मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Stock Market : दीड रुपयांपर्यंत घसरलेला सुझलॉनचा शेअर १४ रुपयांवर; गुंतवणूकदार मालामाल

Stock Market : दीड रुपयांपर्यंत घसरलेला सुझलॉनचा शेअर १४ रुपयांवर; गुंतवणूकदार मालामाल

Jun 07, 2023, 02:41 PM IST

  • Suzlon Energy Limited Share Price : शेअर बाजारातील सध्याच्या तेजीचा परिणाम बरेच दिवस स्थिर असलेल्या कंपन्यांच्या शेअर्सवर झाला असून त्यामुळं गुंतवणूकदार सुखावले आहेत.

Suzlon Energy Ltd

Suzlon Energy Limited Share Price : शेअर बाजारातील सध्याच्या तेजीचा परिणाम बरेच दिवस स्थिर असलेल्या कंपन्यांच्या शेअर्सवर झाला असून त्यामुळं गुंतवणूकदार सुखावले आहेत.

  • Suzlon Energy Limited Share Price : शेअर बाजारातील सध्याच्या तेजीचा परिणाम बरेच दिवस स्थिर असलेल्या कंपन्यांच्या शेअर्सवर झाला असून त्यामुळं गुंतवणूकदार सुखावले आहेत.

Suzlon Energy Limited Share Price : शेअर बाजारात आज तेजीची लाट असून बहुतेक कंपन्यांचे शेअर वधारले आहेत. गुंतवणूकदारांचे पोर्टफोलिओ हिरवेगार झाले आहेत. अनेक दिवसांपासून तेजीच्या प्रतीक्षेत असलेल्या काही गुंतवणूकदारांना याचा मोठा फायदा झाला आहे. सुझलॉन एनर्जी लिमिटेडच्या गुंतवणूकदारांचा यात समावेश आहे. दीड रुपयांपर्यंत घसरलेला हा शेअर आता चक्क १४ रुपयांवर पोहोचला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

सुझलॉन एनर्जीचे शेअर आज १७ टक्क्यांपेक्षा जास्त वाढून १४ रुपयांवर पोहोचला आहे. सुझलॉनच्या शेअरचा ही मागच्या ५२ आठवड्यांतील उच्चांक आहे. मागच्या तीन दिवसांत या कंपनीचे शेअर्स ३० टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. कंपनीच्या समभागांची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ५.४३ रुपये आहे. बॅलन्स शीटमध्ये सुधारणा होण्याच्या अपेक्षेनं या कंपनीचा शेअर उसळला आहे.

तीन वर्षांत ७०० टक्के वाढ

सुझलॉन एनर्जीचे शेअर्स गेल्या ३ वर्षांत ७०७ टक्क्यांनी वाढले आहेत. २७ मार्च २०२० रोजी कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर १.७२ रुपये होते. ते आज १४ रुपयांवर पोहोचले आहेत. एखाद्या व्यक्तीनं २७ मार्च २०२० रोजी सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल आणि गुंतवणूक कायम ठेवली असेल, तर या शेअर्सचे सध्याचे मूल्य ८.३३ लाख रुपये झाले असेल.

११ महिन्यांत शेअर्स १५३ टक्के वाढले

गेल्या ११ महिन्यांत सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये १५३ टक्के वाढ झाली आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर २८ जुलै २०२२ रोजी कंपनीचे शेअर्स रु. ५.५८ वर ट्रेडिंग करत होते. गेल्या ६ महिन्यांत त्यात ४५ टक्के वाढ झाली आहे. सुझलॉन समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे पी चलसानी यांनी कंपनीच्या बदलत्या परिस्थितीची माहिती दिली. कंपनीकडे सध्या १५४२ मेगावॅटच्या ऑर्डर आहेत. २०१९ नंतरची ही सर्वात मोठी ऑर्डर आहे. यात ३१ मार्च २०२३ पर्यंत ६५२ मेगावॅटच्या आणि ८९० मेगावॅटच्या ऑर्डरचा समावेश आहे.

पुढील बातम्या