मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Sensex : शेअर बाजारानं रचला नवा इतिहास! सेन्सेक्स ६५,००० पार, गुंतवणूकदारांची कमाई

Sensex : शेअर बाजारानं रचला नवा इतिहास! सेन्सेक्स ६५,००० पार, गुंतवणूकदारांची कमाई

Jul 03, 2023, 03:45 PM IST

  • Sensex Nifty hits record high : शेअर बाजारात आजचा दिवस प्रचंड उलथापालथीचा ठरला. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी आजवरचा नवा उच्चांक गाठला.

BSE (PTI)

Sensex Nifty hits record high : शेअर बाजारात आजचा दिवस प्रचंड उलथापालथीचा ठरला. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी आजवरचा नवा उच्चांक गाठला.

  • Sensex Nifty hits record high : शेअर बाजारात आजचा दिवस प्रचंड उलथापालथीचा ठरला. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी आजवरचा नवा उच्चांक गाठला.

Stock Market new updates : मागील काही दिवसांपासून तेजीच्या लाटेवर स्वार झालेल्या शेअर बाजारानं आज नवा इतिहास घडवला. सेन्सेक्सनं आज पहिल्यांदाच ६५ हजारांचा आकडा ओलांडत उच्चांक गाठला. तर, निफ्टीनंही विक्रमी वाढ नोंदवली. गुंतवणूकदारांनीही या तेजीच्या लाटेवर स्वार होत भरघोस कमाई करून घेतली.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

आज दिवसभरात सेन्सेक्स ४८६.४९ अंकांनी वाढून ६५,२०५.०५ अंकांवर बंद झाला. तर, निफ्टी १४०.७५ अंकांनी वाढून दिवसअखेरीस १९,३२९.८० अंकांवर बंद झाला. बीएसईवर आज आतापर्यंत ३५३३ स्टॉक ट्रेडमध्ये होते. त्यातील २०८० शेअरमध्ये तेजी तर, १२७७ शेअरमध्ये मंदी दिसत होती. १७६ शेअरमध्ये कोणताही बदल झाला नाही.

शेअर बाजार नवा विक्रम प्रस्थापित करत असताना बीएसईचे १९४ समभाग ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर होते. १६८ शेअरना अपर सर्किट लागले. तर, २८ शेअर ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आहेत. एकूण १७९ स्टॉक लोअर सर्किटमध्ये होते. बीएसईचं बाजार भांडवल २,९८,१८,७९०.४३ वर गेले आहे.

कशी झाली सुरुवात

जुलै महिन्यातील व्यवहाराच्या पहिल्याच दिवशी, शेअर बाजारानं रेकॉर्डब्रेक सुरुवात केली. सेन्सेक्सचा यापूर्वीचा उच्चांक ६४०५० इतका आणि निफ्टीचा १९०११ इतका होता. मागील महिन्यात २८ जून रोजी हा उच्चांक नोंदवला गेला होता. आज तो ओलांडला गेला. दोन्ही निर्देशांकांमध्ये वेगानं वाढ झाली.

टॉप गेनर्स आणि टॉप लूझर्स

निफ्टीच्या ५० समभागांपैकी ३१ सकारात्मक ट्रेड करत होते, तर १९ पडलेले दिसले. जेएसडब्ल्यू स्टील, आयओसी, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी, आयशर मोटर्स, एचडीएफसी बँक आणि ग्रासिम हे निफ्टी टॉप गेनर्समध्ये राहिले. तर, पॉवर ग्रीड, मारुती, सन फार्मा, यूपीएल, गोदरेज सीपी आणि टेक महिंद्रा सर्वाधिक तोट्यात होते.

पुढील बातम्या