मराठी बातम्या  /  बिझनेस  /  multibagger stock : एक करार काय झाला, वाऱ्याच्या वेगानं धावू लागला 'हा' शेअर, तुमच्याकडं आहे का?

multibagger stock : एक करार काय झाला, वाऱ्याच्या वेगानं धावू लागला 'हा' शेअर, तुमच्याकडं आहे का?

Sep 11, 2023, 01:05 PM IST

  • SJVN LTD share price : हरित ऊर्जा निर्मिती क्षेत्रातील एका कंपनीनं गेल्या सहा महिन्यांत गुंतवणूकदारांना दुपटीहून अधिक परतावा दिला आहे. आताही हा शेअर वाढतच चालला आहे.

SJVN Share Price

SJVN LTD share price : हरित ऊर्जा निर्मिती क्षेत्रातील एका कंपनीनं गेल्या सहा महिन्यांत गुंतवणूकदारांना दुपटीहून अधिक परतावा दिला आहे. आताही हा शेअर वाढतच चालला आहे.

  • SJVN LTD share price : हरित ऊर्जा निर्मिती क्षेत्रातील एका कंपनीनं गेल्या सहा महिन्यांत गुंतवणूकदारांना दुपटीहून अधिक परतावा दिला आहे. आताही हा शेअर वाढतच चालला आहे.

SJVN LTD share price : मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात आलेल्या तेजीच्या लाटेवर अनेक कंपन्या स्वार झाल्या आहेत. त्यातच कंपनीशी संबंधित एखादी बातमी या तेजीत भर घालत आहे. हरित ऊर्जा क्षेत्रातील कंपनी एसजेव्हीएनच्या शेअरच्या किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. हा शेअर अद्यापही शंभर रुपयांच्या खाली असल्यानं गुंतवणूकदारांना मोठी संधी आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

मार्केटमधील एकूण तेजीबरोबरच एसजेव्हीएनची उपकंपनी एसजेव्हीएन ग्रीन एनर्जी लिमिटेडनं केलेला एक करार शेअरचा भाव वाढण्यास कारणीभूत ठरला आहे. एसजेव्हीएन ग्रीन एनर्जी लिमिटेडनं भाक्रा बीज मॅनेजमेंट बोर्ड (बीबीएमबी) शी वीज खरेदीचा करार केला आहे.

या कराराच्या पार्श्वभूमीवर कंपनीचे शेअर आज एनएसईवर १७ टक्क्यांनी उसळले आहेत. सध्या हा शेअर ७५.०५ रुपयांवर ट्रेड करत आहे. SJVN चं बाजार मूल्य २९ हजार कोटींहून अधिक आहे. १८ मेगा वॅट सॉल्व्ह पॉवर विकसित करण्याचं कंपनीचं लक्ष्य आहे.

काय आहे कंपनीची योजना?

पुढच्या ३ वर्षांत १० हजार मेगा वॅट्सच्या क्षमतेचा अक्षय्य ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्याची SJVN कंपनीची योजना आहे. इतकंच नव्हे तर, कंपनीनं २०२३ पर्यंत २५ हजार मेगा वॅट्स अक्षय्य ऊर्जा निर्मितीचं लक्ष्य ठेवलं आहे. २०४० पर्यंत ५० हजार मेगा वॅट ऊर्जा प्रकल्प उभारण्याची योजनाही कंपनीच्या विचाराधीन आहे.

शेअर बाजारात कंपनीची घोडदौड

एसजेव्हीएन कंपनी सातत्यानं गुंतवणूकदारांना उत्तम रिटर्न्स देत आली आहे. मागच्या महिनाभरात कंपनीच्या शेअर्समध्ये ३६ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर, सहा महिन्यात कंपनीचे शेअर्स १४२ टक्क्यांनी वाढले आहेत. सहा महिन्यांपूर्वी एसजेव्हीएनचे शेअर घेणाऱ्या गुंतवणूकदारांना दुपटीहून अधिक नफा मिळाला आहे. एनएसईवर कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ७५.३० रुपये आहे. तर, नीचांक २९.९५ रुपये आहे.

पुढील बातम्या