मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Royal Enfield Bike : बाजारात दाखल होताच रॉयल एनफिल्डच्या ‘या’ नवीन बाइकची तुफान विक्री

Royal Enfield Bike : बाजारात दाखल होताच रॉयल एनफिल्डच्या ‘या’ नवीन बाइकची तुफान विक्री

Feb 26, 2024, 07:45 PM IST

    • रॉयल एनफिल्डने गेल्या नोव्हेंबरमध्ये हिमालयन ४५० (Himalayan 450) ही बाइक लाँच केली. तेव्हापासून सुमारे ६,५०० युनिट्सची विक्री झाली आहे.
The Royal Enfield Himalayan is off to a good start with nearly 6,500 units sold up till the first week of January, revealed the RE CEO

रॉयल एनफिल्डने गेल्या नोव्हेंबरमध्ये हिमालयन ४५० (Himalayan 450) ही बाइक लाँच केली. तेव्हापासून सुमारे ६,५०० युनिट्सची विक्री झाली आहे.

    • रॉयल एनफिल्डने गेल्या नोव्हेंबरमध्ये हिमालयन ४५० (Himalayan 450) ही बाइक लाँच केली. तेव्हापासून सुमारे ६,५०० युनिट्सची विक्री झाली आहे.

दणकट वजनाची बाइक निर्मितीत अग्रेसर असलेल्या रॉयल एनफिल्ड कंपनीने ‘रॉयल एनफिल्ड हिमालयन ४५०’ (Royal Enfield Himalayan 450) ही बाइक गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लाँच केली. रॉयल एनफिल्डने आत्तापर्यंत लॉंच केलेल्या बाइक्समध्ये सर्वात अत्याधुनिक आणि प्रगत मोटारसायकल मानली जात आहे. ही बाइक लॉंच झाल्यापासून ३१ जानेवारी २०२४ पर्यंत भारतात सुमारे ६,५०० बाइक्सची विक्री झाली आहे. रॉयल एनफिल्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. गोविंदराजन यांनी ही माहिती दिली. नवीन हिमालय बाइकमध्ये बाइकप्रेमींनी फारस रस दाखवला असून परदेशातील रॉयल एनफिल्ड प्रेमींसाठी कंपनी लवकरच नवीन ऑफर जारी करणार असून बाइक्सचे उत्पादन टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येणार असल्याचे गोविंदराजन म्हणाले. येत्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या बाइकची डिलिव्हरी सुरू करण्याचा विचार असल्याचे गोविंदराजन यांनी सांगितले. नवीन हिमालयन बाइकसाठी आत्तापर्यंत किती बुकिंग झाले याची माहिती त्यांनी दिली नाही.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

The Royal Enfield Himalayan 450 was launched in November last year replacing the Himalayan 411 in the brand's stable

रॉयल एनफिल्ड हिमालयन 450 ही बाइक पूर्णपणे नव्या तंत्रज्ञानाद्वारे बनवण्यात आली आहे. परदेशातील रस्त्यांवर बाइक चालवण्याची गती ही भारतापेक्षा जास्त म्हणजे १२० ते १३० किमी प्रति तास असल्याने ही बाइक आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

आधीच्या हिमालयन ४११ बाइकमध्ये काही उणिवा होत्या. त्या उणिवा नव्या आधीच्या हिमालयन ४५० मध्ये भरून काढण्यात आल्या आहेत. नवीन बाइकमध्ये ४५२ सीसी मोटर, ८,००० आरपीएम, ३९.४ बीएचपी पॉवर आणि ५,५०० आरपीएम तसेच ४० एनएम पीक टॉर्क निर्मितीची क्षणता असणार आहे. या बाईकमध्ये ४३ एमएम यूएसडी फ्रंट फोर्क आणि मागील बाजूस मोनोशॉक देण्यात आला आहे.या बाइकमध्ये ड्युअल पर्पज टायरसह २१ इंचाचा फ्रंट आणि १७ इंचाचा रिअर स्पोक व्हील सेटअप देण्यात आला आहे.

Video: रॉयल एनफिल्ड हिमालयन रिव्ह्यू

ऑफ-रोड सहलींवर जाणाऱ्यांसाठी नवीन हिमालयन ४५० बाइक योग्य ठरणारी आहे. या मोटारसायकलची किंमत सध्या २.८५ लाख रुपयांपासून २.९८ लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम, चेन्नई) आहे. रॉयल एनफिल्ड लवकरच ट्यूबलेस स्पोक्स असणारी बाइक भारतात दाखल करणार आहे.

विभाग

पुढील बातम्या