मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Pensioners' Life certificate : तुमचा चेहराच बनेल तुमची ओळख, एका क्लिकवर असे सबमिट करा तुमचे डिटेल्स

Pensioners' Life certificate : तुमचा चेहराच बनेल तुमची ओळख, एका क्लिकवर असे सबमिट करा तुमचे डिटेल्स

Nov 09, 2022, 12:44 PM IST

    • निवृत्तवेतनधारकांसाठी गुडन्यूज ! जीवन प्रमाण पत्र सादर करण्यासाठी निवृत्तवेतनधारकांना आता प्रत्यक्ष बॅकेत जावे लागणार नाही. तुम्ही घरबसल्या तुमच्या अँड्रॉईड फोनच्या मदतीने तुमचे जीवन प्रमाणपत्र सादर करू शकता. तुम्ही चेहरा ओळखण्याच्या पद्धतीद्वारे तुमचे जीवन प्रमाणपत्र सादर करू शकता.
pension life certificate HT

निवृत्तवेतनधारकांसाठी गुडन्यूज ! जीवन प्रमाण पत्र सादर करण्यासाठी निवृत्तवेतनधारकांना आता प्रत्यक्ष बॅकेत जावे लागणार नाही. तुम्ही घरबसल्या तुमच्या अँड्रॉईड फोनच्या मदतीने तुमचे जीवन प्रमाणपत्र सादर करू शकता. तुम्ही चेहरा ओळखण्याच्या पद्धतीद्वारे तुमचे जीवन प्रमाणपत्र सादर करू शकता.

    • निवृत्तवेतनधारकांसाठी गुडन्यूज ! जीवन प्रमाण पत्र सादर करण्यासाठी निवृत्तवेतनधारकांना आता प्रत्यक्ष बॅकेत जावे लागणार नाही. तुम्ही घरबसल्या तुमच्या अँड्रॉईड फोनच्या मदतीने तुमचे जीवन प्रमाणपत्र सादर करू शकता. तुम्ही चेहरा ओळखण्याच्या पद्धतीद्वारे तुमचे जीवन प्रमाणपत्र सादर करू शकता.

Pensioners' Life certificate : तुमच्या घरात निवृत्त सदस्य असल्यास किंवा तुम्ही स्वतः पेन्शनधारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आतापर्यंत तुम्हाला पेन्शन घेण्यासाठी जाऊन जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागत होते. पण आतापासून तुम्ही घरबसल्या तुमच्या अँड्रॉईड फोनच्या मदतीने तुमचे जीवन प्रमाणपत्र सादर करू शकता. तुम्ही चेहरा ओळखण्याच्या पद्धतीद्वारे तुमचे जीवन प्रमाणपत्र सादर करू शकता.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

अँड्रॉइड फोनवरून जीवन प्रमाणपत्र सादर करा

फेस रिकग्नीशनद्वारे पेन्शनरचे डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची संपूर्ण प्रक्रिया आता एका क्लिकवर आली आहे. यामुळे पेन्शनधारकांना घरी बसून पेन्शनचा लाभ घेता येईल.

अशी आहे संपूर्ण प्रक्रिया

पायरी १ : तुमच्या Android फोनवर Google Play Store उघडा. तेथे, आधार फेस आयडी अॅप डाउनलोड करा. दुसरा मार्ग म्हणजे भारत सरकारच्या जीवन प्रमाणच्या अधिकृत वेबसाइटवर जा आणि तेथून अॅप्लिकेशन डाउनलोड करा.

पायरी २: अॅप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर, त्यात विचारलेली सर्व आवश्यक माहिती भरा.

पायरी ३: पेन्शनधारकाने तेथे त्याचा चेहरा स्कॅन करावा आणि प्रमाणीकरण पूर्ण करावे.

पायरी ४: या प्रक्रियेत, उपकरणाच्या मदतीने, पेन्शनधारकाला डीएलसी जनरेशनसह प्रमाणीकृत केले जाते.

पायरी ५: पेन्शनधारकाने मागितलेली सर्व माहिती भरा

पायरी ६ : या चरणात, उपकरणाच्या मदतीने, पेन्शनधारकाच्या चेहऱ्याचा थेट फोटो स्कॅन करा. फोटो चांगल्या प्रकारे स्कॅन करण्यासाठी एक चांगले प्रकाश क्षेत्र वापरा

पायरी ७ : सबमिट पर्यायावर क्लिक करा.

यानंतर तुम्ही दिलेल्या फोन नंबरवर एक मेसेज येईल, त्याशिवाय डीएलसी डाउनलोड करण्याची लिंक पाठवली जाईल.

फेस रेकग्निशन सेवा सुरु करण्याचा उद्देश

निवृत्तीवेतनधारकांसमोर फेस रिक्गनीशन सेवेचा पर्याय ठेवण्यात आला आहे. कारण बहुतेक निवृत्तीवेतनधारकांना वृद्धापकाळामुळे निवृत्तीवेतन कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन जीवन प्रमाणपत्र सादर करण्यात समस्या येते. अशा परिस्थितीत फेस रिक्गनीशन सेवा फायद्याची ठरते.

विभाग

पुढील बातम्या