मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Share Tips : भारती एअरटेल शेअर बाय, होल्ड किंवा सेल करावे ? तज्ज्ञांचा सल्ला ऐका

Share Tips : भारती एअरटेल शेअर बाय, होल्ड किंवा सेल करावे ? तज्ज्ञांचा सल्ला ऐका

Nov 03, 2022, 04:23 PM IST

    • एअरटेलच्या शेअर्समधून गुंतवणूक करायची की बाहेर पडायची यावर तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. एकूण ३० तज्ञांपैकी १० त्वरित खरेदीचा तर १४ जण खरेदी सल्ला देतात. ३ जणांनी विक्रीचा तर उर्वरित तज्ज्ञांनी होल्डचा सल्ला दिला आहे. 
Airtel HT (Reuters)

एअरटेलच्या शेअर्समधून गुंतवणूक करायची की बाहेर पडायची यावर तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. एकूण ३० तज्ञांपैकी १० त्वरित खरेदीचा तर १४ जण खरेदी सल्ला देतात. ३ जणांनी विक्रीचा तर उर्वरित तज्ज्ञांनी होल्डचा सल्ला दिला आहे.

    • एअरटेलच्या शेअर्समधून गुंतवणूक करायची की बाहेर पडायची यावर तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. एकूण ३० तज्ञांपैकी १० त्वरित खरेदीचा तर १४ जण खरेदी सल्ला देतात. ३ जणांनी विक्रीचा तर उर्वरित तज्ज्ञांनी होल्डचा सल्ला दिला आहे. 

Bharti Airtel buy, hold or sale : आज भारती एअरटेलच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. एनएसईवर सुरुवातीच्या व्यवहारात तो रु. ८२२.८० वर व्यवहार करत होता. ५ जी सादर केल्याने शेअर तेजीच्या मार्गावर आहे आणि ८४१.४५ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

New Smartphones: नवीन फोन घेण्याचा विचार करताय? 'हे' आहेत मे महिन्यात लॉन्च झालेले टॉप- १० फोन!

gadgets safety tips : जीवघेण्या उष्णतेमुळं मोबाइल, लॅपटॉपलाही लागू शकते आग, सुरक्षित राहायचं असेल तर घ्या 'ही' काळजी

LPG Cylinder Price Cut : मतदानाच्या दिवशीच एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त; जाणून घ्या किती पैसे वाचणार?

Neeta Ambani: काय सांगता! नीता अंबानी पितात जगातील सर्वात महागडे पाणी? किंमत वाचून व्हाल अवाक्!

असे असूनही बाजार तज्ञ एअरटेलच्या शेअर्सवर ९६० रुपयांच्या लक्ष्यित किंमतीसह खरेदी सल्ला देत आहेत. या स्टॉकने एका आठवड्यात केवळ ०.६२ टक्के परतावा दिला असला तरी, गेल्या ३ महिन्यांत १८ टक्के, एका वर्षात १७ आणि ३ वर्षांत १२० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

९६० रुपयांच्या लक्ष्य किंमतीवर खरेदी करा

एअरटेलच्या शेअर्समधून गुंतवणूक करायची की बाहेर पडायची यावर तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. एकूण ३० तज्ञांपैकी १० त्वरित खरेदी देतात आणि १४ खरेदी सल्ला देतात. तिघांनी होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे आणि इतर ३ जणांनी बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे.

अॅक्सिस सिक्युरिटीज भारती एअरटेलवर ९६० रुपयांच्या लक्ष्य किंमतीसह खरेदी सल्ला देत आहे. दुसरीकडे, जेएम फायनान्शियलने ९३० रुपयांच्या लक्ष्यासह खरेदी कॉल देखील दिला आहे.भारती एअरटेल लिमिटेड १९९५ मध्‍ये स्थापन झाली आहे. या कंपनीची अंदाजे ४७६५४१.२४ कोटी रुपयांची मार्केट कॅप असलेली लार्ज कॅप कंपनी आहे.

भारती एअरटेल (Bharti Airtel) ने ३० सप्टेंबरला संपलेल्या आर्थिक तिमाहीत ३४,७२८.७० कोटीचे एकत्रित एकूण उत्पन्न नोंदवले आहे. मागील तिमाहीत ३२,९९६.८० कोटीच्या एकूण उत्पन्नापेक्षा ५.२५% आणि मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत २२.१३% जास्त आहे.

(डिस्‍क्‍लेमर: ही माहिती केवळ कंपन्यांच्या शेअर मार्केटमधील कामगिरीवर आधारीत आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं वाचकांनी आपल्या वित्तीय सल्लागाराच्या सुचनेनुसारच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.)

विभाग

पुढील बातम्या