मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Sensex Nifty Today : सेन्सेक्स निफ्टीचा सावध पवित्रा, दिवसअखेर वाढ, आता लक्ष ‘बजेट- २०२३ ’ वर

Sensex Nifty Today : सेन्सेक्स निफ्टीचा सावध पवित्रा, दिवसअखेर वाढ, आता लक्ष ‘बजेट- २०२३ ’ वर

Jan 31, 2023, 04:53 PM IST

    • Sensex Nifty Today :  १ फेब्रुवारीला जाहीर होणाऱ्या बजेटच्या पूर्वसंध्येला सेन्सेक्स निफ्टीने दिवसभराच्या चढ उतारानंतर सावध पवित्रा घेतला आहे. दिवसअखेर सेन्सेक्समध्ये ४९.४० अंशांची तर निफ्टीत १३ अंशांची वाढ झाली. 
Dalal street HT

Sensex Nifty Today : १ फेब्रुवारीला जाहीर होणाऱ्या बजेटच्या पूर्वसंध्येला सेन्सेक्स निफ्टीने दिवसभराच्या चढ उतारानंतर सावध पवित्रा घेतला आहे. दिवसअखेर सेन्सेक्समध्ये ४९.४० अंशांची तर निफ्टीत १३ अंशांची वाढ झाली.

    • Sensex Nifty Today :  १ फेब्रुवारीला जाहीर होणाऱ्या बजेटच्या पूर्वसंध्येला सेन्सेक्स निफ्टीने दिवसभराच्या चढ उतारानंतर सावध पवित्रा घेतला आहे. दिवसअखेर सेन्सेक्समध्ये ४९.४० अंशांची तर निफ्टीत १३ अंशांची वाढ झाली. 

Sensex Nifty Today : जागतिक बाजारपेठेतून मिळालेल्या सकारात्मक संकेतांच्या पार्श्वभूमीवर सेन्सेक्स निफ्टीची सुरुवात आज चांगली झाली. बजेटच्या पार्श्वभूमीवर निर्देशांकात झालेली वाढ ही महत्त्वपूर्ण आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

अर्थसंकल्प 2023 आणि फेडरल रिझर्व्हच्या फेडरल ओपन मार्केट कमिटी (FOMC) च्या आजपासून सुरू होणार्‍या बैठकीपूर्वी मंगळवारी शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांकांनी सावध पवित्रा घेतला आहे. दिवसअखेर सेन्सेक्समध्ये ४९.४९ अंशांची किवा ०.०८ टक्के वाढ होऊन तो ५९,५४९.९० अंशांवर स्थिरावला. निफ्टी५० मध्येही १३.२० अंशांची किंवा ०.०७ टक्के वाढ होऊन तो अंदाजे १७,६६२,१५ अंश पातळीवर बंद झाला.

टाॅप गेनर्स आणि टाॅप लूजर्स

आज सलग दुसऱ्यांदा निर्देशांक सकारात्मक बंद झाला. निर्देशांकातील तेजीला आयसीआयसीआय बँक, आयटीसी, स्टेट बँक आँफ इंडिया यांनी पाठिंबा दिला. निफ्टीतल्या २४ स्टाॅक्समध्ये वाढ तर २५ शेअर्समध्ये घट झाली. टाॅप गेनर्सच्या यादीत एसबीआय, महिंद्रा अँड महिंद्रा, पाॅवर ग्रीड, अल्ट्रा टेक सिमेंट, अदानी पोर्ट्स यांचा समावेश होता. तर टाॅप लूजर्सच्या यादीत बजाज फायनान्स, टीसीएस, टेक महिद्रा, ब्रिटानिया आणि एचडीएफसी या कंपन्यांची वर्णी लागली होती.

किंचित घट पण सुधारणाही

मात्र सकाळी ९.२० मिनीटांनी बाजारपेठेत घसरण नोंदवण्यात येत आहे. सेन्सेक्स १२४ अंशांच्या घसरणीसह ५९३०४ च्या अंशपातळीवर ट्रेड करत आहे. तर निफ्टीत ६८ अंशांच्या घसरणीसह अंदाजे १७५७६.३५ अंश पातळीवर ट्रेड करत आहे.

असा खुला झाला सेन्सेक्स निफ्टी

आज सकाळच्या पहिल्या सत्रात शेअऱ बाजार खुला होताच सेन्सेक्समध्ये २०० अंशांची म्हणजेच ०.३० अंशांची वाढ झाली. सेन्सेक्स ५९,७०२.५२ अंशांवर खुला झाला. निफ्टीतर ७२.५० अंशांची म्हणजेच ०.४१ टक्के वाढीसह १७७२१. ५० अंश पातळीवर खुला झाला.

जागतिक बाजारपेठेतून सकारात्मक संकेत मिळत आहेत. आशियाई बाजारपेठेत सकारात्मकता दिसून आली. काल घसरण नोंदवलेले अमेरिकन इंडेक्समध्ये आज तेजी आहे. तर खनिज तेलाच्या आणि सोन्याच्या किंमतीत आज घसरण झाली आहे.

सोमवारी परकीय गुंतवणूकदरांचा विक्रीचा सपाटा

सोमवारच्या सत्रातही परकीय गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून अंदाजे ६७९३ कोटी रुपये मुल्याच्या शेअर्सची विक्री केली. सलग दुसऱ्या दिवशी हा शेअर विक्रीचा सपाटा गुंतवणूकदारांनी कायम ठेवला. तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी मात्र अंदाजे ५५१३कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली आहे.

विभाग

पुढील बातम्या