मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Sensex Nifty Closing : सेन्सेक्स, निफ्टी कोसळले! 'अदानी'च्या तब्बल १० कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण

Sensex Nifty Closing : सेन्सेक्स, निफ्टी कोसळले! 'अदानी'च्या तब्बल १० कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण

Feb 22, 2023, 05:06 PM IST

  • Sensex Nifty Closing : जागतिक बाजारपेठेतून मिळालेल्या कमकूवत संकेतांमुळे आज शेअर बाजारातील दोन्ही प्रमुख निर्देशांक कोसळले. विकिपीडियाच्या हल्लाबोलमुळे अदानी समूहातील सर्वच १० स्टाॅक्समध्ये घसरगुंडी झाली.

sensex nifty collaps HT

Sensex Nifty Closing : जागतिक बाजारपेठेतून मिळालेल्या कमकूवत संकेतांमुळे आज शेअर बाजारातील दोन्ही प्रमुख निर्देशांक कोसळले. विकिपीडियाच्या हल्लाबोलमुळे अदानी समूहातील सर्वच १० स्टाॅक्समध्ये घसरगुंडी झाली.

  • Sensex Nifty Closing : जागतिक बाजारपेठेतून मिळालेल्या कमकूवत संकेतांमुळे आज शेअर बाजारातील दोन्ही प्रमुख निर्देशांक कोसळले. विकिपीडियाच्या हल्लाबोलमुळे अदानी समूहातील सर्वच १० स्टाॅक्समध्ये घसरगुंडी झाली.

Sensex Nifty Closing : जागतिक बाजारपेठेतून मिळालेल्या कमकुवत संकेतांमुळे आज शेअर बाजारातील दोन्ही प्रमुख निर्देशांक कोसळले. विकिपीडियाच्या हल्लाबोलमुळे अदानी समूहातील सर्वच १० स्टाॅक्समध्ये घसरगुंडी झाली.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

आज म्हणजेच बुधवारी (२२ फेब्रुवारी २३) कमकुवत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स जवळपास ९२७ अंकांनी घसरून ५९,७४४ वर आला. निफ्टीही २७२ अंकांनी घसरून १७५५४ वर बंद झाला. बँकिंग, धातू आणि आयटी शेअर्स बाजारात विक्रीमध्ये आघाडीवर होते. सेन्सेक्समधील ३० समभागांपैकी २९ शेअर्स घसरले.

अदानी समूहाचे सर्व १० समभाग घसरले. प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचा समभाग ११% घसरून १,३९७ रुपयांवर बंद झाला. अदानी पोर्ट्स देखील ७.२४% घसरून ५४१ रुपयांवर आले. अदानी पॉवर, ट्रान्समिशन, ग्रीन एनर्जी, टोटल गॅस, विल्मर, एनडीटीव्ही, एसीसी आणि अंबुजा सिमेंट प्रत्येकी ५ टक्क्यांनी घसरले.

ग्रुपचे मार्केट १०० अब्ज डाॅलर्स खाली पोहोचले आहे

समभागांच्या सततच्या घसरणीमुळे अदानी समूहाचे बाजार भांडवल १०० अब्ज बिलियन पेक्षा कमी झाले आहे. अहवालानुसार, मंगळवारी समूहातील १० कंपन्यांचे मार्केट कॅप ८,२०,९१५ कोटी रुपयांवर घसरले.

एवढेच नाही तर फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीनुसार, गौतम अदानी यांची संपत्ती फक्त ४६.८७ अब्ज डाॅलर्स आहे. गेल्या २४ तासांत अदानींना २.९ अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे.

मेटल स्टाॅक्समध्ये सर्वाधिक २.६४ टक्के घसरण 

एनएसईच्या क्षेत्रीय निर्देशांकाबद्दल बोलायचे झाल्यास, निफ्टी मेटलमध्ये सर्वाधिक २.६४% ची घसरण झाली आहे. पीएसयू बँक निर्देशांक १.९१% आणि खाजगी बँक १.६८% ने घसरला. निफ्टी बँक निर्देशांक १.६७% घसरत बंद झाला. मीडिया आणि रियल्टी देखील १.५% पेक्षा जास्त घसरला. त्याच वेळी, ऑटो आणि आयटीमध्ये १% पेक्षा जास्त घसरण दिसून आली. फार्मा आणि एफएमसीजी ०.३% च्या जवळपास घसरले आहेत.

अमेरिकन बाजारातही घसरण झाली

मंगळवारी अमेरिकन बाजारात घसरण दिसून आली. यूएस फेडद्वारे आणखी एक दर वाढवण्याच्या शक्यतेबद्दल बाजार सतर्क आहेत. डाऊ जोन्स ६९७ अंक किंवा २.०६% घसरला आणि ३३,१२९ वर बंद झाला. एस अँड पी ५०० निर्देशांक ८१.७५ अंक किंवा २% कमी होऊन ३,९९७ वर बंद झाला. नॅसडॅक २९४ अंक किंवा २.५% कमी झाला. तो ११,४९२ च्या पातळीवर बंद झाला.

पुढील बातम्या