मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Last day invest in IPO : ‘सुला वाईनयार्ड’ कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूकीची आज शेवटची संधी

Last day invest in IPO : ‘सुला वाईनयार्ड’ कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूकीची आज शेवटची संधी

Dec 14, 2022, 09:13 AM IST

    • Last day to invest in IPO : वाईन उत्पादनात अग्रेसर असलेल्या नाशिकमधील या कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची आजची शेवटची संधी आहे. कंपनीचा आयपीओ ग्रे मार्केटमध्ये काल दुसऱ्या दिवशी ५९ टक्के सबस्क्राईब्ड झाला होता.
IPO HT

Last day to invest in IPO : वाईन उत्पादनात अग्रेसर असलेल्या नाशिकमधील या कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची आजची शेवटची संधी आहे. कंपनीचा आयपीओ ग्रे मार्केटमध्ये काल दुसऱ्या दिवशी ५९ टक्के सबस्क्राईब्ड झाला होता.

    • Last day to invest in IPO : वाईन उत्पादनात अग्रेसर असलेल्या नाशिकमधील या कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची आजची शेवटची संधी आहे. कंपनीचा आयपीओ ग्रे मार्केटमध्ये काल दुसऱ्या दिवशी ५९ टक्के सबस्क्राईब्ड झाला होता.

Sula Wine IPO : वाईन उत्पादनात अग्रेसर असलेल्या नाशिकमधील सुला वाईन कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची आजची शेवटची संधी आहे. कंपनीचा आयपीओ ग्रे मार्केटमध्ये मंगळवारी दुसऱ्या दिवशी ५९ टक्के सबस्क्राईब्ड झाला होता. एनएसईच्या आकडेवारीनुसार, कंपनीच्या आयपीओअंतर्गत १,८८,३०,३७२ शेअर्सवर अंदाजे १,१०,९९,२५६ शेअर्सची बोली मिळाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

ग्रे मार्केटमधील आयपीओची स्थिती

टाॅप शेअर ब्रोकर्सच्या अहवालानुसार, कंपनीचा आयपीओ ग्रे मार्केटमध्ये मंगळवारी संध्याकाळी २ रुपये प्रिमियमवर उपलब्ध होता. हा ट्रेड कंपनीसाठी चांगला नाही.कारण तो असाच कायम राहिला तर कंपनीची लिस्टिंग फ्लॅट होऊ शकते.

रिटेल इंडिव्युज्युअल इंन्व्हेस्टरच्या कॅटेगरीमध्ये ९९ टक्के आणि नाॅन रिटेल इंडिव्युजल्स इंव्हेस्टर्सच्या कॅटेगरीमध्ये ४५ टक्के सबस्क्रिप्शन मिळाले आहे. एकूण २,६९,००,५३० इक्विटी शेअर्सच्या आयपीओसाठी प्राईस बॅड ३४० ते ३५७ रुपये प्रती शेअर्सदरम्यान निश्चित करण्यात आले आहे. सुला वाईनयार्डने शुक्रवारी अँकर गुंतवणूकदारांकडून २८८ कोटी रुपये जमवले आहे.

सुला वाईनयार्डच्या आयपीओची लिस्टिंग २२ डिसेंबरला होणार आहे. एक रिटेल इन्व्हेस्टर्स कमीतकमी १ आणि जास्तीत जास्त १३ लाॅट्सवर बोली लावू शकतात.एका लाॅटमध्ये ४२ शेअर्स ठेवण्यात आले आहे.

विभाग

पुढील बातम्या