मराठी बातम्या  /  बिझनेस  /  JioPhone Prima : स्वस्तात मस्त…रिलायन्स जियोचा नवीन स्मार्टफोन ‘प्रायमा'; यूट्यूब, फेसबूकची घ्या मजा

JioPhone Prima : स्वस्तात मस्त…रिलायन्स जियोचा नवीन स्मार्टफोन ‘प्रायमा'; यूट्यूब, फेसबूकची घ्या मजा

Nov 09, 2023, 01:01 AM IST

    • रिलायन्स जियो कंपनीने नवीन स्मार्टफोन बाजारात आणला आहे. ‘प्रायमा’ नावाचा हा किपॅड असलेला 4G इंटरनेट फोन असून यात मोबाइलधारकाला फेसबूक, यूट्यूब, व्हाट्सअप आणि गुगल व्हॉइस असिस्टंटची सुविधा देण्यात आली आहे.
JioPhone Prima launch

रिलायन्स जियो कंपनीने नवीन स्मार्टफोन बाजारात आणला आहे. ‘प्रायमा’ नावाचा हा किपॅड असलेला 4G इंटरनेट फोन असून यात मोबाइलधारकाला फेसबूक, यूट्यूब, व्हाट्सअप आणि गुगल व्हॉइस असिस्टंटची सुविधा देण्यात आली आहे.

    • रिलायन्स जियो कंपनीने नवीन स्मार्टफोन बाजारात आणला आहे. ‘प्रायमा’ नावाचा हा किपॅड असलेला 4G इंटरनेट फोन असून यात मोबाइलधारकाला फेसबूक, यूट्यूब, व्हाट्सअप आणि गुगल व्हॉइस असिस्टंटची सुविधा देण्यात आली आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जियो कंपनीने नवीन स्मार्टफोन बाजारात आणला आहे. ‘प्रायमा’ नावाचा हा किपॅड असलेला 4G इंटरनेट फोन असून यात मोबाइलधारकाला फेसबूक, यूट्यूब, व्हाट्सअप आणि गुगल व्हॉइस असिस्टंटची सुविधा देण्यात आली आहे. जियो कंपनीने २०१७ साली लॉंच केलेल्या ‘जियोफोन 2G’ची ‘प्रायमा’ ही सुधारित 4G आवृत्ती असून यातील कीपॅड, स्मार्टफोनचा लूक आणि डिझाइनमध्ये भरपूर सुधारणा करण्यात आलेली आहे. या स्मार्टफोनमध्ये KaiOS ही ऑपरेटिंग सिस्टिम वापरण्यात आली असून जियोने ग्राहकांना हा स्मार्टफोन २५९९ रुपयांमध्ये उपलब्ध करून दिलेला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Business Ideas : ‘असतील शिते तर जमतील भुते...’ पैशाची किमया अन् मित्रांचे कोंडाळे!

Penny stock turns multibagger : दीड रुपयाचा शेअर ५५ रुपयांवर पोहोचला! गुंतवणूकदारांनी किती कमावले माहित्येय?

Multibagger Stock : शेअर असावा तर असा! दोन वर्षांत तब्बल १६० टक्क्यांनी वाढला, तुमच्याकडं आहे का?

SEBI on KYC : म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांसाठी खूशखबर, सेबीनं शिथील केले 'हे' नियम

२.४ इंच डिस्प्ले स्क्रीन असलेल्या ‘जियोफोन प्रायमा’ मोबाइल फोनमध्ये व्हिडिओ कॉलिंग तसेच फोटोग्राफीसाठी कॅमेरा देण्यात आलेला आहे. फोनच्या मागील भागात फ्लॅश लाईट देण्यात आलेला आहे. फोनमधील बॅटरीची क्षमता १८००mAh एवढी आहे. ‘प्रायमा’ स्मार्टफोनमध्ये मनोरंजनासाठी जियो कंपनीच्या ‘जियो टीव्ही’, ‘जियो सावन’ सारख्या प्रीमियम डिजिटल सेवा मोबाइलधारकाला उपलब्ध असतील. शिवाय जियोपेद्वारे UPI पेमेंट करण्याची सुविधा 'जिओफोन प्रायमा'मध्ये देण्यात आलेली आहे.

मराठी भाषेत काम करा

‘जियो प्रायमा’ विविध चमकदार रंगांमध्ये उपलब्ध असून या मोबाइलद्वारे एकूण २३ भाषांमधून काम करण्याची मोबाइलधारकाला सुविधा मिळते. महागड्या स्मार्टफोन बाजारात ज्यांचं बजेट कमी आहे अशांसाठी खिशाला परवडणाऱ्या किमतीत आणि सोशल प्लॅटफॉर्मशी कनेक्ट राहण्यासाठी 4G इंटरनेट सेवेचा अंतर्भाव असलेला हा मोबाइल आहे.

‘जियोफोन प्रायमा’ हे यावर्षी पार पडलेल्या ‘इंडिया मोबाइल कॉंग्रेस’मध्ये प्रदर्शित करण्यात आले होते. रिलायन्स जियोचा उच्च किमतीचा ‘जिओफोन नेक्स्ट’ आणि ‘जियो भारत’ या दोन फोनच्या दरम्यानची जियोफोन प्रायमाची किंमत ठेवण्यात आलेली आहे.

JioPhone Prima 4G मधील काही वैशिष्ट्ये

ऑपरेटिंग सिस्टिम : kaiOS 2.5.3

रॅम: ‎0.51 GB

डायमेंशन: ‎12.3 x 5.6 x 1.6 cm

वजन: 110 Grams

वायरलेस तंत्रज्ञान: ‎Cellular

कनेक्टिव्हिटी सुविधा : ‎Bluetooth, USB, Wi Fi

खास वैशिष्ट: मेमरी वाढवण्याची सुविधा- 128GB, Nano Sim, Single, JioLocked,

बॅटरी क्षमता- 1800mAh

इंटरफेस - primary ‎Keypad

रिझॉल्युशन : ‎720p

कॅमेरा: VGA camera on the front and back

विभाग

पुढील बातम्या