मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Small Saving Schemes : ३० सप्टेंबरला छोट्या बचत गुंतवणूकीसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय, PPFवरील व्याजदराचे काय होणार,पाहा

Small Saving Schemes : ३० सप्टेंबरला छोट्या बचत गुंतवणूकीसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय, PPFवरील व्याजदराचे काय होणार,पाहा

Sep 23, 2023, 03:44 PM IST

    • Small Saving Schemes : अर्थमंत्रालय दर तीन महिन्यांनंतर छोट्या बचत योजनांच्या व्याजदरांचे पूर्नरावलोकन करते. त्यामुळे ३० सप्टेंबरला आँक्टोबर ते डिसेंबरच्या कालावधीसाठी व्याजदरासंदर्भातील निर्णय अपेक्षित असून अंतिम निर्णय अपेक्षित आहे.
PPF HT

Small Saving Schemes : अर्थमंत्रालय दर तीन महिन्यांनंतर छोट्या बचत योजनांच्या व्याजदरांचे पूर्नरावलोकन करते. त्यामुळे ३० सप्टेंबरला आँक्टोबर ते डिसेंबरच्या कालावधीसाठी व्याजदरासंदर्भातील निर्णय अपेक्षित असून अंतिम निर्णय अपेक्षित आहे.

    • Small Saving Schemes : अर्थमंत्रालय दर तीन महिन्यांनंतर छोट्या बचत योजनांच्या व्याजदरांचे पूर्नरावलोकन करते. त्यामुळे ३० सप्टेंबरला आँक्टोबर ते डिसेंबरच्या कालावधीसाठी व्याजदरासंदर्भातील निर्णय अपेक्षित असून अंतिम निर्णय अपेक्षित आहे.

Small Saving Schemes : सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी आणि सुकन्या समृद्धी योजनांसारख्या छोट्या बचत योजनांसंदर्भात आगामी ३० सप्टेंबरला निर्णय अपेक्षित आहे. वास्तविक सरकार तिमाही आधारावर व्याजदरांची समिक्षा करते. त्यामुळे या ३० सप्टेंबरला छोट्या बचत योजनांचे पूर्नरावलोकन केले जाईल. त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

पीपीएफचे काय होईल

यंदाच्या वर्षी पीपीएफच्या व्याजदरात कोणताही बदल केला जाणार नाही. पीपीएफवरील व्याजदरात एप्रिलनंतर कोणताही बदल केलेला नाही. सध्याच्या काळात पीपीएफवर गुंतवणूकदारांना ७.१० टक्के व्याजदर दिला जातो. एसएजी इन्फोटेकचे एमडी अमित गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, अर्थमंत्रालय आँक्टोबर ते नोव्हेंबरच्या तिमाहीसाठी पीपीएफ व्याजदर ७.१० टक्के कायम ठेवू शकतात.

प्रत्येक तिमाहीसाठी सुधारित व्याजदरानुसार वर्षाच्या अखेरीस गुंतवणूकदारांच्या खात्यात रक्कम जमा केली जाते. कोणतीही व्यक्ती पीपीएफम्ये एका वर्षात १.५ लाखांपर्यंतची रक्कम जमा करू शकतो. वार्षिक आधारावर ८० सी अंतर्गत कर सवलत दिली जाते. याशिवाय पीपीएफ मच्योरिटीची रक्कमही करमुक्त आहे.

सप्टेंबरच्या तिमाहीत किती टक्के वाढ

जूलै ते सप्टेंबरच्या तिमाहीसाठी छोट्या बचत योजनांवरील व्याजदरामध्ये ३० बेसिस पाँईंट्सची वाढ केली होती. ही वाढ प्रामुख्याने १ वर्ष, २ वर्ष आणि ५ वर्षांच्या बचत योजनांवर करण्यात आली आहे.

विभाग

पुढील बातम्या