मराठी बातम्या  /  बिझनेस  /  SBI Home Loan : एसबीआयचे स्वस्तात होम लोन, त्यासाठी ठेवा सिबील स्कोअर अप-टू-डेट

SBI Home Loan : एसबीआयचे स्वस्तात होम लोन, त्यासाठी ठेवा सिबील स्कोअर अप-टू-डेट

Jan 29, 2023, 04:24 PM IST

    • SBI Home loan : आरबीआयने रेपो रेट वाढविल्यानंतर होम लोन महाग झाले. परंतु एसबीआयने सवलतीत होम लोन जाहीर केले आहेत. या योजनेचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांना त्यांचा सिबील स्कोअर अपटूडेट ठेवावा लागणार आहे. 
Home loan HT

SBI Home loan : आरबीआयने रेपो रेट वाढविल्यानंतर होम लोन महाग झाले. परंतु एसबीआयने सवलतीत होम लोन जाहीर केले आहेत. या योजनेचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांना त्यांचा सिबील स्कोअर अपटूडेट ठेवावा लागणार आहे.

    • SBI Home loan : आरबीआयने रेपो रेट वाढविल्यानंतर होम लोन महाग झाले. परंतु एसबीआयने सवलतीत होम लोन जाहीर केले आहेत. या योजनेचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांना त्यांचा सिबील स्कोअर अपटूडेट ठेवावा लागणार आहे. 

Home loan : महागड्या गृहकर्जांच्या या काळात स्वस्तात गृहकर्ज देणाऱ्या बँकांची माहिती तुम्ही शोधत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने तुमच्यासाठी स्वस्त गृह कर्ज ऑफर आणली आहे, यामध्ये तुम्हाला गृहकर्ज दरांवर ३० ते ४० बेसिस पॉइंट्सची सूट मिळणार आहे. मात्र, ही सवलत तुमच्या सिबील क्रेडिट स्कोअरनुसार उपलब्ध असेल. तुम्ही ३१ मार्च २०२३ पर्यंत एसबीआयच्या या स्वस्त गृहकर्ज दरांचा लाभ घेऊ शकतात. एसबीआयने या स्वस्त घर योजनेला कॅम्पेन रेट ऑफर असे नाव दिले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

एसबीआय त्यांच्या नियमित गृहकर्ज दरांवर ३० ते ४० बेस पॉइंट्सची सूट देत आहे. पण जेव्हा तुमचा सिबिल क्रेडिट स्कोअर ७०० पेक्षा जास्त असेल तेव्हाच तुम्ही स्वस्त गृहकर्जाचा लाभ घेऊ शकतात. उदाहरणार्थ, जर तुमचा क्रेडिट स्कोअर ८०० पॉइंट्सपेक्षा जास्त असेल, तर सध्या एसबीआय़ ८.९० टक्के दराने होम लोन देत आहे, तर आता तुम्हाला ३० बेस पॉइंट्सची सूट मिळेल. म्हणजे आता ८.६० टक्के व्याजदराने गृहकर्ज मिळेल.

टॉप अप कर्जावरही सूट

एसबीआयने टॉप अप कर्जावरही सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. ८०० पेक्षा जास्त सिबील स्कोअर असलेल्यांना आता ९.३० टक्के दराने टॉप अप दराने मिळणारे कर्ज आता ९ टक्के दराने उपलब्ध होईल. म्हणजेच यात ३० बेसिस पॉइंट्सची सूट मिळेल. एसबीआयने कॅम्पेन ऑफर अंतर्गत होम लोन आणि टॉप अप लोनसाठी प्रोसेसिंग फी पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. एसबीआयच्या या स्वस्तात होम लोन आँफरचा लाभ ३१ मार्च पर्यंत घेता येणार आहे.

विभाग

पुढील बातम्या