मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Sensex Nifty : ही तेजीची लाट कशामुळं?; शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी तीन दिवसांत कमावले २.३७ कोटी

Sensex Nifty : ही तेजीची लाट कशामुळं?; शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी तीन दिवसांत कमावले २.३७ कोटी

Jun 30, 2023, 06:02 PM IST

  • Sensex Nifty : सेन्सेक्स निफ्टीने सलग तीन दिवस ऐतिहासिक पातळी गाठत नवनवीन उच्चांक प्रस्थापित केले. गुंतवणूकदारांनी तीन दिवसात तब्बल २.३७ लाख कोटी रुपये कमावले. शेअर बाजारात निर्माण झालेल्या या तेजीमागची कारणं जाणून घ्या.

Sensex NIfty HT

Sensex Nifty : सेन्सेक्स निफ्टीने सलग तीन दिवस ऐतिहासिक पातळी गाठत नवनवीन उच्चांक प्रस्थापित केले. गुंतवणूकदारांनी तीन दिवसात तब्बल २.३७ लाख कोटी रुपये कमावले. शेअर बाजारात निर्माण झालेल्या या तेजीमागची कारणं जाणून घ्या.

  • Sensex Nifty : सेन्सेक्स निफ्टीने सलग तीन दिवस ऐतिहासिक पातळी गाठत नवनवीन उच्चांक प्रस्थापित केले. गुंतवणूकदारांनी तीन दिवसात तब्बल २.३७ लाख कोटी रुपये कमावले. शेअर बाजारात निर्माण झालेल्या या तेजीमागची कारणं जाणून घ्या.

Sensex Nifty : जागतिक बाजारातील कमजोर संकेतांच्या पार्श्वभूमीवरही देशांतर्गत शेअर बाजारांमध्ये वाढीचा कल कायम आहे. गेल्या तीन सत्रांमध्ये बीएसई सेन्सेक्सने १४०० अंकांच्या उसळीसह ६४४०० चा टप्पा ओलांडला आहे. बीएसई सेन्सेक्स आज ०.८ टक्क्यांनी वाढून ६४,४७५.७२ अंकांच्या पातळीवर पोहोचला. त्याचप्रमाणे एनएसई निफ्टीने १९,१२३.२० अंकांची पातळी गाठली.तज्ज्ञांच्या मते आगामी काळातही ही तेजी कायम राहण्याची शक्यता आहे. या तेजीमागची प्रमुख पाच कारणे पुढीलप्रमाणे -

ट्रेंडिंग न्यूज

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

परकीय गुंतवणूकीचा ओघ

भारतीय बाजाराबाबतचा परकीय गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास पुन्हा एकदा दुणावला आहे. त्यामुळे बाजारात या प्रकाराची हॅटट्रिक तेजी पाहायला मिळत आहे. विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी चालू आर्थिक वर्षात भारतीय शेअर बाजारात १० अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे.

इक्विटीबद्दलचा भरवसा वाढला

इक्विटीसारख्या जोखमीच्या मालमत्तेमध्ये गुंतवणूक करताना आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे बाजारातील अस्थिरता कमी झाली आहे. यामुळे शेअर बाजारही मजबूत झाला आहे.

डेरिव्हेटिव्हजी धमाकेदार सुरुवात

जुलै डेरिव्हेटिव्ह मालिका धमाकेदार सुरू झाली आहे. आकडेवारीनुसार,एफआय़आय़च्या निव्वळ दीर्घ पोझिशन्स शॉर्ट पोझिशन्सपेक्षा जास्त आहेत.

क्षेत्रीय उलाढाल

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बेंचमार्क निर्देशांकांमध्ये सलग तीन सत्रांमध्ये जोरदार तेजी दिसून आली आहे. इन्फोसिसच्या शेअरमध्ये आज तीन टक्क्यांनी आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या शेअरमध्ये दोन टक्क्यांहून अधिक उसळी पाहायला मिळाली. निफ्टी आयटी निर्देशांक जवळपास दोन टक्क्यांनी वाढून २९,४०० अंकांवर पोहोचला.

विभाग

पुढील बातम्या