मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Pre budget meeting : करांचे ओझे कमी होणार का?; बजेटच्या आधी केंद्र सरकारच्या काय आहेत हालचाली?

Pre budget meeting : करांचे ओझे कमी होणार का?; बजेटच्या आधी केंद्र सरकारच्या काय आहेत हालचाली?

Nov 23, 2022, 03:02 PM IST

    • Pre budget meeting ः  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी देशातील विविध उद्योग तज्ज्ञ आणि हवामान बदल,पायाभूत सुविधा तज्ज्ञांसोबत अर्थसंकल्पपूर्व बैठक सुरू केली.
pre budget meeting HT

Pre budget meeting ः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी देशातील विविध उद्योग तज्ज्ञ आणि हवामान बदल,पायाभूत सुविधा तज्ज्ञांसोबत अर्थसंकल्पपूर्व बैठक सुरू केली.

    • Pre budget meeting ः  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी देशातील विविध उद्योग तज्ज्ञ आणि हवामान बदल,पायाभूत सुविधा तज्ज्ञांसोबत अर्थसंकल्पपूर्व बैठक सुरू केली.

Pre budget meeting : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी देशातील विविध उद्योग तज्ज्ञ आणि हवामान बदल,पायाभूत सुविधा तज्ज्ञांसोबत अर्थसंकल्पपूर्व बैठक सुरू केली. बैठकीत २०२३-२४ चा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी संबंधितांकडून सूचना मागविण्यात आल्या

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

सीतारामन यांच्यासह केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, भागवत कराड या बैठकीला उपस्थित होते. त्यांच्या व्यतिरिक्त वित्त सचिव टीव्ही सोमनाथन, वित्त मंत्रालयाच्या इतर विभागांचे सचिव आणि मुख्य आर्थिक सल्लागार अनंत नागेश्वरन हेही बैठकीत उपस्थित होते. २०२३-२४ चा अर्थसंकल्प फेब्रुवारी 2023 रोजी सादर केला जाईल.

या क्षेत्राच्या प्रतिनिधींचीही बैठक

22 नोव्हेंबर रोजी सीतारामन कृषी आणि कृषी प्रक्रिया उद्योग, वित्तीय क्षेत्र आणि भांडवली बाजाराच्या प्रतिनिधींना भेटतील. 24 नोव्हेंबर रोजी, आरोग्य, शिक्षण, पाणी आणि स्वच्छता या सामाजिक क्षेत्रातील उपक्रमांव्यतिरिक्त, त्या सेवा क्षेत्र आणि व्यापारी संस्थांच्या प्रतिनिधींना भेटतील. 28 नोव्हेंबर रोजी कामगार संघटनांचे प्रतिनिधी आणि अर्थतज्ज्ञांसोबत बैठक होणार आहे.

सीआयआयने कर दरात कपातीची मागणी

कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया इंडस्ट्री (CII) ने प्री-बजेट बैठकीपूर्वी आयकर दरांमध्ये कपात करण्याचा प्रस्ताव दिला आहे. याचा फायदा सुमारे ५.८३ कोटी लोकांना होऊ शकतो. या लोकांनी मूल्यांकन वर्ष २०२२-२३ साठी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरले होते. CII ने ग्राहकोपयोगी वस्तूंवरील सर्वोच्च २८% जीएसटी स्लॅबमध्ये कपात करण्याचाही प्रस्ताव दिला आहे.

 

पुढील बातम्या