मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Reliance Foundation Scholarship : रिलायन्स फाऊंडेशन देणार ५ हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; 'इथे' करा अर्ज

Reliance Foundation Scholarship : रिलायन्स फाऊंडेशन देणार ५ हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; 'इथे' करा अर्ज

Sep 07, 2023, 03:19 PM IST

    • Reliance Foundation Scholarship : रिलायन्स फाऊंडेशन स्कॉलरशिप २०२३ साठी अर्ज दाखल करण्यासाठी लिंक ओपन केली आहे. जे विद्यार्थी यासाठी अर्ज करू इच्छितात, त्यांना या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येईल.
education scholarship HT

Reliance Foundation Scholarship : रिलायन्स फाऊंडेशन स्कॉलरशिप २०२३ साठी अर्ज दाखल करण्यासाठी लिंक ओपन केली आहे. जे विद्यार्थी यासाठी अर्ज करू इच्छितात, त्यांना या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येईल.

    • Reliance Foundation Scholarship : रिलायन्स फाऊंडेशन स्कॉलरशिप २०२३ साठी अर्ज दाखल करण्यासाठी लिंक ओपन केली आहे. जे विद्यार्थी यासाठी अर्ज करू इच्छितात, त्यांना या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येईल.

Reliance Foundation Scholarship : शिक्षणासाठी आर्थिक अडचण येत असेल तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही रिलायन्स फाऊंडेशनच्या स्कॉलरशिपसाठी अर्ज करू शकतात. रिलायन्स फाऊंडेशन दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप देतात. त्याद्वारे विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिली जाईल. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज कसा करावा, पात्रता काय आहे यांसह इतर माहिती देत आहोत.

ट्रेंडिंग न्यूज

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

कोण अर्ज करू शकतात ?

रिलायन्स फाऊंडेशन स्कॉलरशिपसाठी देशातील प्रत्येक राज्यांतील विद्यार्थी अर्ज करू शकतात. ही शिष्यवृत्ती अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसपूर्वी विद्यार्थ्यांसाठी आहेत. कोणत्याही स्ट्रीममध्ये, कोणत्याही कोर्सेसच्या विद्यार्थ्यांकडे अर्ज करता येईल. यासाठी ते यूजी फर्स्ट इयरसमध्ये असणे गरजेचे आहे.

असा करा अर्ज

या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी केवळ आॅनलाईन प्रक्रियाच आहे. यासाठी आपल्याला रिलायन्स फाऊंडेशनच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. त्यासाठी scholarships.reliancefoundation.org. या लिंकवर अर्ज करावा लागेल. याशिवाय कोणत्याही पद्धतीने अर्ज करता येणार नाही.

डेडलाईन

या स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्यासाठी लिंक खुली करण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख १५ आॅक्टोबर २०२३ आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये धीरूभाई अंबानी यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त नीता अंबानी यांनी या स्काॅलरशीपची घोषणा केली होती.

किती विद्यार्थ्यांना होणार फायदा

ही स्कॉलरशिप ५००० विद्यार्थ्यांना दिली जाईल. यासाठी निवड प्रक्रिया १२ चे मार्कशीट्स, अॅप्टिट्यूड टेस्ट रिझल्ट, घराचे उत्पन्न यांवर अवलंबून आहे. विद्यार्थ्याची निवड झाल्यावर त्याला २ लाखांपर्यतची आर्थिक मदत दिली जाते.

विभाग

पुढील बातम्या