मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Sukanya Samruddhi yojana : सुकन्या समृद्धी योजनेबाबत अपडेट्स, लगेचच हे काम करा अन्यथा खाते होईल फ्रीज

Sukanya Samruddhi yojana : सुकन्या समृद्धी योजनेबाबत अपडेट्स, लगेचच हे काम करा अन्यथा खाते होईल फ्रीज

Jul 25, 2023, 11:58 AM IST

    • Sukanya Samruddhi yojana : २०१५ मध्ये मोदी सरकारने मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजने (SSY) ची सुरूवात केली होती. या योजनेद्वारे तुमच्या मुलीच्या शिक्षण अथवा लग्नासाठी मोठ्या रकमेची तरतूद करु शकतात.
Sukanya Samrudhi yojana HT

Sukanya Samruddhi yojana : २०१५ मध्ये मोदी सरकारने मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजने (SSY) ची सुरूवात केली होती. या योजनेद्वारे तुमच्या मुलीच्या शिक्षण अथवा लग्नासाठी मोठ्या रकमेची तरतूद करु शकतात.

    • Sukanya Samruddhi yojana : २०१५ मध्ये मोदी सरकारने मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजने (SSY) ची सुरूवात केली होती. या योजनेद्वारे तुमच्या मुलीच्या शिक्षण अथवा लग्नासाठी मोठ्या रकमेची तरतूद करु शकतात.

Sukanya Samruddhi yojana : चालू आर्थिक वर्षात सरकारने सुकन्या समृद्धी योजनेशी निगडित नियमात एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. मोदी सरकारने ही योजना मुलींच्या भवितव्यासाठी सुरू केली होती.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

काय आहे नवा नियम

आता सुकन्या समृद्धी योजनेसाऱख्या पोस्टातील गुंतवणूक योजनेसाठी पॅनकार्ड आणि आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार आता गुंतवणूकीसाठी आधार क्रमांक अथवा आधार नोंदणीपत्र अनिवार्य आहे. जर खाते उघडताना आधार क्रमांक उपलब्ध नसेल तर त्याऐवजी नोंदणीपत्र सादर करावे लागेल. त्याशिवाय खाते उघडण्याच्या तारखेच्या सहा महिन्यांच्या आत आधार क्रमांकाचीही माहिती द्यावी लागेल. यापूर्वी एसएसवायमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आधार अनिवार्य नव्हते.

आधाराची माहिती न दिल्यास काय होईल

आधाराची माहिती न दिल्यास तुम्ही योजनेत गुंतवणूक करु शकणार नाही. अर्थमंत्रालयाने एक नोटिफिकेशन जारी केले आहे. त्यानुसार सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडताना पॅन अथवा फाॅर्म ६० भरावे लागेल. खाते उघडण्याच्या वेळी पॅन जमा नसेल केले तर ते काही विशिष्ट स्थितीमध्ये दोन महिन्यात जमा करावे लागेल.

योजनेबद्दल

सुकन्या समृद्धी योजनेवर सरकारने ८ टक्के व्याज दिले आहे. या योजनेत एका वर्षात १.५ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा केली जाऊ शकत नाही. तर कमीत कमी ५०० रुपयांपासून गुंतवणूक करता येते. या योजनेमध्ये १ ते १० वर्षापर्यंत कमी वयाच्या मुलीसाठी खाते उघडले जाऊ शकते. हे खाते परिपक्व होईपर्यंत टॅक्स फ्री आहे. यासाठी आयकर कायदा ८० सी अंतर्गत करातून सूट दिली आहे.

विभाग

पुढील बातम्या