मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Digital Rupees from 1nov : भारताची डिजीटल करन्सी येणार, पहिली प्रायोगिक चाचणी सुरु

Digital Rupees from 1nov : भारताची डिजीटल करन्सी येणार, पहिली प्रायोगिक चाचणी सुरु

Nov 01, 2022, 11:37 AM IST

    • RBI जारी केलेल्या निवेदनानुसार, "डिजिटल रुपी (घाऊक सेगमेंट) ची पहिली पायलट चाचणी 1 नोव्हेंबरपासून सुरू होईल. या चाचणीअंतर्गत सरकारी रोख्यांमधील दुय्यम बाजारातील व्यवहार केले जातील.
Digital Rupees HT

RBI जारी केलेल्या निवेदनानुसार, "डिजिटल रुपी (घाऊक सेगमेंट) ची पहिली पायलट चाचणी 1 नोव्हेंबरपासून सुरू होईल. या चाचणीअंतर्गत सरकारी रोख्यांमधील दुय्यम बाजारातील व्यवहार केले जातील.

    • RBI जारी केलेल्या निवेदनानुसार, "डिजिटल रुपी (घाऊक सेगमेंट) ची पहिली पायलट चाचणी 1 नोव्हेंबरपासून सुरू होईल. या चाचणीअंतर्गत सरकारी रोख्यांमधील दुय्यम बाजारातील व्यवहार केले जातील.

Digital Rupees : 'डिजिटल रुपे' ची प्राथमिक चाचणी मंगळवारपासून म्हणजे १ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. .यामध्ये नऊ बँका सरकारी रोख्यांमधील व्यवहारांसाठी या डिजिटल चलनाचा वापर करतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सोमवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डिजिटल रुपीची पहिली पायलट चाचणी 1 नोव्हेंबरपासून सुरू होईल. या चाचणीअंतर्गत सरकारी रोख्यांमधील दुय्यम बाजारातील व्यवहार केले जातील.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

'सेंट्रल बँक डिजिटल करन्सी किंवा सीबीडीसी (CBDC) सादर करण्याच्या आपल्या योजनेच्या दिशेने एक पाऊल टाकत आरबीआयने डिजिटल रुपयाची प्रायोगिक चाचणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. घाऊक व्यवहारांच्या या चाचणीत नऊ बँका सहभागी होतील. स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि एचएसबीसी या नऊ बॅकांचा यात समावेश असणार आहे. आरबीआयच्या डिजिटल चलनात डील सेटलमेंट केल्याने सेटलमेंट खर्च कमी होण्याची शक्यता आहे.

यासोबतच आरबीआयने सांगितले की, डिजिटल रुपयाची (रिटेल सेगमेंट) पहिली पायलट चाचणी महिनाभरात सुरू करण्याची योजना आहे. चाचणी विशिष्ट वापरकर्ता गटांमधील निवडक ठिकाणी घेतली जाईल, ज्यामध्ये ग्राहक आणि व्यापारी यांचा समावेश आहे. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, भविष्यातील प्रायोगिक चाचण्यांमध्ये इतर घाऊक व्यवहार आणि क्रॉस-बॉर्डर पेमेंट्सकडेही लक्ष दिले जाईल.

आरबीआयने सेंट्रल बँक डिजिटल करन्सीवर सादर केलेल्या आपल्या संकल्पना अहवालात असे म्हटले आहे की हे डिजिटल चलन सादर करण्याचा उद्देश सध्याच्या चलनाच्या स्वरूपांना पूरक आहे. हे वापरकर्त्यांना विद्यमान पेमेंट सिस्टमसह अतिरिक्त पेमेंट पर्याय उपलब्ध करून देईल.  सीबीडीसी (CBDC )हे केंद्रीय बँकेने जारी केलेल्या चलनविषयक नोटांचे डिजिटल स्वरूप आहे. जगभरातील मध्यवर्ती बँका सीबीडीसी सुरू करण्याच्या शक्यतांचा शोध घेत आहेत. सरकारने २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात डिजिटल रुपया सादर करण्याची घोषणा केली होती.

विभाग

पुढील बातम्या