक्रारी एचआर तसेच व्यवहाराशी निगडित होत्या. या तक्रारी टाटा स्टीलच्या भारत, परदेशातील सहाय्यक कंपन्यांनी केल्या होत्या.

कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत चंद्रशेखऱन म्हणाले की, या तक्रारींतील अंदाजे ३८ जणांविरुद्ध आम्ही कारवाई केली आहे. या कर्मचाऱ्यांना कंपनीने थेट घरचा रस्ता दाखवला आहे. जागतिक पातळीवर टाटा स्टील कंपनीची एक इमेज आहे. त्याला धक्का लागता कामा नये, त्यामुळे आम्ही उच्च व्हॅल्यू आणि झीरो टाॅलरन्स धोरणांवर आम्ही भर देतो.

ते पुढे म्हणाले, आम्ही ओपन कल्चरच्या दिशेने वाटचाल करत आहोत. प्रत्येक प्रकारच्या संकटांचा आणि तक्रारींचे आम्ही स्वागत करतो. त्यामुळे कोणताही कर्मचारी आपापल्या क्षेत्रातील समस्या व्यवस्थापनासमोर मांडू शकतो. दरम्यान, गेल्या आठवड्यात कॅश फाॅर जाॅब अंतर्गत टीसीएसमधून वरिष्ठ अधिकाऱ्यासह सहा बिजनेस असोसिएट्सवर प्रतिबंध लादण्यात आले होते.

विभाग

पुढील बातम्या