मराठी बातम्या  /  बिझनेस  /  sensex on Historical level : सेन्सेक्सने रचला इतिहास, नव्या ६३५०० अंशांची उच्चांकी पातळीपार

sensex on Historical level : सेन्सेक्सने रचला इतिहास, नव्या ६३५०० अंशांची उच्चांकी पातळीपार

Jun 21, 2023, 10:58 AM IST

    • Sensex on Historical level : १ डिसेंबर २०२३ ला सेन्सेक्सने ६३ हजारांची अंश पातळी गाठली होती. आज सकाळी १० वाजता सेन्सेक्सनने ६३,५०० अंशांची नवी उच्चांकी पातळी गाठली आहे.
Sensex on Historical level HT

Sensex on Historical level : १ डिसेंबर २०२३ ला सेन्सेक्सने ६३ हजारांची अंश पातळी गाठली होती. आज सकाळी १० वाजता सेन्सेक्सनने ६३,५०० अंशांची नवी उच्चांकी पातळी गाठली आहे.

    • Sensex on Historical level : १ डिसेंबर २०२३ ला सेन्सेक्सने ६३ हजारांची अंश पातळी गाठली होती. आज सकाळी १० वाजता सेन्सेक्सनने ६३,५०० अंशांची नवी उच्चांकी पातळी गाठली आहे.

sensex on Historical level : १ डिसेंबर २०२३ ला सेन्सेक्सने ६३ हजारांची अंश पातळी गाठली होती. आज सकाळी १० वाजता सेन्सेक्सनने ६३,५०० अंशांची नवी उच्चांकी पातळी गाठली आहे. जूना रेकाॅर्ड मोडण्यासाठी सेन्सेक्सला २०३ दिवस लागले.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

याआधी १ डिसेंबर २०२३ ला सेन्सेक्सने ६३५८३.०७ अंशांची पातळी गाठून आॅल टाईम हाय रेकाॅर्ड गाठला होता. आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ६३५८८.३१ अंशांच्या पातळीवर पोहोचून सेन्सेक्सने नवी उच्चांकी पातळी गाठली आहे. निफ्टीतही वाढ झाली आहे. निफ्टी १८,८७० अंशांच्या पातळीवर व्यवहार करत होता. अशा प्रकारे, निफ्टी देखील १८,८८७.६० अंशांच्या सार्वकालिक उच्चांकाच्या अगदी जवळ आहे.

जागतिक बाजारात कमकूवतपणा दिसत असूनही सेन्सेक्स निफ्टीने गाठलेली उच्चांकी पातळी विशेष आहे. कारण बुधवारी अमेरिकन काँग्रेसमध्ये फेड रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांच्या निर्णयाकडे गुंतवणूकदारांच्या नजरा लागल्या आहेत. रिलायन्स, टीसीएस, एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी समभागांमध्ये जोरदार खरेदी झाल्यामुळे सेन्सेक्सने नवीन विक्रमी सर्वकालीन उच्चांक गाठण्यात भर पडली.

टाॅप गेनर्स

अल्ट्राटेक सिमेंट, पॉवर ग्रिड, विप्रो, टेक महिंद्रा, लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी), एचडीएफसी बँक आणि टीसीएस हे सेन्सेक्सवर टाॅप गेनर्समध्ये आहेत.

टाॅप लूजर्स

आज एनटीपीसी, अॅक्सिस बँक, सन फार्मा, इन्फोसिस, बजाज फिनसर्व्ह आणि टाटा स्टील सेन्सेक्सवर टाॅप लूजर्समध्ये आहेत.

विभाग

पुढील बातम्या