मराठी बातम्या  /  बिझनेस  /  FD interest Rates : मुदत ठेवीवर ही बँक देतेय ९ टक्क्यांपेक्षा अधिक व्याज, जाणून घ्या सविस्तर

FD interest Rates : मुदत ठेवीवर ही बँक देतेय ९ टक्क्यांपेक्षा अधिक व्याज, जाणून घ्या सविस्तर

Aug 15, 2023, 07:31 PM IST

  • FD interest Rates : सूर्योदय लघु वित्त बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरात सुधारणा केली आहे. ज्येष्ठ नागरिकांना आता दोन ते तीन वर्षांमध्ये परिपक्व होणाऱ्या एफडीवर ९.१० टक्के व्याज मिळत आहे.

interest rates ht

FD interest Rates : सूर्योदय लघु वित्त बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरात सुधारणा केली आहे. ज्येष्ठ नागरिकांना आता दोन ते तीन वर्षांमध्ये परिपक्व होणाऱ्या एफडीवर ९.१० टक्के व्याज मिळत आहे.

  • FD interest Rates : सूर्योदय लघु वित्त बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरात सुधारणा केली आहे. ज्येष्ठ नागरिकांना आता दोन ते तीन वर्षांमध्ये परिपक्व होणाऱ्या एफडीवर ९.१० टक्के व्याज मिळत आहे.

FD interest Rates : सूर्योदय लघु वित्त बँकेने मुदत ठेवींच्या व्याजदरात सुधारणा केली आहे. ज्येष्ठ नागरिकांना २ ते ३ वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी एफडीवर ९.१० टक्के व्याज देत आहे. बँक आता ज्येष्ठ नागरिकांना ४.५० टक्के ते ९.१० टक्के तर सर्वसामान्य ठेवीदांना ४ ते ८.६० टक्के व्याज देत आहे. यासाठी ७ दिवस ते १० वर्षांसाठी परिपक्व होणाऱ्या २ कोटींपेक्षा कमी जमा होणाऱ्या मुदत ठेवींचा समावेश आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

ज्येष्ठ नागरिकांसाठी लेटेस्ट एफडी रेट्स

बँक अथवा एनबीएफसी ज्येष्ठ नागरिकांना ७ दिवस ते १० वर्षांच्या कालावधीसाठी एफडी देतात. हे दर बँकेप्रमाणे वेगवेगळे असतता. यात नियमित जमा रक्कमेवर ५० बेसिस पाॅईंट्सचे अतिरिक्त व्याजदर दिले जातात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, ज्येष्ठ नागरिकांना दोन ते तीन वर्षांत परिपक्व होणाऱ्या एफडीवर ९.१० टक्के व्याज मिळू शकेल. तर सर्वसामान्य लोकांना त्यावर ८.६ टक्के व्याज मिळेल. १५ महिने ते २ वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना ९ टक्के व्याज मिळेल.

एसएफबीची १३ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये ५६४ पेक्षा अधिक बँकिंग आऊटलेट्स आणि ५०८६ कर्मचारी आणि अंदाजे १.६४ दशलक्ष ग्राहक आहेत.

मुदत ठेवींवरील व्याजदर येथे पाहा

७ दिवस ते १४ दिवस - ४.५० टक्के

१५ दिवस ते ४५ दिवस - ४.७५ टक्के

४६ दिवस ते ९० दिवस - ५ टक्के

९१ दिवस ते ६ महिने - ५.५० टक्के

६ महिने ते ९ महिने - ६ टक्के

९ महिने ते १ वर्षांपेक्षा कमी - ६.५० टक्के

१ वर्ष - ७.३५ टक्के

१ वर्ष ते १५ महिने - ८.७५ टक्के

१५ महिने ते २ वर्ष - ९ टक्के

२ वर्ष ते ३ वर्षांपेक्षा अधिक - ९.१० टक्के

३ वर्ष ते ५ वर्षांपेक्षा कमी - ७.२५ टक्के

५ वर्षे - ८.७५ टक्के

५ वर्षे ते १० वर्षांपेक्षा अधिक - ७.७५ टक्के

विभाग

पुढील बातम्या