मराठी बातम्या  /  बिझनेस  /  SBI FD Rates : स्टेट बँकेकडून ग्राहकांना नव्या वर्षाची खास भेट, एफडीच्या व्याजदरात वाढ

SBI FD Rates : स्टेट बँकेकडून ग्राहकांना नव्या वर्षाची खास भेट, एफडीच्या व्याजदरात वाढ

Dec 27, 2023, 12:43 PM IST

  • SBI FD Rates Hike : स्टेट बँक ऑफ इंडियानं आपल्या ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे. स्टेट बँकेनं एफडीच्या व्याजदरात वाढ केली आहे.

SBI FD Rates

SBI FD Rates Hike : स्टेट बँक ऑफ इंडियानं आपल्या ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे. स्टेट बँकेनं एफडीच्या व्याजदरात वाढ केली आहे.

  • SBI FD Rates Hike : स्टेट बँक ऑफ इंडियानं आपल्या ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे. स्टेट बँकेनं एफडीच्या व्याजदरात वाढ केली आहे.

SBI Fixed Deposit Interest Rate Hike : बँकेत एफडी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) नं एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. नवे व्याजदर २७ डिसेंबर २०२३ पासून म्हणजे आजपासूनच लागू होणार आहेत. 

ट्रेंडिंग न्यूज

TCS CEO Salary : भारतातील सर्वात मोठी IT कंपनी TCS च्या सीईओचा दर महिन्याचा पगार माहितीय का? वाचून व्हाल थक्क!

Business Ideas : उद्योग क्षेत्रात ‘जो दिखता है वोही बिकता है...’ हेच सूत्र चालतं…

Akshaya Tritiya Investment : फक्त सोनेच नाही, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही गुंतवणूकही ठरते शुभ

Bank News : 'या' बँकेत तुमचं खातं असेल, पण बँक बॅलन्स नसेल तर एक महिन्यानंतर खातं थेट बंद होणार

ही व्याज दरवाढ २ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीसाठी आहे. बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, आता ७ ते ४५ दिवसांच्या एफडीवर ३.५० टक्के, ४६ ते १७९ दिवसांच्या एफडीवर ४.७५ टक्के, १८० ते २१० दिवसांच्या एफडीवर५.७५ टक्के २११ दिवस ते १ वर्षापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर ६ टक्के आणि ३ ते ५ वर्षे कालावधीच्या एफडीवर ६.७५ टक्के व्याज मिळणार आहे. तर, पाच ते दहा वर्षांच्या कालावधीच्या एफडीवर ६.५० टक्के व्याज मिळेल.

FD Rates : चांगली बातमी! चार प्रमुख बँकांनी वाढवले एफडीवरील व्याजदर, तुमचं खातं इथं आहे का?

ज्येष्ठ नागरिकांना आणखी फायदा

स्टेट बँकेनं ज्येष्ठ नागरिकांच्या एफडीवरील व्याजदरात ०.५० टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळं ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ७ दिवस ते १० वर्षांच्या एफडीसाठी ४ टक्क्यांपासून ते थेट ७.५० टक्क्यांपर्यंत व्याज मिळेल. याआधी फेब्रुवारी महिन्यात स्टेट बँकेनं एफडीच्या दरात बदल केले होते.

पुढील बातम्या