मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Stock Market update : सेन्सेक्सनं पहिल्यांदाच ओलांडला ७२ हजाराचा टप्पा, निफ्टीचाही उच्चांक

Stock Market update : सेन्सेक्सनं पहिल्यांदाच ओलांडला ७२ हजाराचा टप्पा, निफ्टीचाही उच्चांक

Dec 27, 2023, 04:23 PM IST

  • Sensex Nifty Today updates : शेअर बाजारानं आज आणखी एक टप्पा गाठला. सेन्सेक्सनं पहिल्यांदाच ७२ हजारांचा टप्पा पार केला तर निफ्टीनंही नवा उच्चांक गाठला.

Sensex ended above the 72,000 mark for the first time. (REUTERS)

Sensex Nifty Today updates : शेअर बाजारानं आज आणखी एक टप्पा गाठला. सेन्सेक्सनं पहिल्यांदाच ७२ हजारांचा टप्पा पार केला तर निफ्टीनंही नवा उच्चांक गाठला.

  • Sensex Nifty Today updates : शेअर बाजारानं आज आणखी एक टप्पा गाठला. सेन्सेक्सनं पहिल्यांदाच ७२ हजारांचा टप्पा पार केला तर निफ्टीनंही नवा उच्चांक गाठला.

Sensex Nifty News Today : गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वधारत जाणाऱ्या शेअर बाजारानं आज नवा टप्पा गाठला. सेन्सेक्सनं प्रथमच ७२ हजारांचा टप्पा पार केला, तर निफ्टीनंही नवी उच्चांकी पातळी गाठली.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज ७२०३८ वर बंद केला. सेन्सेक्सनं १२ दिवसांपूर्वीच ७१ हजारांचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर आज नवा इतिहास घडवला. सेन्सेक्समध्ये आज दिवसभरात ७०१.६३ अंकांची मोठी झेप घेतली. निफ्टीनं २१३.४० अंकांची झेप घेत २१,६५४.७५ ही उच्चांकी पातळी गाठली.

Gold Silver Rate Today : सोनं आजही महागलं, चांदीच्या भावात घसरण, पाहा तुमच्या शहरातील आजचा भाव

अदानी समूहाच्या कंपन्या तेजीत

सरत्या वर्षात काही काळ मोठा फटका बसलेले अदानी समूहाचे आता नव्या जोमानं मार्गक्रमण करत आहेत. आजही अदानीच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. अदानी पॉवर २.२१ टक्के वाढीसह ५२३ वर पोहोचला. तर अदानी टोटल गॅसचा भाव ०.९८ टक्क्यांनी वाढला. अदानी एनर्जी सोल्युशनचा शेअर १.७६ टक्क्यांनी वधारून १०५९.९५ रुपयांवर गेला. एसीसीच्या शेअरमध्ये २.६७ टक्क्यांची वाढ होऊन हा शेअर २१७० रुपयांवर पोहोचला. अंबुजा सिमेंटचा भावही २.११ टक्के वाढीसह ५१६ रुपयांवर पोहोचला तर, एनडीटीव्हीचा शेअर ०.१७ टक्क्यांनी वाढला.

निफ्टी टॉप लूझर

निफ्टीच्या टॉप लूझरच्या यादीत हिरो मोटोकॉर्प, ब्रिटानिया, सन फार्मा, एशियन पेंट्स, एनटीपीसी या शेअर्सचा समावेश आहे.

निफ्टी टॉप गेनर्स

निफ्टीच्या टॉप गेनर्सच्या यादीत अल्ट्रा टेक सिमेंट, टाटा मोटर्स, बजाज फायनान्स, एलटीआय माइंडट्री आणि यूपीएल यांचा समावेश आहे.

पुढील बातम्या