मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Multibagger Stock : ६३ पैशावरून ६० रुपयांवर पोहोचला हा शेअर, तुमच्याकडं आहे का?

Multibagger Stock : ६३ पैशावरून ६० रुपयांवर पोहोचला हा शेअर, तुमच्याकडं आहे का?

Dec 29, 2023, 05:26 PM IST

  • Sheetal Diamonds Share Price : शीतल डायमंड्स या कंपनीनं आपल्या शेअरहोल्डर्सना त्यांच्या संयमाचं छप्परफाड फळ मिळवून दिलं आहे.

Sheetal Diamonds

Sheetal Diamonds Share Price : शीतल डायमंड्स या कंपनीनं आपल्या शेअरहोल्डर्सना त्यांच्या संयमाचं छप्परफाड फळ मिळवून दिलं आहे.

  • Sheetal Diamonds Share Price : शीतल डायमंड्स या कंपनीनं आपल्या शेअरहोल्डर्सना त्यांच्या संयमाचं छप्परफाड फळ मिळवून दिलं आहे.

Sheetal Diamonds Share Price News : पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक हा शेअर बाजारात मजबूत कमाई करण्याचा मार्ग समजला जातो. अर्थात, कंपनी नेमकी कोणती आहे आणि ती काय करू शकते यावरही बरंच काही अवलंबून असतं. अशाच एका कंपनीनं गुंतवणूकदारांना मालामाल करून टाकलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

शीतल डायमंड्स असं कंपनीचं नाव आहे. या कंपनीचा शेअर गेल्या ३ वर्षांत ६३ पैशांवरून ६० रुपयांपर्यंत गेला आहे. चालू वर्षी आतापर्यंत या शेअरनं तब्बल १२६५ टक्के परतावा दिला आहे. शीतल डायमंड्सचा शेअर आज, शुक्रवारी अपर सर्किटसह ६२.८९ रुपयांवर पोहोचला. शीतल डायमंड्सच्या शेअरचा गेल्या ५२ आठवड्यातील हा उच्चांक आहे. तर, ५२ आठवड्यांचा नीचांक ३.६२ रुपये आहे.

Small Saving Scheme : पीपीएफ, सुकन्या सारख्या अल्पबचत योजनांवरील व्याजदर वाढण्याची शक्यता

५२ आठवड्यांंच्या उच्चांकानंतर कंपनीची मोठी घोषणा

शीतल डायमंड्सनं प्रीफरेन्शियल शेअर इश्यू करून निधी उभारण्याची घोषणा केली आहे. कंपनीनं ४९.९५ कोटी रुपये उभे करण्याच लक्ष्य ठेवलं आहे. हा निधी देशभरात रिटेल स्टोअर्स उघडण्यासाठी वापरात आणला जाणार आहे. कंपनीच्या संचालक मंडळानं ८३,२५,००० इक्विटी शेअर्सचे प्रीफरेन्शिल शेअर्स ६० रुपयांच्या भावानं बाजारात आणण्यास मान्यता दिली आहे. तसंच, कंपनीनं आपलं नाव बदलून रजनीश रिटेल लिमिटेड करण्याचा निर्णय घेतला आहे.

Trident Techlabs : ३५ रुपयांचा चिटुकला शेअर पहिल्याच दिवशी पोहोचला ९८ वर, आता खरी परीक्षा

१ लाख गुंतवणाऱ्यांनी ३ वर्षांत ९९ लाख रुपये कमावले!

शीतल डायमंड्सच्या शेअर्सनी गेल्या ३ वर्षात जबरदस्त परतावा दिला आहे. १५ जानेवारी २०२१ रोजी कंपनीचे शेअर्स ६३ पैशांवर ट्रेड करत होते. हेच शेअर आज, २९ डिसेंबर २०२३ रोजी ६२.८९ रुपयांवर पोहोचले आहेत. कंपनीच्या शेअरनं गेल्या ३ वर्षांत गुंतवणूकदारांना ९८८३ टक्के परतावा दिला आहे.

एखाद्या व्यक्तीनं १५ जानेवारी २०२१ रोजी शीतल डायमंड्सच्या शेअर्समध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल आणि ती गुंतवणूक कायम ठेवली असेल तर या शेअर्सचं आताचं मूल्य ९.८२ लाख रुपये असेल. मागच्या एका वर्षात या शेअरनं १२५३ टक्के परतावा दिला आहे. तर, शेअरमध्ये ६ महिन्यांत २३८ टक्क्यांची वाढ झाली आहे.

 

(डिस्क्लेमर : हा लेख केवळ कंपनी आणि शेअरच्या कामगिरीची माहिती देतो. हा कुठल्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणुकीचा निर्णय घेण्याआधी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

पुढील बातम्या