मराठी बातम्या  /  बिझनेस  /  RBI 500 rupees : ५०० रुपयांच्या नोटेची मागणी वाढली, नोटा जमवण्यासाठी रिझर्व्ह बँकेची धावपळ उडाली

RBI 500 rupees : ५०० रुपयांच्या नोटेची मागणी वाढली, नोटा जमवण्यासाठी रिझर्व्ह बँकेची धावपळ उडाली

May 28, 2023, 12:15 PM IST

    • RBI 500 rupees notes : २०० रुपयांच्या नोटा बदलण्याचे काम या आठवड्यापासून सुरू झाले असून ते सप्टेंबर अखेरपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे ५०० रुपयांच्या नोटांची मागणी वाढली आहे.
500 rupees notes HT

RBI 500 rupees notes : २०० रुपयांच्या नोटा बदलण्याचे काम या आठवड्यापासून सुरू झाले असून ते सप्टेंबर अखेरपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे ५०० रुपयांच्या नोटांची मागणी वाढली आहे.

    • RBI 500 rupees notes : २०० रुपयांच्या नोटा बदलण्याचे काम या आठवड्यापासून सुरू झाले असून ते सप्टेंबर अखेरपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे ५०० रुपयांच्या नोटांची मागणी वाढली आहे.

RBI 500 rupees notes : दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या घोषणेला एक आठवडा झाला आहे. या आठवड्यात बँकांमध्ये २००० रुपयांच्या नोटा बदलण्याचे काम सुरू झाले आहे. यासोबतच नोटाबंदीप्रमाणेच नोटा बदलण्याचेही बँकांचे काम वाढले आहे. परिणामी, रिझव्‍‌र्ह बँकेलाही या परिस्थितीत अधिक काम करावे लागत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

Business Ideas : ‘असतील शिते तर जमतील भुते...’ पैशाची किमया अन् मित्रांचे कोंडाळे!

Penny stock turns multibagger : दीड रुपयाचा शेअर ५५ रुपयांवर पोहोचला! गुंतवणूकदारांनी किती कमावले माहित्येय?

५०० रुपयांच्या नोटांच्या मागणीत वाढ

प्रत्यक्षात २००० रुपयांच्या नोटा बदलून घेण्याचा थेट परिणाम ५०० रुपयांच्या नोटांवर होत आहे. बदली नोटांच्या मागणीत ५०० रुपयांच्या नोटांची मागणी अचानक वाढली आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेला रात्रंदिवस काम करावे लागत आहे. २००० रुपयांच्या नोटांच्या जागी ५०० रुपयांच्या नोटांची पुरेशी उपलब्धता निर्माण करण्यासाठी रिझर्व्ह बँक चोवीस तास आणि सात दिवस काम करत आहे.

या कारणामुळे आली २००० रुपयांची नोट

नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेने २००० रुपयांची नोट बाजारात आणली होती. नोटाबंदीच्या काळात तत्कालीन प्रचलित ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. त्या वेळी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात रोख पुरवण्याची गरज होती. त्यामुळेच मध्यवर्ती बँकेने २००० रुपयांचे मोठे चलन बाजारात आणण्याचा निर्णय घेतला होता.

२००० च्या नोटा बदलल्या जात आहेत

आता नोटाबंदी जाहीर झाल्यामुळे ५०० रुपयांच्या नोटा मोठ्या प्रमाणात छापण्याचे काम रिझर्व्ह बँकेसमोर आले आहे. सध्या बाजारात ३.६२ लाख कोटी रुपयांच्या २००० रुपयांच्या नोटा चलनात आहेत. त्या बदलण्यासाठी रिझर्व्ह बँकेला या मूल्याच्या ५०० रुपयांच्या नोटा छापाव्या लागतील. यामुळेच रिझर्व्ह बँकेला रात्रंदिवस काम करावे लागत आहे.

दरम्यान, तुमच्याजवळ २००० रुपयाच्या नोटा असतील तर ते थेट तुमच्या खात्यात जमा करु शकतात. त्यासाठी कोणतीही मर्यादा दिलेली नाही. 

विभाग

पुढील बातम्या