मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Adani Hidenberg issue : अदानी-हिडेनबर्ग तपासासाठी सेबीला मिळाली मुदतवाढ, पुढील सुनावणी ११ जुलैला

Adani Hidenberg issue : अदानी-हिडेनबर्ग तपासासाठी सेबीला मिळाली मुदतवाढ, पुढील सुनावणी ११ जुलैला

May 17, 2023, 04:36 PM IST

    • Adani Hidenberg issue : न्यायालयाने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीचा अहवाल सर्व पक्षकार आणि त्यांच्या वकिलांना उपलब्ध करून देण्याचे निर्देशही सरन्यायाधीशांनी दिले आहेत.
supreme court of India HT

Adani Hidenberg issue : न्यायालयाने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीचा अहवाल सर्व पक्षकार आणि त्यांच्या वकिलांना उपलब्ध करून देण्याचे निर्देशही सरन्यायाधीशांनी दिले आहेत.

    • Adani Hidenberg issue : न्यायालयाने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीचा अहवाल सर्व पक्षकार आणि त्यांच्या वकिलांना उपलब्ध करून देण्याचे निर्देशही सरन्यायाधीशांनी दिले आहेत.

Adani Hidenberg issue : हिंडेनबर्ग रिसर्चमध्ये अदानी समूहावर लावण्यात आलेल्या आरोपांच्या सखोल तपासासाठी सर्वोच्च न्यायालयाने सेबीला आणखी तीन महिन्यांची मुदत दिली आहे. त्यानुसार १४ ऑगस्टपर्यंत सेबीचा तपास पूर्ण केल्यानंतर न्यायालयाला आपला अहवाल सादर करावा लागणार आहे. मात्र, गरज पडल्यास आणखी वेळ दिला जाऊ शकतो, असेही न्यायालयाने सूचित केले.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

तत्पूर्वी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना तुम्ही आतापर्यंत काय केले ते सांगा, अशा शब्दात सेबीला चांगलेच फटकारले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सेबीला न्यायालयाने दोन महिन्यांची मुदत दिली होती. पण आता ती ५ महिन्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीने कालमर्यादा लक्षात घेऊन दोन महिन्यांत अहवाल सादर करावा, असे मुख्य न्यायमूर्तींनी सांगितले. आता या प्रकरणावर ११ जुलै २०२३ रोजी सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने सांगितले. तज्ज्ञ समितीचा अहवाल सर्व पक्षकार आणि त्यांच्या वकिलांना उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही सरन्यायाधीशांनी दिल्या आहेत.

तत्पूर्वी, या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी न्यायालयाला सांगितले की सेबी २९१६ पूर्वीपासून अदानी समूहाची चौकशी करत आहे. आतापर्यंतच्या तपासात काय समोर आले आहे, असा सवाल त्यांनी केला.

प्रशांत भूषण म्हणाले की, अदानी समूहाला वाचवण्याचा प्रयत्न सेबी करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. अलिकडच्या वर्षांत अनेक तक्रारी येऊनही काहीच कार्यवाही झाली नाही. याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहे.

विभाग

पुढील बातम्या