मराठी बातम्या  /  बिझनेस  /  SBI FD : एफडी करण्याचा विचार आहे?; स्टेट बँकेची ही स्कीम मिळवून देईल घसघशीत फायदा

SBI FD : एफडी करण्याचा विचार आहे?; स्टेट बँकेची ही स्कीम मिळवून देईल घसघशीत फायदा

Jun 21, 2023, 05:33 PM IST

  • SBI Amrit Kalash special FD : मुदत ठेवींमध्ये पैसे ठेवू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना स्टेट बँकेनं खूषखबर दिली आहे.

SBI FD

SBI Amrit Kalash special FD : मुदत ठेवींमध्ये पैसे ठेवू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना स्टेट बँकेनं खूषखबर दिली आहे.

  • SBI Amrit Kalash special FD : मुदत ठेवींमध्ये पैसे ठेवू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना स्टेट बँकेनं खूषखबर दिली आहे.

SBI Amrit Kalash special FD : म्युचुअल फंड, शेअर मार्केटसह बचतीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाल्यानं बँक एफडीचे प्रमाण गेल्या काही दिवसांत कमी झालं होतं. एफडीवरील व्याजात झालेली कपात हेही त्यामागचं एक कारण होतं. मात्र आता हे चित्र बदललं आहे. बँकांनी एफडीवर चांगलं व्याज देण्यास सुरुवात केल्यानं गुंतवणूकदार पुन्हा या सुरक्षित पर्यायाकडं वळले आहेत. अशा गुंतवणूकदारांसाठी देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेनं खूषखबर दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

TCS CEO Salary : भारतातील सर्वात मोठी IT कंपनी TCS च्या सीईओचा दर महिन्याचा पगार माहितीय का? वाचून व्हाल थक्क!

Business Ideas : उद्योग क्षेत्रात ‘जो दिखता है वोही बिकता है...’ हेच सूत्र चालतं…

Akshaya Tritiya Investment : फक्त सोनेच नाही, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही गुंतवणूकही ठरते शुभ

Bank News : 'या' बँकेत तुमचं खातं असेल, पण बँक बॅलन्स नसेल तर एक महिन्यानंतर खातं थेट बंद होणार

स्टेट बँकेनं आपल्या 'अमृत कलश' विशेष मुदत ठेव योजनेची मुदत वाढवली आहे. यंदाच्या एप्रिल महिन्यात स्टेट बँकेनं ही योजना पुन्हा सुरू केली होती. या योजनेत पैसे गुंतवण्याची शेवटची तारीख ३० जून होती. आता त्यात वाढ करण्यात आली आहे. ही योजना आता १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

७.६० टक्क्यांपर्यंत व्याज

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, ४०० दिवसांच्या अमृत कलश विशेष मुदत ठेव योजनेवर सामान्य ग्राहकांना ७.१० टक्के व्याज मिळेल. तर, ज्येष्ठ नागरिकांना ७.६ टक्के व्याज मिळेल. स्टेट बँकेच्या या विशेष योजनेत मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधा आहे. त्याचबरोबर ठेवींवर कर्ज घेण्याचा पर्यायही खुला आहे.

अशी करा SBI अमृत कलश योजनेत गुंतवणूक

अमृत ​​कलश योजनेतील व्याजाची गणना मासिक, त्रैमासिक आणि सहामाही आधारावर केली जाते. विशेष मुदत ठेवींसाठी मुदतपूर्तीवर व्याज दिलं जाईल. योजनेचा कालावधी संपल्यावर टीडीएस कापून बँक एफडीची रक्कम व्याजासह ग्राहकाच्या खात्यात जमा करेल. आयकर कायद्यानुसार मुदत ठेव योजनेवरील टीडीएस कापला जाईल. बँकेची शाखा, इंटरनेट बँकिंग किंवा SBI YONO अ‍ॅपद्वारे SBI अमृत कलश मुदत ठेव योजनेत पैसे गुंतवता येऊ शकतात.

पुढील बातम्या